मराठीत भाषेत होणार स्टाफ सिलेक्शन परीक्षा 📕📕 केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय



केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय ; १३ प्रादेशिक भाषांचा करण्यात आला समावेश आगामी काळात २२ भाषांमध्ये घेणार परीक्षा केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की , कनिष्ठ पदांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा हिंदी , इंग्रजी या भाषा व मराठीसह १३ प्रादेशिक भाषांमध्ये घेतल्या जातील .

राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या २२ भाषांमध्ये आगामी काळात ही परीक्षा घेण्यात यावी , अशी शिफारस या मुद्द्याच्या अभ्यासासाठी नेमलेल्या समितीने केली होती . त्या शिफारसीचा केंद्र सरकारने स्वीकार केला आहे.

दिवसेंदिवस पदांच्या वाढत्या संख्येमुळे वाढणारा परीक्षांचा पर्यायाने निकालांचा कालावधी व त्यामुळे होणारी आयोग व परीक्षार्थीची गैरसोय लक्षात घेऊन परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले. 

स्टाफ सिलेक्शन कमिशन ( एसएससी ) मल्टि टास्किंग ( नॉन टेक्निकल ) पदांसाठी प्रथमच मराठीसह तेरा प्रादेशिक भाषांतून परीक्षा घेणार आहे . उर्दू , तामिळ , मल्याळम , तेलुगू , कन्नड , आसामी बंगाली , गुजराती , कोकणी , मणिपुरी , ओडिया , पंजाबी या भाषांतूनही परीक्षार्थींना उत्तरपत्रिका लिहिता येतील . 


केंद्रीय कार्मिक खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की , केवळ एखादी भाषा येत नसल्याने कोणालाही नोकरी मिळण्यात अडथळे येऊ नयेत , असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार आहे . त्यामुळे इंग्रजी , हिंदी तसेच १३ प्रादेशिक भाषांमध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे . 


स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात यावी , अशी मागणी मुख्यत्वे दक्षिण भारतातून करण्यात येत होती . त्याचा विचार करून केंद्रीय कार्मिक व प्रशिक्षण खात्याने हा निर्णय घेतला आहे


मागील परिक्षा मधील एक उदाहरण  साठी DEMO देण्यात येत आहे. म्हणजेच निवड प्रक्रिया कशी असते ते आपण पाहू शकता👇👇👇👇👇👇

               सध्या एस. एस. सी. मार्फत निरीक्षक, उपनिरीक्षक, लेखापरीक्षक, तसेच केंद्रीय मंत्रालयाच्या विविध खात्यांमधील साहाय्यक या व अशा २९ पदांसाठी एकत्रितरीत्या एकच परीक्षा घेतली जाते, जिला ‘एकत्रित पदवी स्तर’ किंवा combined Graduate Level (CGL) Exam  (परीक्षा) म्हणतात. 


           ही परीक्षा देशातील सर्वात मोठी परीक्षा असून केंद्रातील महत्त्वाच्या खात्यांमध्ये सुमारे १०-१२ हजार पदे या एकाच परीक्षेमार्फत भरण्यात येतात. परीक्षेचे बदललेले स्वरूप, परीक्षेची नियमियता, परीक्षेची जलद प्रक्रिया, वाढलेली पदसंख्या तसेच महत्त्वाची पदे यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून देशभरातील पदवीधारकांसाठी ही परीक्षा एक आकर्षण बनली आहे.

पात्रता –
१)    उमेदवार भारतीय नागरिक असावा.
२)    मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीप्राप्त असावा.
३)    वय १८ ते २७ वर्ष (राखीव उमेदवारांसाठी नियमानुसार वयोमर्यादेत सूट)
वेळापत्रक –
२०१३ साठी फॉर्म भरण्याची मुदत १९ जाने. – १५ फेब्रुवारी.
परीक्षास्तर-१ दिनांक- १४ एप्रिल-२१ एप्रिल
परीक्षास्तर-२ – २० आणि २१ जुलै २०१३
परीक्षेचे  स्वरूप –
सी.जी.एल. (CGL) परीक्षा तीन स्तरांमध्ये घेतली जाते.
१) परीक्षास्तर-१ (Tier-I)
२) परीक्षास्तर-२ (Tier-II)
३) मुलाखत
या परीक्षेला प्रथमच सामोऱ्या जाणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षेच्या स्वरूपाबद्दल माहिती –
१) परीक्षास्तर १ : वेळ – २ तास, गुण – २००
या स्तरावर निगेटिव्ह माìकग असून प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा होतात. २०११ आणि २०१२ मधील निकालानुसार ७०-७५ गुण मिळालेले विद्यार्थी पहिला स्तर उत्तीर्ण झाले आहेत. या स्तरावर बँक किंवा इतर स्पर्धा परीक्षांसारखे विभागीय उत्तीर्ण (sectional cutoff) होण्याची आवश्यकता नाही, मात्र अंतिम निकालामध्ये स्तर-१ (Tier-I) मध्ये संपादन केलेले गुण ग्राह्य़ धरण्यात येतात.
२) परीक्षास्तर-२ : वेळ – प्रत्येक पेपरसाठी २ तास,  गुण – ४००
या स्तरावर पेपर १ व पेपर ३ साठी निगेटिव्ह माìकग प्रत्येक प्रश्नासाठी ०.५० व पेपर २ साठी ०.२५ गुणांची असेल.
महत्त्वाची टीप- या स्तरामधील पेपर-३ हा फक्त statistical-Investigator-II
(सांख्यिकीय तपासणीस- II ) या पदासाठी देणे आवश्यक आहे.

३) परीक्षास्तर ३ : गुण – १००
१)    या स्तरावर ज्या पदांसाठी मुलाखत आवश्यक आहे अशा पदांकरिता पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाते.
२)    तसेच मुलाखतीनंतर उमेदवाराची संगणक कौशल्य चाचणी (CPT) घेतली जाते, सदर चाचणीसाठी कोणतेही गुण नाहीत. परंतु उत्तीर्ण होणे आवश्यक.
३)    केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या विविध खात्यांमध्ये कर साहाय्यक या पदासाठी डेटा एन्ट्रीची कौशल्य चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
४)    अराजपत्रित (गट-क) मधील पदांसाठी मुलाखत नसते. सदर पदांसाठी अंतिम निकाल जाहीर करताना फक्त स्तर-१ व स्तर-२ मध्ये उमेदवाराने मिळविलेले गुण लक्षात घेतले जातात.
५)    अराजपत्रित (गट-ब) मधील पदांसाठी मुलाखत घेतली जाते व अंतिम निकाल जाहीर करताना स्तर-१, स्तर-२ आणि मुलाखतीमध्ये उमेदवाराने मिळविलेले गुण लक्षात घेऊन अंतिम यादी जाहीर केली जाते.
संदर्भ साहित्य-
सदर परीक्षेसाठी बाजारात बरीचशी पुस्तके उपलब्ध आहेत.
१) इंग्रजी माध्यम –
1) Quantitative Aptitude, verbal-Non-verbal Reasoning and English by Agrawal. .
2) SSC – CGL – Guidebook – Arihant publication..
२) मराठी माध्यम –
१) अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी-पंढरीनाथ राणे.
२) सामान्य ज्ञान – नवनीत प्रकाशन-२०१३. ३)English- Language- Agrawal..

मराठीत भाषेत होणार स्टाफ सिलेक्शन परीक्षा 📕📕 केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय मराठीत भाषेत होणार स्टाफ सिलेक्शन परीक्षा 📕📕  केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय Reviewed by Best Seller on 1/22/2023 10:34:00 am Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

🚶‍♂️💃🚶‍♂️

Blogger द्वारा संचालित.