सदर पदाबाबत राज्यस्तरावरुन वेळोवेळी दिलेल्या निर्देशान्वये प्रक्रिया राबविण्यात येईल. अटी व शर्ती :-
1) विशेषतज्ञ संवर्गातील अनु. क्रमांक 1 ते 10 पदांची थेट मुलाखत दिनांक 12/09/2024 रोजी सकाळी दुपारी 10:00 वा. जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेली आहे. थेट मुलाखती करिता उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व अनुभवाचा मुळ दस्ताऐवज व छांयाकित प्रतीसह उपस्थित राहावे.
2) अ.क्र 11 ते 24 पदे महिला व बाल रुग्णालय, नंदुरबार, जिल्हा रुग्णालय परीसर ता.जि. नंदुरबार या पत्त्यावर पोष्टाद्वारे / अथवा प्रत्यक्षात (By Hand) दि. 10/09/2024 रोजी सायं 5:00 वा. या कालावधीतपर्यंत सादर करावेत.
3) इच्छुक उमेदवारांनी 1) विहीत नमुन्यातील अर्ज 2) वयाचा पुरावा 3) पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षाचेप्रमाणपत्र) 4) सर्व गुणपत्रिका 5) कौन्सील रजिस्ट्रेशनचे वैध प्रमाणपत्र (As Applicable) 6) शासकीय कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे कार्यालय प्रमुखाच्या स्वाक्षरी तथा नाव व मोबईल क्र. सह (अनुभव संबंधित कामाचा असावा) शासकीय अनुभव असल्यास सोबत नियुक्ती आदेशाची प्रत जोडावी 7) जात प्रमाणपत्र इ. छायांकित प्रर्तीसह दि. 10/09/2024 रोजी सायं 5:00 वा.या कालावधीतपर्यंत सादर करावेत.
4) विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस.या रिक्त पदाची प्रत्येक आठडयास दर मंगळवार रोजी थेट मुलाखत घेण्यात
येईल. 5) अधिपरीचारीका (स्टाफ नर्स) पदाकरीता स्त्री प्रर्वगातील उमेदवारांनी अर्ज सादर करावा. पुरुष प्रर्वगातील उमेदवारांचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही यांची नोंद घ्यावी.
6) कागदपत्रे अपूर्ण असल्यास अर्ज नामंजुर करण्यात येईल व कागदपत्रे पुनः प्रस्तुत करण्याची संधी देण्यात येणार नाही.
7) शुल्क - खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु 150/- व राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी रु 100/- चा राष्ट्रीयकृतबँकेचा डिमांड ड्राप्ट " District Integrated Health & Family Welfare Society, Nandurbar " या नावाने देय असलेला असावा
8) पदासमोर नमुद मानधन हे एकत्रित मानधन असुन त्याव्यतिरिक्त इतरकोणतेही भत्ते देय राहणार नाही.
9) सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांचे दिनांक 25 एप्रिल 2016 चे शासन निर्णयास अनुसनरुन अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे व कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे व मागासवर्गीय करीता 43 वर्षे राहील. वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस) व विशेषज्ञ अतिविशेषज्ञ यांची सेवाप्रवेश आणि सेवा समाप्तीची
वयोमर्यादा 70 वर्ष राहील व अभियानातील इतर रुग्ण सेवेशी संबंधित पदांची (उदा. परिचारिका, अधिपरिचारिका, तत्रज्ञ, समुपदेशक, औषधनिर्माता इ.) यांची सेवाप्रवेश व सेवासमाप्तीची वयोमर्यादा 65 वर्ष राहील. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सेवेतील कार्यरत उमेदारांकरिता कमाल सेवा प्रवेश मर्यादा प्रमाणित शारिरीक योग्यता (Physical Fitnes) चे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. वय वर्ष 60 नंतर प्रत्येक वर्षी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडुन शारीरीकदृष्टा सक्षम असल्याचे प्रमाणपत्र पाप्त झालेनंतरच पुर्ननियुक्ती आदेश देण्यात येईल.
10) लहान कुटुंबाची अट दि.23/07/2020 पासून लागुकरण्यात आली असून दि.23/07/2020 पासून दोनपेक्षा अधिक मुले असणारे उमेदवार राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या पदभरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार नाहीत.
11) वरील सर्व पदेकंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधनाची असुन, त्यांचा कालावधी (अकरा महिने 29 दिवस) आपल्या कामगिरी मुल्यांकनावर आधारीत असेलकिंवा त्यापेक्षाकमी कालावधीसाठी भरण्यात येणार आहेत अथवा त्या आधी मंजुरी
न मिळाल्यास पदेकधीही समाप्त करण्यात येतील. 12) वरील नमुद पदेही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे
असलेले नियम अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही तसेच यापदासाठी शासनाचे सेवा नियम लागु नाहीत. 13) केंद्र/राज्य शासनाने संबंधित पदे नामंजुरकेल्यास उमेदवाराची सेवा कोणतीही पुर्वसुचना न देतातात्काळ समाप्त करण्यात येईल.
14) अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध्द कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा,
15) उमेदवारांनी अर्ज करीत असलेल्या पदांचे नाव व सामाजिक आरक्षणानुसार सदर पदाकरीता नमुद प्रवर्ग (जातीचा प्रवर्ग) अर्जामध्ये स्पष्टपणे नमुद करावा जर मागासवीय उमेदवारांनी अर्ज आरक्षणामधुन सादर केलेला असेल, परंतु सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास, उमेदवारांना अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.
16) राखीव संवर्गातुन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी त्या संवर्गाचे जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. जातीचे प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांना विचार केला जाणार नाही. अशा उमेदवारांना राखीव संवर्गाचा लाभही घेता येणार नाही.
17) सहसंचालक (अतात्रिक) रा.आ. अ.मुंबई यांचेक्र राआसो/मनुष्यबळ आरक्षण/24564-774/16 दि.20.07.2016 रोजीच्या पत्रानुसार आवश्यक असणाऱ्या आरक्षित संवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या इतर संवर्गातील उमेदवारांचा जनरल मेरीट लस्टी नुसार विचार करण्यात येईल.
18) विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, प्रयोग शाळा तत्रंज्ञ, स्टाफ नर्स तथा तत्सम इत्यादी पदाकरीता कौन्सिलकडील वैध नोंदणी प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील अन्यथा उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.
19) अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचे सोईनुसार ठिकाण बदलुन मिळण्याची मागणी करता येणार नाही. 20) अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचुक नोंदवाव तसेच ते भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी.
21) भरती प्रक्रिये दरम्यान ज्या-ज्या उमेदवारांना बोलविण्यात येईल, त्या-त्या वेळी यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तसेच सदर उपस्थितीकरीता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देय राहणार नाही.
22) अर्जाचा नमुना जाहिराती सोबत प्रसिध्द करण्यात आलेला असुन सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवारांचा अर्ज
ग्राहय धरण्यात येणार नाही. 23) उमेदवारांचा अर्ज अपूर्ण व अर्धवट भरलेला असल्याने नाकारला गेल्यास सर्वस्वी जबाबदारी ही उमेदवारांची राहील.
24) कोविड - 19 साथ उद्रेक परिस्थितीस अनुसरुन मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा व सामाजिक अंतराचे नियम पाळणे बंधनकारक आहे.
25) एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करावयाचा असल्यास उमेदवारांनी प्रत्येक पदाकरीता स्वतंत्र अर्ज सादर करावेत. 26) आवश्यक असलेल्या पदांकरीता कौशल्य चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्या पदांकरीता पात्र उमेदवारास नियुक्ती आदेश देण्यापूर्वी त्याची जिल्हा स्तरावर कौशल्य चाचणी घेण्यात येईल. कौशल्य चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल.
27) जे उमेदवार शासकीय अथवा निमशासकीय संस्थेमध्ये कार्यरत असतील असे उमेदवारांचे अर्ज अपात्र करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
28) भरती प्रक्रियेचे संपुर्ण अधिकार, पदे कमी जास्त करणे, भरती प्रक्रिया रद्द करणे, अटी व शर्तीमध्ये बदल करणे, इत्यादी सर्व अधिकार व निवड प्रक्रियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा
👉👉👉 जाहिरात लिंक
परिषद, नंदुरबार यांनी राखुन ठेवलेले आहेत.
सदस्य जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक
एनएचएम, नंदुरबार
सदस्य जिल्हा शल्य चिकित्सक
जिल्हा रुग्णालय, नंदुरबार
सदस्य सचिव जिल्हा
आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, नंदुरबार
अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, नंदुरबार
कोई टिप्पणी नहीं: