━━━━━━━━━━━━━
१०वी-१२वीचे दोन्ही निकाल जूनमध्येच जूनअखेरीस विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा
━━━━━━━━━━━━━
💁🏻♂️ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सध्या दहावी-बारावी परीक्षा घेतल्या जात आहेत. आज दहावीच्या परीक्षेचा शेवटचा दिवस आहे. उत्तरपत्रिकांची तपासणी युद्धपातळीवर सुरु असून जुन्या पेन्शनच्या संपामुळे बारावीच्या निकालास थोडा विलंब लागणार असून बारावीचा निकाल २ जूनपूर्वी तर दहावीचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर होईल, असा विश्वास बोर्डाने व्यक्त केला आहे.
📝 यंदा बोर्डाच्या परीक्षेसाठी इयत्ता बारावीचे १५ लाख ३० हजार विद्यार्थी तर इयत्ता दहावीचे जवळपास १४ लाख विद्यार्थी बसले होते. कोरोनामुळे मागील वर्षी 'शाळा तेथे केंद्र' अशी परीक्षा पार पडली होती. त्यावेळी १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. पण, हुशार, होतकरू मुलांवर अन्याय होऊ नये म्हणून बोर्डाने यंदा कॉपीमुक्त परीक्षेसाठी 'नांदेड पॅटर्न' लागू केला होता. त्यामुळे शाळांमधील सामुहिक कॉपी प्रकरणांना निश्चितपणे आळा बसला. काही अपवाद वगळता पेपर फुटीचे प्रकार देखील नियंत्रित आले आहेत..
✍🏻 परीक्षा सुरळीत पार पडल्यावर आता निकालाची तयारी युद्धपातळीवर सुरु असून एका शिक्षकाला विषयनिहाय किमान दोनशे उत्तरपत्रिका तपासणीसाठी देण्यात आल्या आहेत. पुढील दोन महिन्यांत सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण होऊन जूनच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात दोन्ही निकाल जाहीर होतील, असा विश्वास बोर्डाने व्यक्त केला आहे.
📝 *जूनमध्ये होईल पुरवणी परीक्षा*
विविध अडचणींमुळे फेब्रुवारी-मार्च महिन्यातील बोर्डाच्या परीक्षेला ज्या विद्यार्थ्यांना बसता आले नाही आणि निकालानंतर ते विद्यार्थी अनुत्तीर्ण होतील, त्यांची पुरवणी परीक्षा जूनअखेरीस होणार आहे. त्यामुळे त्यांचेही शैक्षणिक नुकसान होणार नाही.
शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा; २.१६ लाख विद्यार्थ्यांचा 'टेट'चा निकाल जाहीर
💁🏻♂️ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून पार पडलेल्या 'टेट'चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. दोन लाख १६ हजार ४४३ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला असून आता राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला असून शिक्षक भरतीसाठी आता 'टेट' बंधनकारक करण्यात आले आहे.
📖 २०१९ च्या शासन निर्णयानुसार निश्चित झालेल्या अभ्यासक्रमावर आधारित 'टेट'ची प्रश्नपत्रिका काढण्यात आल्या. पण, परीक्षा खूपच कठीण होती, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. दरम्यान, 'आयपीबीएस' संस्थेच्या माध्यमातून राज्यातील ९३ केंद्रांवर ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने पार पडली होती.
✔️ या परीक्षेत एकपेक्षा अधिक गुण घेतलेला विद्यार्थी देखील उत्तीर्ण असणार आहे. पण, शिक्षक भरती करताना मेरिट यादीवरूनच होणार आहे. जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्याला निश्चितपणे शिक्षक होण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, ५० ते ७० गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याचे सांगितले जात आहे. पण, त्यासंबंधीचा आढावा दोन-तीन दिवसांत घेतला जाणार आहे. त्यानंतर हा निकाल शालेय शिक्षण विभागाकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची पदभरती व खासगी संस्थांमधील शिक्षक भरती पार पडेल.
केंद्र सरकारने दिली सर्वसामान्यांना खुशखबर! एलपीजी सिलेंडरवर मिळणार सबसिडी
━━━━━━━━━━━━━
💁🏻♂️ मागील काही दिवसांपासून गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अशातच केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने LPG गॅसवर सबसिडी जाहीर केली आहे. उज्ज्वला योजना लाभार्थ्यांच्या एलपीजी सिलिंडर सबसिडीबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत सरकारने प्रति एलपीजी सिलिंडर 200 रुपये सबसिडी एक वर्षासाठी वाढवली आहे. हे अनुदान 14.2 किलोच्या 12 एलपीजी सिलेंडरवर देण्यात येणार आहे.
☝🏻1 एप्रिल म्हणजेच नवीन आर्थिक वर्षापासून ही सबसिडी लागू होणार असल्यामुळे सर्वसामान्यांसाठी थोड्या प्रमाणात का होईना पण नक्कीच दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे 1.6 कोटी कुटुंबांना फायदा मिळणार आहे.
💸 केंद्र सरकारकडून प्रत्येक सिलिंडरवर 200 रुपयांचे अनुदान मिळते. म्हणजेच केंद्र सरकारकडून एका वर्षात सबसिडीच्या स्वरूपात लाभार्थ्यांना 2400 रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
🤩
━━━━━━━━━━━━━
*सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राचं गिफ्ट! महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढला; सरकारवर पडणार 'एवढा' बोजा..*
━━━━━━━━━━━━━
💁🏻♂️ मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देत महागाई भत्त्यामध्ये वाढ केली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असून महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरुन ४२ टक्के करण्यात आलेला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी केंद्र सरकारने खूशखबरी दिली आहे. केंद्राने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामधअये ४ टक्के वाढ केलीय. डीए आणि डीआरएमध्ये ही वाढ जानेवारी २०२३ पासून लागू होईल.
💹 मोदी सरकारच्या कॅबिनेटने घेतलेल्या या निर्णयानंतर महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरुन ४२ टक्के झाला आहे. पूर्वलक्षी प्रभवाने ही वाढ लागू होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना याचा लाभ मिळेल.
💰 केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सरकारवर १२ हजार ८१५ रुपयांचा बोजा पडणार आहे. केंद्राच्या या निर्णयाचा फायदा ४७.५८ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. तर ६९.७६ लाख पेन्शनधारकांनाही या निर्णयामुळे लाभ होईल. डीएमध्ये झालेली ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर करण्यात आलेली आहे.
कोई टिप्पणी नहीं: