(TAIT) शिक्षक अभियोग्यता
चाचणी 2023 फॉर्म भरण्यास सुरुवात......
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*📌फॉर्म भरणे:* 31 जानेवारी ते 08 फेब्रुवारी
*📌हॉलतिकीट:* 15 फेब्रुवारी
*📌परीक्षा:* 22 फेब्रु ते 3 मार्च (ऑनलाईन)
*पात्रता:*
D.ED/B.ED (D.ED असल्यास TET किंवा CTET पात्र)
*फीस:* ओपन - ₹950/-
इतर- ₹850/-
*1)10वी/12 वी सनद किंवा मार्कशीट*
*2) पदवी मार्कशीट*
*3) D.Ed/B.Ed मार्कशीट*
*4) आधार कार्ड*
*5) पासपोर्ट फोटो*
*6) सही (काळ्या बॉल पेनने फक्त)*
*7) डाव्या हाताचा अंगठा*
*8) स्वहास्ताक्षरीत डिक्लेरेशन फॉर्म भरणे आवश्यक आहे
काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरे 👇👇👇👇
- महा टेट परीक्षेसाठी पात्रता निकष काय आहेत?
प्राथमिक श्रेणी अंतर्गत MAHA TET साठी उपस्थित राहण्यास आणि अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना खालीलपैकी कोणतेही निकष पूर्ण करणे आवश्यक आहे: उच्च माध्यमिक किंवा समतुल्य 50% सोबत 2 वर्षांचा प्राथमिक शिक्षण डिप्लोमा
उच्च माध्यमिक किंवा
समतुल्य 50% सह 4-वर्षीय B. Ed
- महा TET साठी उत्तीर्ण गुण किती आहेत?
परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना MAHA TET पात्रता गुण 2021 प्राप्त करणे आवश्यक आहे. MAHA TET उत्तीर्ण गुण सामान्य श्रेणीसाठी 60 टक्के आणि अनुसूचित जाती (SC)/ अनुसूचित जमाती (ST)/ इतर मागासवर्गीय (OBC)/ अपंग व्यक्ती (PwD) साठी 55 टक्के आहेत
- Important 👇👇👇👇
परीक्षेचा कालावधी 2 तास 30 मिनिटे
वयोमर्यादा _ वयोमर्यादा नाही
शैक्षणिक पात्रता पेपर _ 1 - 10+2 किमान 50% पेपर 2 - 2 वर्षांचा प्राथमिक शिक्षणाचा डिप्लोमा कोर्स
अनुभव आवश्यक आवश्यक नाही
सर्वसाधारणपणे महाराष्ट्र शिक्षक भरती करिता डीएड आणि बीएड पात्रताधारक TAIT परीक्षा देण्यासाठी पात्र असतील.
इयत्ता १ ली ते ८ वी मधील शिक्षक [Maha Tet परीक्षा पास] पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मध्ये विहित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेले तसेच इयत्ता ९ वी ते १२ वी करिता उक्त नियमावलीत विहित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता धारण केलेले उमेदवार सदर परीक्षेस पात्र असतील.
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी करीता वयोमर्यादा काय आहे.
शिक्षक सेवक पदी किमान वयोमर्यादा १८ वर्ष व कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारा करिता ३८ वर्ष व मागास सवर्ग उमेदवारा करिता ४३ वर्ष राहील.
TAIT Syllabus
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी परीक्षेचा आराखडा व अभ्यासक्रम खालील प्रमाणे.
पेपर साठी २ घटक असतात अभियोग्यता व बुद्धिमता व परिक्षा ही एकून २०० प्रश्नांची व २०० गुणांची असेल, म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण देण्यात येईल.
अभियोग्यता 120 प्रश्न (60% प्रश्न )
बुद्धिमत्ता 80 प्रश्न (40% प्रश्न)
एकूण गुण – 200
वेळ – 2 तास
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही प्रामुख्याने अभियोग्यता व बुद्धिमत्ता या दोन घटकावर आधारित असेल,
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमतामध्ये शेकडा ६०% म्हणजेच १२० प्रश्न हे अभियोग्यता या घटकावर आधारित असतील, तर शेकडा ४०% म्हणजेच ८० प्रश्न हे बुद्धिमत्ता या घटकावर आधारित असतील.
