दहावी-बारावी परीक्षेबाबत मोठा निर्णय ! अर्धा तास उशिरा येण्याची पद्धत बंद / व्हिडिओ रेकॉर्डिंग

प्रश्नपत्रिका वाटल्यावर आलेल्या विद्यार्थ्याला परीक्षेसाठी नो एन्ट्री

━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━

📃 दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी, यासाठी बोर्डाने प्रश्नपत्रिका १० मिनिटे अगोदर देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

दुसरीकडे परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत उशिराने आलेल्या विद्यार्थ्यास परीक्षेला बसण्यास दिली जाणारी परवानगी देखील बंद करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला पेपर सुरु होण्यापूर्वीच केंद्रावर हजर राहणे बंधनकारक असणार आहे.


👥बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी व सचिव अनुराधा ओक यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षांचे ठोस नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर मिळेल, पण प्रश्नपत्रिका बरोबर ११ वाजता म्हणजेच पेपरची वेळ झाल्यावरच दिली जाणार आहे. 


दुसरीकडे बैठे पथकासोबतच प्रश्नपत्रिका पोच करणाऱ्या 'रनर'वरील जबाबदारी वाढविली आहे. 


कस्टडीतून प्रश्नपत्रिका घेऊन निघाल्यानंतर अधूनमधून त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग बोर्डाला पाठवावे लागणार आहे.


📌तसेच परीक्षा केंद्रांवर पोचल्यावर वेळोवेळी 'रनर'ला त्यांच्याकडील मोबाइल किंवा कॅमेऱ्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे लागणार आहे. तत्पूर्वी, बोर्ड परीक्षेला कॉपी करणे गुन्हा आहे, कॉपी केल्यास काय शिक्षा होऊ शकते, पेपर पारदर्शक व प्रामाणिकपणे कसा सोडवायचा, याचे धडे शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यास प्रात्यक्षिक परीक्षेच्या काळात द्यायचे आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटामागे देखील त्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना बोर्डाने दिल्या आहेत.


🎥 *रनर'कडे व्हिडिओ रेकॉर्डिंगची जबाबदारी* 

दहावी-बारावीची परीक्षा यंदा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी बोर्डाने नवीन नियमावली तयार केली आहे. परीक्षेवर वॉच ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता पथकांची देखील भरारी पथके नेमली जाणार आहेत. 


    राज्याच्या मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्यासंबंधीच्या सूचना केल्या आहेत. दुसरीकडे प्रश्नपत्रिका घेऊन परीक्षा केंद्रांवर जाणाऱ्या 'रनर'ला कस्टडीतून निघल्यापासून केंद्रावर पोचेपर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे लागणार आहे. 


तसेच केंद्र संचालकांना सिलबंद पॉकिट देताना व दालनात प्रश्नपत्रिका वाटप करतानाही व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे लागणार आहे.


🎒 विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या बाबी.

◆ प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची उत्तरे वेळेत लिहण्याचा असावा सराव

◆ कॉपी केल्यास होईल कारवाई; ऑबजेक्टिव्ह प्रश्नांची उत्तरे सांगितली जाणार नाहीत

◆ पेपर सुरु होण्यापूर्वी किमान अर्धा तास परीक्षा केंद्रावर पोचा

◆ संपूर्ण तयारीनिशी परीक्षेला सामोरे जा; कशाचाही मनावर नसावा तणाव


⚛️ राशीभविष्य : १३ फेब्रुवारी सोमवार

━━━━━━━━━━━━━

🐏 *मेष राशी :* 

चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपणास सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा प्राप्त होईल. आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल. वाहन सुख मिळेल. प्रिय व्यक्तीचे प्रेम प्राप्त करू शकाल. विचारात उग्रता व अधिकाराची भावना वाढेल. बौद्धिक चर्चेत भाग घेण्याची संधी प्राप्त होईल. समाधानि वृत्ती बाळगणे आवश्यक राहील. आजचा दिवस व्यापार्‍यांसाठी लाभदायी आहे.


🦬 *वृषभ राशी :* 

चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सांभाळून नियोजित कामे ठरल्या प्रमाणे पूर्ण करू शकाल. आजारी व्यक्तींना आज प्रकृतीत सुधारणा जाणवेल. मातुल घराण्या कडून चांगली बातमी समजेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. अडलेली कामे आज पूर्ण होतील.


👩‍❤️‍👨 *मिथुन राशी :* 

चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस नवीन कामाच्या आरंभाला अनुकूल नाही. जीवनसाथी व संतती ह्यांच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. चर्चा किंवा वाद - विवाद ह्यात मानहानी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. स्त्री मित्रांसाठी पैसा खर्च होईल. शारीरिक व मानसिक अस्वस्थते मुळे उत्साहात कमतरता जाणवेल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारणपणे चांगला आहे.


🦀 *कर्क राशी :* 

चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपल्यात आनंद व स्फूर्ती ह्यांचा अभाव दिसून येईल. मन खिन्न होईल. छातीत दुखणे किंवा इतर काही कारणांनी त्रास होईल. निद्रानाश होईल. सार्वजनिक ठिकाणी स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. पैसा खर्च होईल. जलाशया पासून दूर राहावे.


🦁 *सिंह राशी :* 

चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. कामात यश व प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्यामुळे मनात प्रसन्नता दरवळेल. भावंडांशी भावदर्शी संबंध प्रस्थापित होतील. मित्र व स्नेही यांच्यासह एखाद्या रमणीय पर्यटन स्थळी हिंडण्या - फिरण्याचा आनंद घेऊ शकाल. प्रकृती सुद्धा एकदम उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. मनात उद्विग्नता येणार नाही. नशिबाची साथ मिळेल. नवे कार्य हाती घेण्यास आजचा दिवस अनुकूल आहे.


👩🏻‍🦰 *कन्या राशी :* 

चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपल्या मधुर वाणीचा इतरांच्या मनावर सकारात्मक प्रभाव होईल. घरगुती वातावरण चांगले राहील. वाणीवर ताबा ठेवल्याने वादविवाद होणार नाहीत. आर्थिक कामे मनासारखी पार पडतील. नकारात्मक विचारांपासून दूर राहावे लागेल. मित्रांची भेट होईल. छोटासा प्रवास घडेल.


⚖️ *तूळ राशी :* 

चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपल्या प्रत्येक कामात आत्मविश्वास असल्याचे दिसून येईल. आर्थिक योजना व्यवस्थित करू शकाल. शारीरिक व मानसिक शांतता लाभेल. वस्त्रे, अलंकार, आनंद, उल्हास ह्यासाठी खर्च होईल. वैचारिक वाढ होईल. रचनात्मक कार्यात मन रमेल.


🦂 *वृश्चिक राशी :* 

चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपल्या स्वभावातील तामसवृत्ती व बोलणे ह्यावर संयम ठेवावा लागेल. शारीरिक शैथिल्य व मानसिक चिंता ह्यामुळे मन ग्रासून जाईल. वाहन चालवताना अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. शक्यतो आज शस्त्रक्रिया टाळावी. स्नेही व कुटुंबीयांशी वाद होण्याची शक्यता आहे. कोर्ट - कचेरीच्या कामात सावध राहा किंवा शक्य असेल तर काम लांबणीवर टाका. आनंद - उल्हास ह्यासाठी खर्च कराल.


🏹 *धनु राशी :* 

चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील. मित्र व परिवारासह पर्यटन स्थळी भटकण्याचा आनंद मिळेल. व्यापारात लाभदायी ठरणारा दिवस आहे. कुटुंबात सुख - शांती नांदेल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळू शकेल.


🦐 *मकर राशी :* 

चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. कुटुंब व संतती यांच्याविषयी आपणाला आनंद व समाधान होईल. स्नेही व मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. व्यापारात पैशाच्या वसुलीसाठी बाहेर जावे लागेल व ते फायदेशीर ठरेल. व्यवसायात धन व मान - प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. नोकरीत बढतीची शक्यता आहे. एखादा अपघात संभवतो.


🍯 *कुंभ राशी :* 

चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज प्रतिस्पर्ध्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. शारीरिक अस्वास्थ्य राहील. शैथिल्य व आळस राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरीत चुका होतील. आनंद - मौजमजा ह्यासाठी पैसा खर्च होईल. संतती विषयक काळजी राहील. विदेशातून सुखद बातमी ऐकिवात येईल.


🦈 *मीन राशी :* 

चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज अचानक धनलाभ संभवतो. व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील. आज शारीरिक व मानसिक कष्टाची तयारी ठेवा. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. खर्च वाढेल. अवैध प्रवृतींमुळे अडचणीत याल. योग्य विचार व काम आपणास वाईट मार्गावर जाण्यापासून थोपवतील.



दहावी-बारावी परीक्षेबाबत मोठा निर्णय ! अर्धा तास उशिरा येण्याची पद्धत बंद / व्हिडिओ रेकॉर्डिंग दहावी-बारावी परीक्षेबाबत मोठा निर्णय ! अर्धा तास उशिरा येण्याची पद्धत बंद / व्हिडिओ रेकॉर्डिंग Reviewed by Best Seller on 2/13/2023 11:11:00 am Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

🚶‍♂️💃🚶‍♂️

Blogger द्वारा संचालित.