अर्थसंकल्पात ठळक मुद्दे || आशा अंगणवाडी सेविकांना मानधनात वाढ || अजुन बरेच काही 👇👇👇


━━━━━━━━━━━━━

आशा अंगणवाडी सेविकांना खूशखबर, मानधनात घसघशीत वाढ, अर्थसंकल्पातून मोठी घोषणा

━━━━━━━━━━━━━



🧕🏻 राज्यातील हजारो आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका तुटपुंजा मानधनावर काम करत आहेत. 


अशा आशासेविका आणि अंगणवाडी सेविकांना वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दिलासा दिला असून आज अर्थसंकल्प सादर करताना वित्तमंत्र्यांनी ही घोषणा केली. 

यावेळी ते म्हणाले की, 

राज्यात सध्या सुमारे ८१ हजार आशा स्वयंसेविका तर साडेतीन हजार गटप्रवर्तक महिला कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकांचे सध्याचे मानधन हे ३ हजार ५०० रुपये आहे. तर गटप्रवर्तकांचे सध्याचे मानधन हे ४ हजार ७०० रुपये एवढे आहे. या मानधनात १५०० रुपये एवढी वाढ करण्यात येत आहे.


💹 तसेच अंगणवाडी सेविकांचं मानधन हे ८ हजार ३२५ वरून १० हजार रुपये एवढे करण्यात येत आहे. तर मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ५ हजार ९७५ वरून ७ हजार २०० रुपये करण्यात येत आहे. तर अंगणवाडी मदतनिसांचे मानधन हे ४४२५ वरून ५५०० रुपये करण्यात आले आहे, अशी माहिती वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली.


▪️ *अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची २० हजार पदे भरणार* 

🧕🏻 तसेच अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची २० हजार पदे भरणार असल्याची घोषणाही देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याबरोबरच अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली निर्माण केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्याबरोबरच अर्थसंकल्पामधून देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी इतरही काही घोषणा केल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार असल्याची घोषणाही अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे.


📃 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकोबारायांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली. राज्यात पहिल्यांदाच आयपॅडमधून अर्थसंकल्प वाचन करण्यात येत आहे. टिकवावे धन ज्याची आस करुन या ओवीने फडणवीसांनी सुरुवात केली. यावेळी, यंदाचा अर्थसंकल्प पंचामृतांवर आधारलेला आहे.


🖐🏻 *अर्थसंकल्पाचे महत्त्वाचे पाच मुद्दे* 

▪️फडणवीसांचा अर्थसंकल्प पंचामृतांवर आधारलेला...

▪️शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी

▪️महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसीसह सर्व घटकांना सर्वसमावेशक विकास

▪️भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत विकास

▪️रोजगार हमीतून विकास

▪️पर्यावरणपूरक विकास


1️⃣ *पहिले अमृत शेती विकासावर* 

कांदा उत्पादकांना मदत केली जाईल. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा करण्यात आली. यात केंद्राच्या प्रतिवर्ष प्रतिशेतकरी ६ हजार रुपयांत राज्य सरकार अजून ६ हजारांची भर घालेल. त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी १२ हजार रुपये मिळतील. याचा लाभ १,१५,००० शेतकऱ्यांना होईल. त्यासाठी ६,९०० कोटींची तरतूद.


💰 *गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह योजनाअंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबास २ लाखांपर्यंतचं सानुग्रह अनुदान. आगामी ३ वर्षांत २५ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणलं जाईल.


📲 *पंचनाम्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान

नैसर्गित आपत्तीमुळे नुकसानासाठी शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या दुप्पट दराने मदत दिली. ७ हजार ९३ रुपये निधी देण्यात आला. शेतपीक नुकसानीसाठी आता ठराविक निकषाने मदत देण्यात येईल. १ नोव्हेंबरपासून नवे दर लागू करण्यात आले. नैसर्गित आपत्तीनंतर पंचनामे वेळेत व्हावेत यासाठी मानवी हस्तक्षेप टाळून तंत्रज्ञानाची मदत घेऊन मोबाईलद्वारे ई-पंचनामा केला जाईल. सर्वेक्षणासाठी उपग्रह व ड्रोनची मदत घेऊन संगणकीय प्रणाली वापरली जाईल.


📙 *पिवळ्या व केशरी रेशन कार्ड कुटुंबासाठी...* 

पिवळ्या व केशरी रेशन कार्ड कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर ५००० रुपये, इयत्ता चौथी ४००० रुपये, सहावीत गेल्यावर सहा हजार रुपये आणि अकरावीत आठ हजार रुपये अनुदान दिले जाईल. लाभार्थी मुलीचे वय १८ जागा पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये दिले जातील.


👧🏻 *लेकलाडकी योजना सुरु होणार; महिलांसाठी मोठ्या घोषणा* 

महिला दिन साजरा करण्यात आला, राष्ट्राची प्रगती ही महिला सक्षमीकरणाच्या आधारे ठरवली जाते त्यासाठी आम्ही चौथे सर्वसमावेशक महिला धोरण घोषित करणार आहोत. मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेकलाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल.


✔️ *महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत मोठा बदल* 

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचाराची मर्यादा वार्षिक दीड लाखावरून पाच लाख रुपये करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना केली.


📚 *शिक्षणासाठी....* 

शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, महिला व बालकल्याण विभाग, दिव्यांग कल्याण विभाग, इतर विभागाच्या माध्यमातून अंगणवाडी ते उच्च शिक्षणासाठी १ लाख ८६६ कोटींची गुंतवणूक. शिक्षणाचं महत्त्व लक्षात घेऊन या गुंतवणुकीत वाढ करून १ लाख ११ हजार २८५ कोटी इतका खर्च प्रस्तावित केला आहे.


💹 शिष्यवृत्तीमध्ये मोठी वाढ

विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना मोफत गणवेशही मिळणार आहे.

▪️5 ते 7 वी : 1000 वरुन 5000 रुपये

▪️8 ते 10 वी : 1500 वरुन 7500 रुपये

👔 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार


💰 *शिक्षणसेवकांना भरघोस मानधन

▪️प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : 6000 वरुन 16,000 रुपये

▪️माध्यमिक शिक्षण सेवक : 8000 वरुन 18,000 रुपये

▪️उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : 9000 वरुन 20,000 रुपये

▪️पीएमश्री शाळा : 816 शाळा/ 5 वर्षांत 1534 कोटी रुपये


👩🏻 महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सूट..! अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या महिलांसाठी मोठ्या घोषणा..*

💥 राज्याच्या अर्थसंकल्पात आज महिलांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची घोषणा करण्यात आली असून राज्य परिवहन मंडळाच्या प्रवासात महिलांना तब्बल ५० टक्के सूट देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यांतर्गत प्रवास करताना महिलांना फक्त निम्मे तिकिट द्यावे लागणार आहे. राज्यात लवकरच सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार तसेच महिलांच्या सुरक्षित आणि सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यंटन धोरण तयार कऱणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केला. शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांकरिता केंद्र सरकारच्या मदतीने ५० वसतीगृह स्थापन करणार असल्याची घोषणाही अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.


🗣️ *अर्थसंकल्पात महिलांसाठी करण्यात आलेल्या घोषणा पुढील प्रमाणे-* 


● महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर उभारणार

कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर उभारणार

● मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना करणार

● महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण राबवणार

● माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार करणार

● आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये करणार

● गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये करणार

● अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये करणार

● मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये करणार

● अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये करणार

● अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार

● अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली

विकसित करणार

● शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती करणार

● अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने 'शक्तीसदन' ही नवीन योजना राबवणार. या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा देणार. या योजनेत 50 नवीन 'शक्तीसदन' निर्माण करणार..



अर्थसंकल्पात ठळक मुद्दे || आशा अंगणवाडी सेविकांना मानधनात वाढ || अजुन बरेच काही 👇👇👇    अर्थसंकल्पात ठळक मुद्दे || आशा अंगणवाडी सेविकांना मानधनात वाढ || अजुन बरेच काही 👇👇👇 Reviewed by Best Seller on 3/09/2023 09:28:00 pm Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

🚶‍♂️💃🚶‍♂️

Blogger द्वारा संचालित.