शिवसेना कुणाची याचा निर्णय अखेर झाला. केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर आपला निर्णय जाहीर केला.

 🏹 उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना आणि धनुष्यबाण निसटले; शिवसेना व धनुष्यबाण एकनाथ शिंदेंचाच

━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━

शिवसेना कुणाची याचा निर्णय अखेर झाला. केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर आपला निर्णय जाहीर केला. 

उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे. शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे.


🐯 उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना गेली.

होय, केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणारा फैसला अखेर सुनावला. 

निवडणूक आयोगातील कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं. निवडणूक आयोगाने शुक्रवारी सायंकाळी हा निर्णय दिला. 


निवडणूक आयोगाचा निर्णय हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का असून, आता ठाकरे काय भूमिका घेणार? सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावणार का? हे पाहावं लागेल.


एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. 


त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. 


आज निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. *धनुष्यबाण* हे चिन्ह आणि *शिवसेना* हे नाव देखील मिळालं आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. 

ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे.


शिवजयंती निमित्त शिवभक्तांना राज्य सरकारकडून भेट, शिवनेरी मार्गावरील तीन टोलवर टोलमाफी.

🚩 शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं शिवभक्तांनी टोलमाफ करण्याचा निर्णय घेतला असून 19 फेब्रुवारीला शिवनेरीवर जाणाऱ्या शिवभक्तांना टोलमाफ करण्यात आला आहे. शिवनेरी किल्ल्याच्या मार्गावरील तीन टोलवर टोलमाफी करण्यात आली आहे. यामध्ये खालापूर, तळेगाव, खेड, राजगुरुनगर टोलनाक्यावर टोलमाफी असेल सरकारकडून घोषित करण्यात आलं आहे. 


🙏🏻छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा 393 वी जयंती साजरी होत आहे. त्याचबरोबर यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्राची ओळख जगभरात पोहोचली आहे. त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी उभारलेले गड-किल्ले जगभरातील पर्यटनप्रेमींचे मुख्य आकर्षण आहे. यात शिवनेरी, रायगड आणि सिंधुदुर्ग हे महत्वाचे किल्ले आहेत.


📄 *तीन दिवस चालणारे कार्यक्रम पुढीलप्रमाणे..👇🏻* 


▪️ *18 फेब्रुवारी 2023* 

◆ सायं. 6.30 वा. हिंदवी स्वराज्य महोत्सव 2023 उदघाटन .

◆ सायं. 7 ते रात्री 10 वा. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अशोक हांडे यांचा 'मराठी बाणा' कार्यक्रम.


▪️ *19 फेब्रुवारी 2023* 

◆ स. 9 ते 11 वा. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा 

◆ दु. 3 ते 5 वा. शिववंदना 

◆ सायं. 6.15 ते 7 वा. महाआरती कार्यक्रम

◆ सायं. 7 ते रात्री 10 वा. जाणता राजा या महानाट्याचा कार्यक्रम


▪️ *20 फेब्रुवारी 2023* 

◆ सायं.7 ते रात्री 10 वा. जाणता राजा कार्यक्रम 


🏪 तीनही दिवशी विविध बचतगटांची उत्पादने आणि खाद्यपदार्थांच्या 300 स्टॉलचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.


📿 सिहोरमध्ये रुद्राक्ष महोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरी एक महिला ठार; चार बेपता.

😨 मध्यप्रदेशातील सिहोर येथील कुबेरश्वर धाम नावाने परिचीत असलेल्या ठिकाणी महाशिवरात्रीच्या मुहुर्तावर श्री. विठ्ठलेश सेवा समितीने आयोजीत केलेल्या रुद्राक्ष महोत्सव व शिवपुराण कथा वाचन कार्यक्रमात रुद्राक्ष मिळविण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत महाराष्ट्रातील एक महिला जागीच ठार झाली, तर चार महिला अजून बेपता आहेत. 


📰 मिळालेल्या माहितीनुसार, सिहोर मधील रुद्राक्ष महोत्सव कार्यक्रमासाठी देशभरातून मोठया संख्येने भाविक रात्रीपासूनच सिहोर मध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली होती, तर येथे कुठल्याही प्रकारचे नियोजन नव्हते साधे पिण्यासाठी पाणी देखील उपलब्ध नव्हते त्यामुळे असंख्य भाविक हे रात्रीपासून अन्न पाण्यावाचून उपाशी होते. रुद्राक्ष वाटप कार्यक्रम सुरु होताच भाविकांची झुंबड उडाली व त्यात हि दुर्घटना घडली.


📿 सिहोर इथे मोफत रुद्राक्ष घेण्यासाठी देशभरातून हजारो भाविक इथे पोहोचले आहेत. सिहोरला जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास 30 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच आहेत. तर रेल्वे स्थानकातही प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे.


🚗 आठ दिवसात 15 लाख भाविक येथील अशी अपेक्षा असताना पहिल्याच दिवशी पाच लाख भाविक पोहचले आणि गोंधळ उडाला. महामार्ग ठप्प झाले. भाविकांचे हाल होऊ लागले. प्रशासन आणि आयोजकांनी केलेले सर्व नियोजन कोलमडले. *नाईलाजाने कथा मध्येच सोडून रुद्राक्ष वाटप स्थगित करीत असल्याचे पंडित प्रदीप मिश्रा यांनी जाहीर केले होते.* 


🎙️ *हा तर श्रध्देचा बाजार व पाखंड असल्याचे परखड मत मध्यप्रदेश मधील एका न्युज चँनलचे सिनीयर पत्रकार रमेश शर्मा यांनी व्यक्त केले आहे.*



शिवसेना कुणाची याचा निर्णय अखेर झाला. केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर आपला निर्णय जाहीर केला. शिवसेना कुणाची याचा निर्णय अखेर झाला. केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर आपला निर्णय जाहीर केला. Reviewed by Best Seller on 2/17/2023 07:57:00 pm Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

🚶‍♂️💃🚶‍♂️

Blogger द्वारा संचालित.