शेत-जमिनीसाठी पोटहिस्स्यानुसार होणार स्वतंत्र सातबारा || शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.


━━━━━━━━━━━━━

शेत-जमिनीसाठी पोटहिस्स्यानुसार होणार स्वतंत्र सातबारा

━━━━━━━━━━━━━

💯 ग्रामीण भागात सर्वत्र शेतजमिनीवरून भावकीत नेहमीच तंटे आणि भांडणं पाहायला मिळतात. 


अनेकांच्या जमिनी याच कारणांमुळे पडीक होऊन राहिल्या आहेत. मात्र आता यावर एक आनंदाची बातमी आहे आणि ती देखील सरकारी आणि प्रशासन पातळीवरून. कारण गेल्यावर्षीच ठाकरे सरकारने याबाबत संबधित विभागाला आदेश दिले होते.


📝 शेतजमिनीच्या वादातून होणाऱ्या भांडणाचे कारण ठरणाऱ्या पोटहिस्स्याचेही आता स्वतंत्र सातबारा तयार केले जाणार आहेत. भूमी अभिलेख विभागाने यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सातबारा अभिलेख हिस्स्याप्रमाणे वेगळे केले जाणार आहेत. तसेच त्यांचे स्वतंत्र नकाशे तयार केले जाणार आहेत. 

या पद्धतीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.


👉🏻 वडिलोपार्जित जमिनीच्या सातबारा अभिलेखावर बहीण भावांची तसेच सह हिस्सेदारांची नावे असतात. सातबारावरील नावानुसार प्रत्येकाचा हिस्सा निश्‍चित असतो. त्यानुसार वाटणी होऊन जमीन ताब्यात जाते. 


वाटणी झालेल्या जमिनीनुसार वहिवाटही असते. परंतु, अनेकदा सातबारा एकच असल्यामुळे पोटहिस्यावरून भांडणे होतात. असे वाद कोर्टात देखील जातात. तथापि, पोटहिस्स्याचा स्वतंत्र सातबारा अभिलेख तयार करण्यासाठी भूमी अभिलेख उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. 


समितीने केलेल्या शिफारसीनुसार भूमी अभिलेख विभागाच्या संचालकांनी अभिलेख पोटहिस्सा मोहीम राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे.


🗣️ सरपंच, तलाठी व ग्रामसेवक यांच्या सहकार्याने सभा घेऊन या मोहिमेची माहिती देण्यात येणार आहे. संमतीने पोटहिस्याचा सातबारा स्वतंत्र करायचा असेल, तर त्यासाठी तारीख निश्चित होईल आणि भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी, कर्मचारी गावात येऊन अर्ज स्वीकारतील. आठवडाभरात त्या अर्जांवर कार्यवाही होणार असून, सर्व हिस्सेदारांच्या स्वाक्षऱ्या घेतल्यावर प्रत्येकाचे स्वतंत्र नकाशे करून तहसीलदारांकडे वर्ग करण्यात येणार आहेत. तहसीलदार सातबारा स्वतंत्र करतील. त्यासाठी नाममात्र १,००० रुपये एवढे शुल्क आकारण्यात येणार आहे. मोजणीची आवश्‍यकता नसल्यास विना मोजणी सातबारा आणि स्वतंत्र नकाशे करून घेता येणार आहेत. या मोहिमेचा लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार असून, भांडणेदेखील थांबणार आहेत.


नम्र विनंती ह्या पोस्ट ला लॉईक कॉमेट नाही केलात तरी चालेल पण वाचून फॉरवर्ड जरूर  करा -  

🪷🙏🏻🪷



*एक होतं गाव.* 

*"महाराष्ट्र" त्याचं नाव.* 

*गाव खूप छान होतं,*

*लोक खूप चांगले होते.* 

*"मराठी" भाषा बोलत होते,*

*गुण्यागोविंदानं  नांदत होते.* 

*त्यांचं मन  खूप मोठ्ठं होतं.*

*वृत्ती खूप दयाळू होती.*

*दुखलं- खुपलं तर एकमेकांच्या*

*हाकेसरशी धावून जायचे.* 

*आल्यागेल्याला सांभाळून घ्यायचे.*

*एकमेकांना साथ देऊन* 

*जगण्याचं गाणं शिकवायचे,*


*महाराष्ट्रात होता एक भाग.* 

*"मुंबई" त्याचं नाव.*

*मुंबईसुद्धा छान होती;*

*महाराष्ट्राची शान होती.*

*सर्वांच्या आकर्षणाची बाब होती.*

*आजूबाजूचे* *सगळेच मुंबईसाठी* 

*धडपडत होते.*

*इथं आले की* 

*इथलेच होऊन राहत होते.*

*"अतिथी देवो भव...!"* 

*या उक्तीनुसार महाराष्ट्रातील*

*लोकांनी सर्वांचं आदरातिथ्य केलं.*

*पाहुण्यांचा मान म्हणून* 

*मागतील ते देऊ लागले.*


*हळूहळू परिस्थिती बदलू लागली.*

*"अतिथी" जास्त आणि* 

*"यजमान" कमी झाले.*

*मुंबई  कमी पडू लागली,* 

*आजूबाजूला पसरू लागली.* 

*सगळ्यांचीच भाषा वेगवेगळी होती.*


*मराठी आपली वाटत नव्हती.*


*प्रश्न मोठा गहन होता,*

*पण माणसं मात्र हुशार होती,* 

*दूरदृष्टीची होती.*

*त्यांना एक युक्ती सुचली.*

*दूरदेशीची* *परदेशातील भाषा*

 *त्यांना जवळची वाटली.*


*त्यांना वाटलं आपली मुलं* *शिकतील,  परदेशात जातील,* 

*उच्चशिक्षित होतील.* 

*सर्वांचाच, अगदी "महाराष्ट्राचा" ही विकास होईल,* 

*म्हणून त्यांनी याच भाषेतील* 

*शिक्षणाची सोय केली.*

*आजूबाजूला या भाषेत बोलणारे* 

*पाहून मराठी माणसंही खंतावली.*

*आपल्यालाही हे आलंच पाहिजे* 

*म्हणून याच भाषेत शिकू लागली,* 

*शिकवू लागली.* 

*मग हळूहळू मराठी कोणीच शिकेना,* 

*मराठी कोणीच बोलेना,*

*बोलीभाषा ही बदलली.*

*सगळ्याचा नुसता काला झाला.* 

*शुद्ध सुंदर मराठीचा लोप झाला.*


*अशा या* *महाराष्ट्रातील एक* 

*छोटा मुलगा* *आपल्या आईबरोबर*

*माफ करा हं........*

*आपल्या 'मम्मी' बरोबर एकदा*

*वाचनालयात गेला.*

*चुकून त्याचा हात पुस्तकावर पडला* 

*त्यानं ते उघडलं. पुस्तक शहारलं,*

*पानं फडफडली, आनंदित झाली.*

*त्यांना वाटलं* 

*निदान आज तरी आपल्याला* 

*कोणी वाचेल.* 


*इतक्यात त्या मुलानं विचारलं,*

*Which language is this?*


*'मम्मी' खूप सजग होती,*

*मुलाचं हित जाणत होती,* 

*सगळं ज्ञान पुरवत होती.*

*पुस्तक जागेवर ठेवत म्हणाली,* 

*"अरे, खूप पूर्वी म्हणजे* 

*तुझ्या आजोबांच्या वेळेस*

*"मराठी भाषा" प्रचलित होती;*

*आता कोणी नाही ती बोलत.*


*पुस्तक कोमेजलं, पानं आक्रसली,*

*पानांपानांतून अश्रू ठिबकले;*

*पण*

*हळहळ वाटण्याचं काही कारण नव्हतं.*

*कारण आता मराठीसाठी दुःखी होणारं*

*काळीज कोणाचंच उरलं नव्हतं!*


*महाराष्ट्राची शान "मराठी"भाषा!*

*मला एकाने विचारले* 

*तू मराठीत का 'पोस्ट' टाकतोस?*

*आणि, मी त्यांना एवढंच म्हटलं,* 

*आमच्या घरात "तुळस"आहे,*

 *'Money plant'नाही.*

*आमच्या स्त्रिया "मंदिरात" जातात,*

*'PUB' मध्ये नाही.*

*आम्ही मोठ्यांच्या  पायाच पडतो,* 

*त्यांच्या गळ्याला मिठी मारत नाही.*

*आम्ही "मराठी" आहोत,*

*आणि मराठीच राहणार!*

*तुम्ही English मध्ये मेसेज केलात*

*तरी मी रिप्लाय मराठीतूनच देतो,*

*याचा अर्थ असा नाही की,* 

*मला English येत नाही.*

*अरे गर्व बाळगा तुम्ही* 

*मराठी असल्याचा.*

*"काकी" ची जागा* 

*आता 'Aunti' घेते*

*'वडील' जिवंतपणीच "डेड" झालेत.* 

*"भाऊ" 'Bro' झाला...!!*

*आणि "बहीण " 'Sis'...!!!*

*दुध पाजणारी "आई"* 

*जिवंतपणीच 'Mummy'झाली.*

*घरची "भाकर" आता* 

*कशी आवडणार हो*

*५ रु. ची 'Maggi' आता* 

*किती "Yummy" झाली.*

*मराठी माणूसच "मराठी" ला* 

*विसरू लागलाय....*

*आपली संस्कृती लोप पावण्यापुर्वी* 

*ती जपण्याचा निदान प्रयत्न तरी करावा.*

**आजपासूनच* *शक्‍यतोवर मराठी*

*लिहिण्याचा प्रयत्न करूया.*


 *२७ फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आहे. तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जाऊंदे.*




शेत-जमिनीसाठी पोटहिस्स्यानुसार होणार स्वतंत्र सातबारा || शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेत-जमिनीसाठी पोटहिस्स्यानुसार होणार स्वतंत्र सातबारा || शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. Reviewed by Best Seller on 2/25/2023 12:20:00 pm Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

🚶‍♂️💃🚶‍♂️

Blogger द्वारा संचालित.