Breaking News : दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञानचा पेपर सोडवण्यास १५ मिनिटे अधिक वेळ मिळणार.

दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञानचा पेपर सोडवण्यास १५ मिनिटे अधिक वेळ मिळणार

━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━

💁🏻‍♂️ दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी असून, गणित आणि विज्ञान परीक्षेचा पेपर लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांना यंदाही १५ मिनिटे अधिक देण्याचा निर्णय शालान्त मंडळाने घेतला असून मागील वर्षीही दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना गणित पेपर सोडविण्यासाठी अधिक वेळ देण्यात आला होता. मात्र, यंदा केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीच ही सवलत असेल. तीही फक्त गणित आणि विज्ञानाच्या विषयासाठी असेल. 


🕜 गणित व विज्ञानच्या पेपरासाठी दीड तास म्हणजे ९० मिनिटे दिली जातात. यावेळी ती १०५ मिनिटे दिली जातील. राष्ट्रीय सर्वेक्षणात गोव्यातील विद्यार्थी गणित विषयात मागे पडत असल्याचा निकष आल्यानंतर शालान्त मंडळाने हा निर्णय घेतला होता. तसेच मागील वर्षी कोविडमुळे अनेक विद्यार्थ्यांचे वर्ग झाले नव्हते. त्यामुळेही अधिक वेळ देण्यात आला होता. 


📝प्रथम सत्र परीक्षा ही केवळ पर्याय निवडून लिहिण्याची, म्हणजेच एमसीक्यू पद्धतीने लिहिण्याची होती. त्यामुळे अधिक वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला नव्हता. ही परीक्षा ही उत्तरपत्रिकेवर उत्तरे लिहिण्याची आणि गणिते सोडविण्याची आहे. त्यामुळे अधिक वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर १५ मिनिटे अतिरिक्त वेळ देण्याची सवलत देणारे हे शेवटचे वर्ष आहे. 


यापुढे ती दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.


पोलिस भरतीची लेखी परीक्षा 'या' तारखेला होणार ...!

💁🏻‍♂️ पोलीस भरतीच्या मैदानी परीक्षेनंतर लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांमध्ये अजुनही संभ्रम आहे. लेखी परीक्षांच्या तारखा अजूनही जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांकडून विचारणा करण्यात येत आहे. मात्र आता पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.


📝 *एप्रिल महिन्यात लेखी परीक्षेची शक्यता* 

मैदानी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी एका पदासाठी 10 उमेदवारांची मेरिटनुसार लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे. त्यानुसार 1 लाख 83 हजार 310 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील. मात्र तृतीयपंथीयांची मैदानी परीक्षा झाल्याशिवाय पोलीस भरतीच्या उमेदवारांची लेखी परीक्षा होणार नाही. याबाबत निकष ठरल्यानंतर मार्चमध्ये त्यांची मैदानी चाचणी पार पडेल. दुसरीकडे दहावी-बारावीसह बहुतेक विद्यापीठांच्या परीक्षांमुळे केंद्रे उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे पोलिस भरतीची लेखी परीक्षा एप्रिल महिन्यात होऊ शकते; अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.


✍🏻 *असं असेल परीक्षेचे स्वरूप*

◆ लेखी परिक्षेत 100 वस्तुनिष्ठ प्रश्न असतील जे 90 मिनिटांत सोडवावे लागतील.

◆ PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे.

◆ लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल.

◆ सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील.

चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत.

◆ परीक्षा मराठीतूनच होणार आहे.

पोलीस भारती 2022 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील.


🧾 *गुण विभागणी –* 

1. गणित – 25 प्रश्न, 25 गुण (Police Bharti 2023)

2. बौद्धिक चाचणी – 25 प्रश्न, 25 गुण

3. मराठी व्याकरण – 25 प्रश्न, 25 गुण

4. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी – 25 प्रश्न, 25 गुण


• एकूण 100 प्रश्नासाठी 100 गुण

• एकूण वेळ – 90 मिनिटे


🎓 नोकरी: अग्निपथ योजनेंतर्गत औरंगाबाद मध्ये 7 जिल्ह्यांकरिता आर्मी अग्नीवर भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु..!!


💁🏻‍♂️ अग्निपथ योजनेंतर्गत औरंगाबाद मध्ये “अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन (10वी पास), आणि अग्निवीर ट्रेड्समन (8वी पास)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.


👤 *पदाचे नाव –* अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन (10वी पास), आणि अग्निवीर ट्रेड्समन (8वी पास)

🎓 *शैक्षणिक पात्रता –* मूळ जाहिरात वाचावी.

📍 *नोकरी ठिकाण –* औरंगाबाद

वयोमर्यादा – 17. 1⁄2 ते 21 वर्षे

💵 *परीक्षा शुल्क –* रु. 250/-

🖨️ *अर्ज पद्धती –* ऑनलाईन

👨🏻‍💻 *निवड प्रक्रिया –* ऑनलाइन परीक्षा

📆 *अर्ज करण्याची शेवटची तारीख –* 15 मार्च 2023  


👉🏻 राज्यातील या 7 जिल्ह्यांतील कायम निवासी असलेल्या उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येईल.


📍 *औरंगाबाद , बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी..* 


📑 *आवश्यक कागदपत्रं..* 

▪️10वी उत्तीर्ण गुणपत्रिका

▪️12वी उत्तीर्ण गुणपत्रिका आधार कार्ड

▪️शिक्षण प्रमाणपत्र

▪️सैन्य संबंध प्रमाणपत्र

▪️अविवाहित प्रमाणपत्र

▪️जातीचा दाखला

▪️अधिवास प्रमाणपत्र

▪️क्रीडा प्रमाणपत्र

▪️एनसीसी प्रमाणपत्र

▪️डीओबी प्रमाणपत्र

▪️पासपोर्ट आकाराचा फोटो


🖨️ *असा करावा ऑनलाइन अर्ज..* 

▪️इच्छुक उमेदवारांनी भारतीय लष्कराच्या www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.

▪️ऑनलाईन पद्धतीने यशस्वीपणे नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या इमेल आयडीवर प्रवेश पत्र पाठविण्यात येईल.

▪️डुप्लिकेट/अपूर्ण/चुकीने भरलेला अर्ज नाकारला जाईल.

▪️उमेदवाराने ऑनलाइन अर्जात आधार क्रमांक टाकावा.




Breaking News : दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञानचा पेपर सोडवण्यास १५ मिनिटे अधिक वेळ मिळणार. Breaking News : दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञानचा पेपर सोडवण्यास १५ मिनिटे अधिक वेळ मिळणार. Reviewed by Best Seller on 2/18/2023 07:48:00 pm Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

🚶‍♂️💃🚶‍♂️

Blogger द्वारा संचालित.