अभियोग्यता या घटकांमध्ये पुढील उपघटकांचा समावेश होतो.
अभियोग्यता
👇👇👇
1. गणितीय क्षमता,
2 तर्क क्षमता,
3. वेग आणि अचूकता,
4. इंग्रजी भाषिक क्षमता,
5. मराठी भाषिक क्षमता,
6. अवकाशीय क्षमता,
7. कल / आवड,
8. समायोजन / व्यक्तिमत्व
बुद्धिमत्ता या घटकामध्ये पुढील उपघटकांचा समावेश होतो.
बुद्धिमता
👇👇👇
1. आकलन,
2. वर्गीकरण,
3. सांकेतिक भाषा,
4. लयबध्द मांडणी,
5. समसंबंध
6. कुट प्रश्न,
7. क्रम श्रेणी,
8. तर्क व अनुमान
इत्यादी उपघटकांचा सर्वसाधारणपणे समावेश करण्यात येईल
TAIT Exam Book | TAIT Book
शिक्षक अभियोग्यता चाचणी साठी उपयुक्त पुस्तके कोणती वापरावी :
कोणत्याही शासकीय परीक्षांची तयारी करण्यासाठी शासकीय पुस्तकांचा वापर जास्त करावा. ही अत्यंत महत्वाची सूचना आपल्या लक्षात असणे गरजेचे आहे. जसे की स्कॉलरशिपची पुस्तके, नियमित अभ्यासक्रमाची पुस्तके (), इतर शासकीय प्रकाशित संदर्भ साहित्य.
शासनाच्या परीक्षेमध्ये खाजगी पुस्तकांचा विचार न करता शासकीय पुस्तकांमध्ये असलेली माहिती किंवा मजकूर मुख्यतः ग्राह्य धरला जातो.
मात्र फक्त शासकीय पुस्तकेच पुरेशी आहेत असे म्हणणे देखील योग्य नाही यासाठी इतर पुस्तकांची लिस्ट या ठिकाणी देत आहे.
यामधील अभियोग्यता घटकांतर्गत खालील विविध उपघटक आहेत, त्यासाठी उपयुक्त पुस्तक सूची देत आहे.
1) गणितीय क्षमता, तार्किक क्षमता, वेग आणि अचूकता या घटकांच्या तयारीसाठी
5 वी व 8 वी स्कॉलरशिप ची पुस्तके कोणतेही अंकगणिताचे
(उदा: पंढरीनाथ राणे, मोकलीकर, सतीश वसे इ) बुक वापरू शकता.
कोकिळा प्रकाशन चे पुस्तके, आर. एस. अगरवाल चे पुस्तके
2) मराठी व्याकरण –
मराठी – सुगम मराठी व्याकरण व लेखन ()
3) इंग्रजी साठी
4) अवकाशीय क्षमता, कल / आवड, “समायोजन/ व्यक्तिमत्व, इत्यादी
यासाठी शिक्षक अभियोग्यता मार्गदर्शक ( ) सर्वात उत्तम राहील, या बुक मध्ये सर्वच घटक खूप छान प्रकारे कव्हर केलेले आहेत. शिवाय संभाव्य प्रश्नपत्रिकाही दिलेली आहे, त्यामुळे तुम्हास प्रश्नपत्रिका स्वरूप कसे आहे समजून घेण्यास मदत होईल.
5) बुद्धिमत्ता
या अंतर्गत येणाऱ्या घटकांच्या तयारीसाठी खालील पुस्तके वापरावीत.
तैसेच 5 वी व 8 वी स्कॉलरशिप ची बुक्स वापरणे अत्यावश्यक आहे. दिलेली बुक लिस्ट जवळपास परिपूर्ण आहे, आपण राहिलेल्या दिवसात त्यातून संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करू शकता …
कोई टिप्पणी नहीं: