आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी; ही सुविधा मिळणार मोफत
💁🏻♂️ सरकारी काम असो की खासगी काम असो. किंवा ओळखपत्र म्हणून सुद्धा आधार कार्ड आता आवश्यक झाले आहे. त्यामुळे मुला मुलीच्या जन्मानंतर लगेच आधार कार्ड काढले जात आहेत. परंतु, तुम्ही आधार कार्ड काढून १० वर्ष पूर्ण झाली असतील तर त्याला अपडेट् करणे गरजेचे आहे.
👉🏻 आधार अपडेट करण्यासाठी यापूर्वी ५० रुपये चार्ज आकारला जात होता. मात्र, मोदी सरकारने आता आधार अपडेट करणे फ्री केले आहे. म्हणजेच काय तर, आता यापुढे ऑनलाइन आधार कार्ड अपडेट करणाऱ्या यूजर्सला आता मोफत हे अपडेट करता येवू शकणार आहे.
🆓 पुढील तीन महिन्यांपर्यंत ऑनलाइन आधार अपडेट करणाऱ्याला आता कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. याआधी यासाठी ५० रुपये चार्ज आकारला जात होता. परंतु, आता १५ मार्च २०२३ पासून १४ जून २०२३ पर्यंत हे फ्रीमध्ये करता येणार आहे. याचाच अर्थ १४ जून २०२३ पर्यंत या अपडेटसाठी कोणतेही चार्ज लागणार
🤳🏻 *असे करा ऑनलाईन आधार अपडेट...*
● सर्वात आधी myAadhaar portal वर जा, या ठिकाणी Update your Address Online वर क्लिक करा.
● यानंतर तुम्हाला Proceed to Update Address वर क्लिक करावे लागणार आहे.
● एक नवी विंडो ओपन होईल. ज्यात तुम्हाला १२ डिजिटचा आधार नंबर टाकावा लागेल. नंतर Send OTP वर क्लिक करा.
● या नंतर तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. याला व्हेरिफाय करावे लागेल.
● तुम्हाला तुमचा पत्ता प्रूफला अपलोड करून सबमिट करावे लागेल.
👆🏻वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचे आधार अपडेट होईल. तसेच १४ डिजिटचे URN जनरेट होईल.
आजपासून महिलांना ST प्रवासात 50 टक्के सवलत, शासनाकडून GR जारी
🚌 राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिट दरात 50 टक्के सवलत देणार असल्याचे जाहीर केले. अखेर या आदेशाचा GR निघाला असून आज म्हणजेच शुक्रवारपासून (17 मार्च) एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या या योजनेला *महिला सन्मान योजना* म्हणून ओळखले जाणार आहे.
🚍 राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना 33 ते 100 टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या बसमधून तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. या प्रवाशांच्या तिकीट दरातील शुल्क प्रतिपूर्ती महाराष्ट्र सरकार करणार आहे.
📣 एसटी प्रवासातील सवलतीबाबत शासनाने घोषणा 9 मार्चला केली तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन आदेशाची (GR) आवश्यकता असते. शासन आदेशाशिवाय कोणत्याही घोषणेवर अंमलबजावणी होत नाही. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व महिलांना एसटी महामंडळामधे सरसकट 50 टक्के तिकीट दरामधे सवलत जाहीर केली. परंतु, या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जीआर निघाला नव्हता. परंतु आता अध्यादेश जारी करण्यात आला आहे..
राशीभविष्य : १७ मार्च शुक्रवार
🐏 *मेष*
आज तुमचा भौतिकवादी दृष्टिकोन बदलू शकतो. एखाद्या व्यक्तीला पाहून तुमच्या मनात सहानुभूती, प्रेम आणि परोपकाराची भावना येईल, त्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीला मदत करू शकता. आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर असेल, पण तो मिळवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. आज कुटुंबासोबत काही सुखद क्षण घालवाल.
🦬 *वृषभ*
आजचा दिवस तुम्हाला अडचणीत टाकू शकतो. आज जर तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार खर्च करण्याचा विचार केलात तर ते शहाणपणाचे ठरेल, अन्यथा तुम्ही आर्थिक संकटात सापडू शकता. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. तुमचे आरोग्य चांगले राहील.
👩❤️👨 *मिथुन*
आजचा दिवस तुमच्या कार्यकाळातील बदलाचा दिवस असेल. आज तुम्ही काही प्रकारचे बदल पाहू शकता आणि तुमचे शब्द लोकांची मने जिंकू शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहील. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घेण्याची गरज आहे.
🦀 *कर्क*
आजचा दिवस तुमच्यासाठी काही खास असणार आहे. आज तुमचे काही दूरचे किंवा जवळचे नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतात आणि पाहुणेही दीर्घकाळ राहण्याचा विचार करू शकतात. कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल. आज लहान मुले आनंद लुटताना दिसतील.
🦁 *सिंह*
आज तुमचे कौटुंबिक जीवन चढ-उतारांनी भरलेले असेल. तुमच्या करिअरसाठी धडपड करा. आज तुमच्या कामाच्या ठिकाणी काही अडचणी आणू शकतात, त्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि कौटुंबिक जीवनात हुशारीने पुढे जा.
👩🏻 *कन्या*
या दिवशी तुम्ही तुमच्या लाइफ पार्टनरसोबत कुठेतरी जाण्याचा विचार करू शकता. मुलांकडून आनंद मिळेल. तुम्ही तुमचे काम सुधारण्याचा प्रयत्न कराल आणि एखाद्या जाणकार मित्राच्या सल्ल्याने तुमचे बिघडलेले काम आज पूर्ण होईल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील, त्यामुळे मन प्रसन्न राहील.
⚖️ *तूळ*
आजचा दिवस तुमच्यासाठी सकाळपासून आव्हानात्मक असेल. तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागेल, परंतु तरीही तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडथळ्यांवर सहज मात करू शकाल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांसोबत कुठेतरी सहलीची योजना आखू शकता.
🦂 *वृश्चिक*
आज तुम्ही तुमचे विखुरलेले काम दुपारपर्यंत आटोपून घ्या, अन्यथा तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते कारण आज तुम्हाला घरातील कामांसाठी वेळ मिळणार नाही. आज तुमच्या घरात काही शुभ कार्य होऊ शकतात. आज तुम्ही तुमच्या व्यवसायावर विशेष लक्ष ठेवा कारण कुठूनतरी नुकसान होण्याची शक्यता आहे.
🏹 *धनु*
आज तुम्ही काही महत्त्वाच्या घरगुती कामासाठी घराबाहेर जाऊ शकता. देवावर भरवसा ठेवून सर्व कामे पूर्ण होतील असे वाटत असेल तर तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. जे स्वतःला मदत करतात त्यांना देव मदत करतो. तुम्ही तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे काम जबाबदारीने पार पाडावे.
🦐 *मकर*
आज कोणत्याही व्यक्तीशी वाद घालणे टाळा, असे न केल्यास अडचणीत येऊ शकता. आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमची रखडलेली कामे सहज पूर्ण होतील आणि तुम्हाला कुठून तरी अडकलेले पैसे मिळू शकतात. कौटुंबिक जीवनात खूप प्रेम असेल. विद्यार्थ्यांना प्रगतीचे नवीन मार्ग मिळतील.
🍯 *कुंभ*
आज तुम्हाला तुमच्या क्षेत्रात सावधगिरीने काम करावे लागेल अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल.पर्याय म्हणून नवीन व्यवसाय शोधायला सुरुवात करावी. तुमची आर्थिक चणचण भासू शकते आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. आज तुमचे आरोग्य चांगले राहील.
🦈 *मीन*
आजचा दिवस आनंदाने आणि आरामात जगण्याचा आहे. या दिवशी सर्व कामे तुमच्या मनाप्रमाणे होताना दिसतील, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल, कुठेतरी अडकलेले पैसेही मिळू शकतात. तुमचे आनंदी दिवस पुन्हा येणार आहेत, त्यामुळे तुमचे मन शांत ठेवा आणि तुमच्या कौटुंबिक जीवनातील आनंदी क्षणांचा आनंद घ्या.
कोई टिप्पणी नहीं: