महाराष्ट्र 'SET 2023' परीक्षेचे प्रवेश पत्र जारी, 'या' लिंकवरून करा डाऊनलोड

🧾 'SET 2023' परीक्षा 


💁🏻‍♂️ महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच सेट परीक्षा 2023 चे प्रवेशपत्र प्रसिद्ध झाले असून जे उमेदवार ही परीक्षा देत आहेत ते अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आणि नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो करून प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी 



सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 

Download करा 

👇👇👇👇

🌐🌐🌐🌐🌐 


या वेबसाईटवरून तुम्हाला तुमचे हॉल तिकीट पाहता येतील. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करू शकता.


📆 *'या' तारखेला परीक्षा होणार* 

MH SET 2023 ची परीक्षा *26 मार्च 2023* रोजी घेतली जाईल. ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असून दोन सत्रात घेतली जाईल. पहिले सत्र सकाळी 10 ते दुपारी 12 आणि दुसरे सत्र सकाळी 11.30 ते 1.30 पर्यंत असेल.


📝 *असे असेल पेपरचे स्वरूप ?* 

महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेत दोन पेपर असतील. पहिला पेपर 50 गुणांचा आणि दुसरा पेपर 100 गुणांचा असेल. परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रश्न येतील, ज्यामध्ये चार पर्यायांपैकी एक निवडावा लागेल. सर्व प्रश्नांचा प्रयत्न करणे अनिवार्य आहे. 


📥 *'असे' करा प्रवेशपत्र डाऊनलोड* 

◆ प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी, सर्वात आधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईट *setexam.unipune.ac.in* वरील होमपेजवरील ॲडमिट कार्ड लिंकवर क्लिक करा.

◆ त्यानंतर जे पेज ओपन होईल त्या नवीन पेजवर तुमचे लॉगिन तपशील भरा आणि एंटर बटणावर क्लिक करा.

◆ आता तुमचे प्रवेशपत्र संगणकाच्या स्क्रीनवर दिसेल.

◆ तुम्ही प्रवेशपत्र तपासून डाऊनलोड करा आणि तुम्हाला हवे असल्यास प्रिंट काढा.

◆ परीक्षेशी संबंधित इतर कोणतीही माहिती मिळविण्यासाठी किंवा तपशील पाहण्यासाठी, फक्त अधिकृत वेबसाईटला भेट द्या. इतर कोणत्याही माध्यमातून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवू नका.



शेतकऱ्यांनी कॉल करून नुकसान भरपाई ची माहिती द्यावी; कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला मोबाइल नंबर जाहीर


💁🏻‍♂️ गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यावर अवकाळी पावसाचे सावट उभे आहे. बर्‍याच ठिकाणी वादळी वार्‍यासह पाऊस झाला तर काही ठिकाणी पिकांना चक्क गारपिटीने झोडपले आहे. त्यामूळे शेतातील पिकांचे भरमसाठ प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल झाले आहेत. रब्बीचे हाता तोंडाशी आलेले पीक अवकाळीने हिरावून घेतले आहे. त्यामूळे सरकार कडून नुकसान भरपाई मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.


📝 बर्‍याच जिल्ह्यांमध्ये पिकांचे पावसामुळे नुकसान झाले असून तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे असे निर्देश मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्या मार्फत देण्यात आले होते. आता पुन्हा एकदा कृषिमंत्र्यांनी महत्वाचा निर्णय घेतला असून याचा फायदा शेतकर्‍यांना होणार आहे.


🧐 नैसर्गिक संकटामुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर बर्‍याचदा काही जिल्ह्यातील किंवा गावातील पिकांचे पंचनामे करण्यास मोठा वेळ लागतो. परिणामी शेतकर्‍यांना नुकसान भरपाई वेळेवर मिळत नाही. हे लक्षात घेऊन नुकसानीची माहिती ताबडतोब सरकारला मिळावी यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी एक मोठे पाऊल उचलले आहे. ही नुकसानीची माहिती ताबडतोब मिळावी यासाठी कृषीमंत्र्यांनी शेतकर्‍यांसाठी थेट आपला मोबाईल नंबर उपलब्ध करून दिला आहे. आता शेतकरी या नंबरवर कॉल करून नुकसान झाल्याची माहिती थेट कृषिमंत्र्यांकडे देऊ शकतात. त्यामुळे आता शेतकर्‍यांना आपल्या पिकाच्या नुकसानीची माहिती थेट कृषिमंत्र्यांना कळवता येणार आहे.


☎️ *कृषिमंत्र्यांच्या या नंबर वर साधा संपर्क* 

आता आपल्या पीक नुकसानीची माहिती सरकार पर्यंत पोहोचवने सोपे झाले आहे. ही माहिती शेतकरी थेट कृषिमंत्र्याच्या नंबर वर पाठवू शकतो. या नंबर वर नुकसान झालेल्या पिकांचा फोटो देखील शेतकरी पाठवू शकतात. त्यासाठी कृषिमंत्र्यांचा मोबाइल नंबर *9422204367* हा आहे. अजून काही नंबर देण्यात आले आहेत. 


📞 *शेतकरी या नंबरांवर देखील कॉल करू शकता.* 

▪️ *022-22876342,* 

▪️ *022-22020433,* 

▪️ *022-22875930.* 



📝 खुशखबर..! 'आरटीई'साठी अर्ज करण्याची मुदत २५ मार्चपर्यंत वाढली.


💁🏻‍♂️ वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी १ मार्चपासून आरटीई प्रवेश प्रक्रियेची नोंदणी सुरू झाली होती, १७ मार्च ही नोंदणीची अंतिम मुदत होती. या तारखेपर्यंत छ. संभाजीनगर जिल्ह्यात १७ हजार ४०४ पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. 


👉🏻 *२५ मार्चपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ* 

प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आता २५ मार्चपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे. बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार (आरटीई) प्रवेश प्रक्रिया दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यातच राबविले जात असते. मात्र, यंदा या प्रक्रियेस मोठा विलंब झाला. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी २३ जानेवारीपासून शाळांची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली. १० फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील ५४६ शाळांनी नोंदणी केली. त्यानंतर १ मार्चपासून विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली. 


📌ही मुदत १७ मार्चपर्यंत होती. दरम्यान, एकाचवेळी नोंदणीसाठी पोर्टलवर भार वाढल्यामुळे ते अनेकदा हँग पडत होते. त्यामुळे अनेक पालक आपल्या पाल्यास प्रवेशाच्या नोंदणीपासून वंचित राहिले. ही बाब लक्षात घेऊन प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आता विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी २५ मार्चपर्यंत मुदत वाढवली आहे.


📝 *संभाजीनगर जिल्ह्यात ५४६ शाळांनी 'आरटीई'साठी केली नोंदणी* 

▪️ नोंदणी केलेल्या शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी ४ हजार ६९ जागा उपलब्ध

▪️१७ मार्चपर्यंत १७ हजार ४०४ विद्यार्थ्यांसाठी झाली नोंदणी






महाराष्ट्र 'SET 2023' परीक्षेचे प्रवेश पत्र जारी, 'या' लिंकवरून करा डाऊनलोड महाराष्ट्र 'SET 2023' परीक्षेचे प्रवेश पत्र जारी, 'या' लिंकवरून करा डाऊनलोड Reviewed by Best Seller on 3/19/2023 03:00:00 pm Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

🚶‍♂️💃🚶‍♂️

Blogger द्वारा संचालित.