━━━━━━━━━━━━━
JEE परीक्षा न देताही घेता येणार आयआयटी मध्ये प्रवेश
असा आहे अभ्यासक्रम.
━━━━━━━━━━━━━
💼 बारावीनंतर आयआयटीमध्ये शिक्षण घेण्याचे बहुतेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. यासाठी विद्यार्थ्यांना अखिल भारतीय प्रवेश परीक्षा (JEE) द्यावी लागते.
पण तुम्हाला माहिती आहे का की JEE न देता आयआयटीमध्ये प्रवेश घेता येतो.
होय, आता आयआयटी मद्रासने बॅचलर इन सायन्स कोर्ससह आयआयटीमध्ये अभ्यास करणे सोपे केले आहे.
आयटी मद्रासमधून डेटा सायन्स आणि ॲप्लिकेशनमध्ये बीएसचा अभ्यास करू इच्छिणारा कोणताही विद्यार्थी www.iitm.ac.in
या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज भरू शकतो.
हा कोर्स पूर्णपणे ऑनलाइन असेल. -
🤔 *प्रवेश कसा मिळेल ?*
विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला दोन प्रकारे प्रवेश मिळू शकतो. जर एखाद्या विद्यार्थ्याने जेईई परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर तो या अभ्यासक्रमात थेट प्रवेश घेऊ शकतो इतर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक परीक्षा द्यावी लागेल.
⛑️ *क्षमता*
कोणत्याही शाखेत शिकणारे १२वीचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. बारावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतलाच पाहिजे असे नाही. अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये गणित आणि इंग्रजी विषय असणे आवश्यक आहे.
📚 *अभ्यासक्रमाची रचना कशी असेल ?*
हा अभ्यासक्रम ४ टप्प्यांत विभागलेला असेल.
🫰🏻 *फी संरचना*
जर तुम्हाला फाउंडेशन कोर्सचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला ३२ हजार रुपये फी भरावी लागेल. दुसरीकडे, जर तुम्हाला फाउंडेशन कोर्ससह डिप्लोमा हवा असेल तर तुम्हाला ९४,५०० रुपये द्यावे लागतील.
▪️फाउंडेशन कोर्ससह दोन वर्षांचा डिप्लोमा करायचा असेल तर त्यांना १ लाख ५७ हजार रुपये शुल्क भरावे लागेल.
▪️विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला २ लाख २१ हजार ते २ लाख २७ हजार फी भरावी लागणार आहे. तर बीएस पदवीसाठी ३ लाख १५ हजार ते ३ लाख ५१ हजारांपर्यंत शुल्क भरावे लागणार आहे.
💰 *अर्ज शुल्क*
सर्वसाधारण प्रवर्गातील आणि ओबीसी प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज भरायचा आहे, त्यांना अर्ज शुल्क म्हणून ३ हजार नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे. तर SC, ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्ज फी म्हणून १५०० रुपये भरावे लागतील.
⚛️ *राशीभविष्य: २१ मार्च मंगळवार..!*
━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━
🐏 *मेष :*
आज तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता असून काळजीपूर्वक व्यवहार करा. विवाहेच्छुकांचे विवाह जुळून सामाजिक क्षेत्रात यशासह प्रसिद्धी मिळेल. व्यापारात लाभ होण्याची शक्यता आहे, मात्र सावध राहा. एखाद्या सहलीचे नियोजन करू शकाल मात्र दुपारनंतर मात्र मानसिक एकाग्रता राहणार नाही. प्रकृती बिघडण्याची शक्यता असून स्वकीयांशी मतभेद होऊ शकतात.
🦬 *वृषभ :*
आजचा दिवस तुम्हाला शुभ आणि फलदायी असून व्यावसायिक स्थितीही अनुकूल राहील. तुमच्या कामाचे योग्य कौतुक होऊन समाजात मान मरातब वाढेल. कामे सहजपणे पूर्ण होऊ शकल्याने काही लाभ पदरी पडण्याची शक्यता आहे. दाम्पत्य जीवनात आनंद दरवळणार असून नवीन कार्याच्या आयोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ होऊन एखाद्या रमणीय स्थळी सहलीचे आयोजन करू शकाल.
👩❤️👨 *मिथून :*
आज प्रतिस्पर्धी आणि वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता आहे. मनोरंजनात्मक वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक पैसा खर्च होऊन व्यवसायात वातावरण चांगले राहील. मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगले असून दुपारनंतर शारीरिक आणि मानसिक दृष्टया अनुकूलता जाणवेल. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खूश झाल्याने धनप्राप्ती संभवते.
🦀 *कर्क :*
आज अवैध्य आणि निषेधार्ह विचारांपासून दूर राहणे चांगले राहील. वाणीवर संयम ठेवण्याची गरज असून कुटुंबात भांडण झाल्याने शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. दुपारनंतर एखादी चांगली बातमी मिळू शकते, मात्र संतती विषयक चिंता निर्माण होईल. नोकरीत वरिष्ठांशी झालेल्या वादामुळे आपल्या मनाला दुःख होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळणे हिताचे राहील.
🦁 *सिंहः*
आज आकस्मिक यश लाभेल. सराकात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करा. नोकरीत बदल किंवा बढतीचे प्रबल योग आहेत. नोकरीत नियोजित कामे वेळेवर कराल. नवनवीन कल्पना आमलात आणाल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. केलेल्या कार्यातून उत्तम धनप्राप्ती होणार आहे. व्यापारात धनवान होण्याचे योग आहेत. आकस्मिकपणे धनलाभ होईल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आरोग्य उत्तम राहिल. मानसिक स्वास्थ लाभेल. प्रवासातुन लाभ होतील.
👩🏻 *कन्याः*
आज यशदायक दिनमान राहील. नोकरीत नवीन संधी मिळतील. आपल्या कार्यक्षेत्रात वाढ व विस्तार होईल. नोकरीत स्थान बदलाची उत्तम संधी आहे. बढ़ती व प्रमोशनचे योग आहेत. आजचा दिवस सफलतापूर्वक व्यतीत कराल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य लाभेल. व्यापारात नविन योजनाची सुरुवात होऊ शकते. जुनी येणी वसुल होतील. उत्पनाचे स्तोत्र वाढतील. राजकिय, सामाजिक कलाक्षेत्रातील व्यक्तींना योग्य लाभ व मानसन्मान प्राप्त होईल. शैक्षणिक कार्यात बौद्धिक कार्यात यश लाभेल. परदेशगमन होईल. प्रवासातून लाभ आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
⚖️ *तूळ :*
आज आपल्या कार्यक्षेत्रात भाग्याची साथ लाभणार आहे. दैवी पाठबळामुळे अल्प प्रयत्नात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. कलाकारांसाठी विशेषत: उत्तम दिवस आहे.आर्थिक स्थिती चांगली राहिल. व्यवसायिकांना नफ्यात वाढ होईल. गृहसौख्य उत्तम राहील. दिवसभर मन प्रसन्न असेल. पत्नी सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. नोकरी व्यवसायात स्वतःच्या विवेक बुद्धीने निर्णय घ्या. आपल्याला यश नक्की मिळेल. शासकीय कामकाजात दिनमान उत्तम आहे. नवीन योजनाची सुरूवात होईल. परमेश्वरावर श्रद्धा वाढेल. आध्यात्मिक कार्य घडेल.साधु संत दर्शन घडेल.
🦂 *वृश्चिकः*
आज अनपेक्षीत यश आणि अनुकूल वातावरण निर्माण होईल. आत्मविश्वास द्विगुणित राहिल. व्यापारात भागीदारीत नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता आहे. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी रहिल. विद्याभ्यासात प्रगती राहिल. संशोधनपर केलेल्या कामास मानसन्मान पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा.
🏹 *धनुः*
आज आपण सावधानीपूर्वक निर्णय घ्यावेत. घ्यावेत. रोजगारात धाडसी निर्णय घेणे टाळावेत. आपणा विषयी गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. मानसिक बौद्धिक ताण वाढणार आहे. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. बुद्धीचे कामे अधिक करू नका. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. कर्ज घेणे आज टाळा. घाई गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहिल. प्रवासात दुर्घटनेची शक्यता आहे. दुरवरचे प्रवास टाळावेत. आरोग्याबाबतीत विशेष लक्ष द्यावे.
🦐 *मकरः*
आज आरोग्याबाबतीत विशेष काळजी घ्या. नोकरीत विरोधक आक्रमक होतील. नोकरीत अतिउत्साही आणि अतिरक पणा टाळा. मानसिक स्वास्थ सांभाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. साकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करावी. अनिश्चिततेमुळे वैचारिक धाडसामध्ये कमतरता येईल. व्यापारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. पत्नीच्या प्रकृतीची चिंता सतावु शकते. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होईल. अनपेक्षित खर्च वाढण्याची शक्यता आहे.
🍯 *कुंभः*
आज अत्यंत शुभ फलदायी दिवस आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींना स्वकर्तुत्व सिद्ध करण्यास वाव राहील. तुमची पदोन्नती आणि प्रगती होईल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. प्रगतीकारक काळ आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात यश संपादन करण्याची संधी मिळेल. प्रेमप्रकरणात यश येईल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. व्यापार कारखानदार वर्गात व्यवसायात वाढ होईल. अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल कराल. अनुकुल वातावरण असणार आहे. मनोबल उंचावेल. मनशांती लाभेल.
🦈 *मीनः*
आज आपणास जोरदार शुभ फळे मिळतील. उन्नतीकारक दिवस आहे. व्यवसायिकांनी मित्रांच्या सहकार्याकडून आर्थिक लाभ होणार आहेत. व्यापारात बदल प्रगती घडविणारे ठरतील. नोकरदार वर्ग कलाकारांना प्रसिद्धि बरोबर यश मिळवून देणारा योग आहे. आपण केलेल्या कष्टाचे चीज होईल. अचानक आर्थिक लाभ मिळेल. व्यवसायिकांना योजना पद्धतीने केलेल्या कामामुळे आर्थिक दृष्ट्या उन्नती होईल. तरुण तरुणींना नोकरी मिळण्यासाठी उद्याचा दिवस उत्तम राहाल. स्पर्धेमध्ये यश मिळेल. एकंदरीत आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करणारा दिवस आहे.
कोई टिप्पणी नहीं: