━━━━━━━━━━━━━
ड्रायव्हिंग लायसंसचे नियम बदलले; सरकारचा मोठा निर्णय
━━━━━━━━━━━━━
💁🏻♂️ नव्याने ड्रायव्हिंग लायसंस बनवणाऱ्यांसाठी सरकारने नवे अपडेट जाहिर केले आहेत. या अंतर्गत तब्बल ३५ वर्षांनंतर ड्रायव्हिंग लायसंसच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले असून या अंतर्गत ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक ऑटोमेटीक करण्यात येणार आहे.
यामुळे ड्रायव्हिंग टेस्ट पास करणं थोडं कठीण होणार आहे. कारण ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकमध्ये लागलेले सेंसर आणि सीसीटीव्हीच्या नजरेत टेस्ट घेतली जाणार होता.
❓ *काय आहेत बदल?*
● सरकारने लर्निंग ड्रायव्हिंग लायसेंसच्या नियमांमध्ये बदल केला गेला आहे.
● नव्या नियमांनुसार लर्निंग ड्रायव्हिंग लायसंस तुमच्या आधार कार्डमध्ये नोंद असलेल्या पत्त्याच्या जिल्ह्यात बनेल.
● पण या निर्णयाने घाबरण्याचं कारण नाही. कारण यासाठी अर्ज कर्त्याला ऑनलाइन टेस्ट द्यावी लागेल.
● याला आधार कार्ड लिंक करावं लागेल.
● हा नवा नियम ऑनलाइन अर्ज करणाऱ्यांसाठी आहे.
● ड्रायव्हिंग टेस्टचं व्हिडीओ रेकॉर्डिंग होईल.
● ऑटोमेटेड ट्रायव्हिंग ट्रॅक मार्चमध्ये सुरु होईल.
● यासाठी सेंसर आणि ओव्हरहेड कॅमेरे लावण्यात येणार आहे.
● एका आठवड्यात ड्राय रन सुरु होणार.
💥 का बनवले हे नियम
ड्रायव्हिंग नीट न येणं तरीही ड्रायव्हिंग लायसंस मिळणं यामुळेच अपघातात वाढ झाल्याचं निदर्शनास आलं आहे.
म्हणून हे नवे नियम बनवण्यात आले आहेत.
सध्या दिल्लीत ३ जानेवारीपासून मॅन्युअल ड्रायव्हिंग टेस्ट बंद करण्यात आली आहे. फेब्रुवारी एंड आणि मार्च पहिल्या आठवड्यात ऑटोमेटेड सिस्टीमची सुरुवात करण्यात आली आहे.
✍🏻✍🏻✍🏻
दुःख इमानदार असतं थेट काळजात शिरत आणि दीर्घकाळ तुमच्या सोबत राहत तर सुख वाफेसारखं असतं घडीभर रेंगाळत आणि बघता बघता उडून जात..!!!
ड्रायव्हिंग लायसंसचे नियम बदलले; सरकारचा मोठा निर्णय
*आज*
*२६ फेब्रुवारी*
*स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर स्मृतिदिन*
जन्म - २८ मे १८८३ (भगूर,नाशिक)
स्मृती - २६ फेब्रुवारी १९६६ (दादर,मुंबई)
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाचा तिरस्कार करणारे समाजसुधारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.
सावरकर हे लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात.
यह तीर्थ महातीर्थो का है,
मत कहो इसे काला पानी,
तुम सुनो यहॉं के धरतीके,
कण-कण से गाथा बलिदानी।
सावरकर १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला. नाशिकच्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना लंडनला अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली.
ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.
मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रान्सच्या भूमीवरून ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण तसे घडले नाही.
ड्रायव्हिंग लायसंसचे नियम बदलले; सरकारचा मोठा निर्णय
मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य. तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते.
बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली. अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन, असे सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात.
पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर, असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाजसुधारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर; अशा अनेक स्वरूपांत ते समाजासमोर आलेले दिसतात. अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानबद्ध केले.
सावरकरांनी १९२७ मध्ये उःशाप हे पहिले नाटक लिहिले. ते नाटक "नाट्यकला प्रसारक मंडळाने" रंगभूमीवर आणले. सावरकरांनी सन्यस्तखड्ग नाटक लिहिले. त्यातील शतजन्म शोधताना हे नाट्य गीत अंगावर रोमांच उभे करते. हे नाटक बळवंत नाटक मंडळाने १९३२ मध्ये सादर केले. उत्तरक्रिया हे त्यांचे नाटक भारत भूषण संगीत मंडळाने सदर केले.
दत्ताराम यांना लहानपणी ऐका रानीत कीचकवध नाटकातील सैरंध्रीची भूमिका पाठ करवून घेवून सावरकरांनी त्यांच्याकडून दुसऱ्या दिवशी सैरंध्री उत्कृष्ट करवून घेतली. १९४३ साली सांगलीस झालेल्या अखिल महाराष्ट्र नाट्य संमेलनाच्या शाताद्भी महोत्सवाच्या अध्यक्षपदाचा मन सावरकरांना मिळाला आहे. सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले.
यही पाओगे मेहशरमें जबां मेरी,
बयॉं मेरा बंदा हिंदवाला हुँ,
यह हिंदोस्ता मेरा
खुशी के दौर दौर है यां रंजो मुहन पहिले
बहार आती है पीछे और खिजां गिरदे चमन पहिले
१९२१ मध्ये अंदमानच्या तुरुंगात असताना त्यांनी उर्दू आणि देवनागरी हस्ताक्षरात लिहिलेल्या २ गझल अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना सावरकरां मधला देशाभिमान आणि लेखक जागा असल्याच्या खुणा पटवणाऱ्या अशा या गझला व गीत आहे.
*💐जर कुणावर चिडणार असाल तर विचार करुन चिडा कारण आजकाल समजुन घेण्याची पध्दत बंद झालीये*🌹🌺💞🙏
*मेल्यावर माणुस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे ,जिवंतपणी माणुस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे.*
*आनंद त्यांना नाही मिळत जे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात, आनंद त्यांना मिळतो, जे दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या आयुष्याचे अर्थ बदलतात.*
*All fingers are not in the same length, but when they bend, all stands equal. Life becomes easy when we bend and adjust with all situations.*
*जी गोष्ट मनात आहे, ती बोलण्याची हिम्मत ठेवा, आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे, ती समजून घेण्याची क्षमता ठेवा.*
*विचार जादूगर की तरह होते है, जो एक ही क्षण में आपका जीवन बदल सकते है, इसिलिये जो भी विचार करो, सदा सकारात्मक और अच्छा ही सोचो ।*
*परमात्मा की कृपा का मतलब यह नही की जीवन में दुःख न आए, लेकिन दुःख में भी आप दुःखी न हो, और वह समय कब बीत जाए, आपको पता भी न चले ।*
*संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही, आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही.*
*मालमत्तेचे वारस कितीही जण असू शकतात, परंतु आपल्या कर्माचे वारस आपणच असतो.*
*एक खुशहाल जीवन जीने के लिये यह स्वीकार करना जरुरी है की, जो कुछ भी हमारे पास है, वो ही सबसे अच्छा है ।*
*आपले मन, आपले विचार, आपला दृष्टिकोन, आपले वागणे, आणि काहीही न लपवता मनमोकळे जगणे यातच खरी सुंदरता असते.*
*🌺सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा...!!!*
*🌺एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका...!!!*
*🌺समाजातील खोट्या राजकारणी व स्वार्थी, मतलबी लोकांपासुन दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा...!!!*
*🌺"प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी कुणावर येईल हे सांगून शकत नाही हे लक्षात ठेवा"...!!!*🙏
🌹🌺🙏🌹🌺🙏🌹🌺🙏🌹
कोई टिप्पणी नहीं: