तलाठी भरतीची प्रक्रिया 15 मार्चपासून सुरू होईल:
👆👆 महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━
💁🏻♂️ राज्यातील तलाठी भरतीसंदर्भात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली असून राज्यात 15 मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असं ते म्हणाले. ते अहमदनगरमधील लोणी येथे महसूल परिषदेत बोलत होते.
▪️गेल्या काही वर्षांपासून राज्यात तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. त्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रियेला गती मिळावी यासाठी पुढाकार घेतला होता.
येत्या काही दिवसांमध्ये चार हजार तलाठी पदांची भरती करणार असल्याचं राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले होतं. दरम्यान, आता राज्यातील या तलाठी भरतीसंदर्भात राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात 15 मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
👉🏻 काही दिवसांपूर्वी राज्याच्या विविध सरकारी विभागांत अनेक वर्षांपासून ‘गट क’ संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यास सरकारने मान्यता दिली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेली तलाठी भरतीची चार हजार पदे भरण्याच्या प्रक्रियेला सरकारने हिरवा कंदील दिला. ही तलाठी भरती प्रक्रिया १५ मार्चपासून सुरू होणार असल्याचं राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितलं.
महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत या जिल्ह्यात काही रिक्त पदांसाठी पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात सविस्तर वाचून जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यात अर्ज ऑफलाईन पोस्टाने सादर करायचे आहेत
पगार ; पगार व इतर भत्ते सरकारच्या नियमानुसार देण्यात येईल.
अर्ज शुल्क ; कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.
शैक्षणिक पात्रता ; पशुवैद्यकीय विज्ञान विषयात पदवी,वन्यजीव विभागात काम केल्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
वयोमर्यादा ; 18 ते 65 वर्ष
निवड पद्धती ; वैयक्तिक मुलाखतीसाठी केवळ प्राथमिक निवड (शॉर्टलिस्टिंग) झालेल्या उमेदवारांना बोलविण्यात येईल .
अर्ज करण्याची शेवटची तारीख ; 24 फेब्रुवारी 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता ; मुख्य वनरक्षक (प्रादेशिक) चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर यांचे कार्यालय, सिव्हिल लाईन, नागपूर रोड, चंद्रपूर – 442401
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Vanvibhag Bharti 2023)
- उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यातच अर्ज करायचा आहे इतर पद्धतीने केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- विधी सल्लागार उमेदवारास मराठी इंग्रजी व हिंदी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक.
- मुलाखतीकरिता येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.
- अर्जामध्ये ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक चालू स्थितीत असलेला सादर करायचा आहे.
- संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे, MSCIT परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
- उमेदवार शारीरिक दृष्ट्या सुदृढ असावा.
- अर्ज पोस्टा द्वारे किंवा प्रत्यक्ष सादर करावेत.
- प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून त्यामधून निवड समितीने निवड केलेल्या निवडक उमेदवारांना मुलाखतीकरिता चंद्रपूर येथे बोलविण्यात येईल.
- मुलाखतीकरिता पात्र उमेदवारांची मुलाखतीची तारीख व ठिकाण अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.
- मुलाखतीस उपस्थित राहण्याकरिता कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही.
अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी
👇👇👇👇
कोई टिप्पणी नहीं: