Animal Husbandry या योजनेअंतर्गत जनावरांच्या गोठ्यासाठी मिळणार 80 हजार रुपये 🐓🐐🐃🐂

Animal Husbandry या योजनेअंतर्गत जनावरांच्या गोठ्यासाठी मिळणार 80 हजार रुपये February 6, 2023 Animal Husbandry राज्य शासनाने 3 फेब्रुवारी 2021 रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार 

शरद पवार ग्रामसमृद्धी’ योजना आणली आहे . नुकतीच ही योजना राबविण्यास मान्यताही मिळाली आहे.



या योजनेतून शेतीला जोड उद्योग ठरलेल्या शेळी, कुक्कुटपालन, गाय-म्हैस पालन करणाऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबवण्यात येणार आहे Animal Husbandry . 


गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधकाम : यात दोन ते सहा गुरांसाठी एक गोठा बांधता येईल. त्यासाठी 77,188 रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे . 

सहापेक्षा अधिक गुरांसाठी सहाच्या पटीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट , 

18 पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान मिळणार आहे . 

शेळीपालन शेड बांधकाम : 

10 शेळ्यांकरिता शेड बांधण्यासाठी 49,284 रुपये अनुदान दिले जाणार आहे . 

20 शेळ्यांसाठी दुप्पट , तर 

30 शेळ्यांकरिता तिप्पट अनुदान दिले जाणार आहे.

जर अर्जदाराकडे 10 शेळ्या नसतील तर किमान दोन शेळ्या असाव्यात , 

असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे 


कुक्कुटपालन शेड बांधकाम : 100 पक्ष्यांकरिता शेड बांधायचे असेल तर 49,760 रुपये अनुदान दिले जाणार आहे.

150 पेक्षा जास्त पक्षी असल्यास दुपट निधी दिला जाणार आहे . 

जर एखाद्याकडे 100 पक्षी नसल्यास 100 रुपयांच्या स्टॅम्पवर दोन जामीनदारांसह शेडची मागणी करता येईल . 


त्यानंतर यंत्रणेने शेड मंजूर करावे आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये 100 पक्षी आणणे बंधनकारक राहील.

भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग : शेतातील कचरा एकत्र करून नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी 10,537 रुपये अनुदान दिले जाणार आहे .


1. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे . 


2. सुरवातीला तुम्ही सरपंच , ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्यापैकी कुणाकडे अर्ज करत आहात , त्यांच्या नावावर बरोबरची खूण करा . 


3. त्याखाली ग्रामपंचायतचे नाव , तालुका , जिल्हा टाकायचा आहे . उजवीकडे तारीख टाकून फोटो चिकटवा . 


4. त्यानंतर अर्जदाराचे नाव , पत्ता , तालुका , जिल्हा आणि मोबाईल क्रमांक टाका . 


5. आता तुम्ही ज्या कामासाठी अर्ज करणार आहात , त्या कामासमोर बरोबरची खूण करा .

 6. येथे मनरेगा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कामांची यादी आहे . पण , आपल्याला शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेसाठी अर्ज करायचा असल्याने नाडेप कंपोस्टिंग , गाय- म्हैस गोठ्यांचं कॉक्रिटीकरण , शेळी पालन शेड , कुक्कुटपालन शेड यापैकी तुम्हाला ज्या कामासाठी अनुदान हवे आहे त्या कामासमोर बरोबरची खूण करा .


 7. इथे प्रत्येक कामासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे . 


8. त्यानंतर तुमच्या कुटंबाचा प्रकार निवडा . यात अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती , भटक्या जमाती , भटक्या विमुक्त जमाती , दारिद्र्य रेषेखालील कुटुंब , महिलाप्रधान कुटुंब , शारीरिक अपंगत्व प्रधान असलेले कुटुंब , भूसुधार आणि इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी , अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी, 2008 च्या कृषी कर्जमाफी योजनेनुसार अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी यापैकी ज्या प्रकारात तुमचं कुटुंब बसत असेल त्यासमोर बरोबरची खूण करा . 


9. तुम्ही जो प्रकार निवडाल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावाही त्यासोबत जोडा . 


10. लाभार्थीच्या नावे जमीन आहे का , असल्यास ' हो ' म्हणून सातबारा , आठ - अ आणि ग्रामपंचायत नमुना 9 जोडा . 


11. रहिवासी दाखला जोडा तसेच तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवासी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का , तेही भरा . 


12. अर्जदाराच्या कुटुंबातील 18 वर्षांवरील पुरुष , स्त्री आणि एकूण सदस्यांची संख्या लिहा . 


13. शेवटी घोषणापत्रावर नाव लिहून सही किंवा अंगठा करा . 


14. यासोबत मनरेगाचे जॉब कार्ड , 8 - अ , सात - बारा उतारे आणि ग्रामपंचायत मालमत्ता नमुना 8 - अ चा ● उतारा जोडा . 

15. यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे . यासोबत सरपंच आणि ग्रामसेवकांच्या सहीचे एक शिफारसपत्र द्यावे लागणार आहे . यात लाभार्थी सदर कामाचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याबाबत सांगितले जाईल . 


16. त्यानंतर तुमच्या कागदपत्रांची छाननी होईल आणि तुम्हाला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही- शिक्क्यानुसार पोचपावती दिली जाईल . यात तुम्ही लाभासाठी पात्र आहे की नाही ते नमूद केले जाईल . 


17. एक गोष्ट लक्षात ठेवा , तुम्ही मनरेगाचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल ; पण तुमच्याकडे मनरेगाचे जॉब कार्ड नसेल तर मात्र तुम्हाला आधी ग्रामपंचायत कार्यालयात जॉब कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे .


अर्जाचा नमुना





Animal Husbandry या योजनेअंतर्गत जनावरांच्या गोठ्यासाठी मिळणार 80 हजार रुपये 🐓🐐🐃🐂 Animal Husbandry या योजनेअंतर्गत जनावरांच्या गोठ्यासाठी मिळणार 80 हजार रुपये 🐓🐐🐃🐂 Reviewed by Best Seller on 2/06/2023 10:24:00 pm Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

🚶‍♂️💃🚶‍♂️

Blogger द्वारा संचालित.