२३ जुलै दिनविशेष
*क्रिकेटपटू युजवेंद्र चहल चा वाढदिवस*
जन्म - २३ जुलै १९९० (जींद,हरियाणा)
टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल चा आज वाढदिवस.
युजवेंद्र चहल हा हरियाणा मधील जिंद जिल्ह्याचा रहिवाशी आहे. युजवेंद्र ला लहानपणा पासूनच क्रिकेट आणि बुद्धिबळची आवड होती. त्याने प्रथम बुद्धिबळद्वारे क्रिडा क्षेत्रात पाऊल ठेवले होते. वयाच्या सातव्या वर्षीपासून त्याने बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली होती. चहलने वयोगटातील बुद्धिबळ स्पर्धेत अनेक सामने खेळले आहेत. २००२ मध्ये राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत १२ वर्षा खालील विजेतेपद पटकावले होते. तर, पुढील वर्षी आशियाई युवा चॅम्पियनशिप मध्ये टॉप २० बुद्धिबळपटू मध्ये होता. तसेच तो ग्रीस मधील विश्व युवा चॅम्पियनशिप मध्ये १६ वर्षा खालील भारतीय बुद्धिबळपटू म्हणून खेळला आहे.
चहलचे नाव एफआयडीइच्या अधिकृत साईट यादीत आहे. त्याचे तेथील गुण १९४६ इतके आहेत. २००९ मध्ये चहलने राष्ट्रीय १९ वर्षांखालील बिहार ट्रॉफीत ३४ विकेट्स घेतल्या होत्या. यासह तो संपूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज म्हणून नावलौकिक झाला. त्याचवर्षी त्याने हरियाणाकडून प्रथम श्रेणीत पदार्पण केले. २०१० मध्ये मुंबई इंडियन्सने चहलला १० लाख रुपयांना विकत घेतले होते. यावेळी त्याने अंतिम सामन्यात आपल्या फिरकी गोलंदाजीने ३-०-९-२ अशी आकडेवारी करत संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर पुढे दोन वर्षात त्याला अवघा एक सामना खेळायला मिळाला होता.
आयपीएलच्या ९ व्या हंगामात चहलने ११ सामन्यात १७.०५ च्या सरासरीने १९ विकेट्स घेतल्या होत्या. यामुळे तो पर्पल कॅपचा मानकरी ठरला. दिल्ली डेअरडेविल्सचा कर्णधार केविन पीटरसनची विकेट ही आपली सर्वात अनमोल विकेट आहे, असे चहल मानतो. बुद्धिबळ आणि क्रिकेट व्यतिरिक्त चहलला फुटबॉल मध्येही रुची आहे. तो त्याचे आवडते फुटबॉलपटू रिअल मॅड्रिड आणि क्रिस्तियानो रोनाल्डो यांना नेहमी समर्थन देत असतो. २०१९ मध्ये युजवेंद्र चहलला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरने सहा कोटींना विकत घेतले होते.
*✹ २३ जुलै ✹*
*अंतराळयात्री सॅली राईड स्मृतिदिन*
जन्म - २६ मे १९५१ (कॅलिफोर्निया,US)
स्मृती - २३ जुलै २०१२ (कॅलिफोर्निया,US)
अंतराळयुगाची म्हणजे 'स्पेस एज' ची सुरुवात झाली ती रशियाकडून. साहजिकच त्या देशाची सर्वच बाबतीत स्पर्धा करणाऱ्या अमेरिकेला स्वस्थ बसवणे शक्य नव्हते. रशियाने पहिला अंतराळवीर अवकाशात पाठवून युरी गागारिनला आणि पहिली महिला अंतराळात पाठवून व्हॅलेन्टिना तेरेश्कोवा यांचा विक्रम घडवला. त्यानंतर लगेच अमेरिकेने आपल्या 'स्पेस प्रोग्रॅम'ला वेग दिला.
१९६०चं दशक पूर्ण होण्यापूर्वीच अमेरिका चंद्रावर माणूस पाठवेल अशी महत्त्वाकांक्षी घोषणा तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी केली. 'हे काम सोपे नाही. पण ते कठीण आहे म्हणूनच आम्ही आव्हान स्वीकारत आहोत' असे स्फूर्तिदायक उद्गार काढून त्यांनी अमेरिकेच्या शास्त्रज्ञांचे मनोबल वाढवले.
त्याचा परिणाम म्हणून 'नासा'च्या कार्याला वेग आला.
रशियाने व्हॅलेन्टिना तेरेश्कोवा आणि स्वेतलाना सॅवित्स्काया या महिलांना १९६३ आणि १९८२ मध्ये अंतराळात पाठवले. मधल्या काळात अमेरिकेचे नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन हे अंतराळवीर १९६९ मध्ये चंद्र पादाक्रांत करून आले, पण तोपर्यंत एखाद्या महिलेला अंतराळात पाठवणं अमेरिकेला जमले नव्हते. १९८३ मध्ये तशी संधी सॅली राइड यांना मिळाली.
वयाच्या ३२ व्या वर्षी अंतराळात जाणारी सॅली राइड सर्वात तरुण महिला अंतराळयात्री ठरली. १९५१ मध्ये अमेरिकेतील लॉस एन्जेलिस येथे जन्मलेल्या सॅलीने भौतिकशास्राचे शिक्षण घेतले होते. तिचे कॉलेजचे शिक्षण शिष्यवृत्तीवर (स्कॉलरशिपवर) झाले होते. विज्ञानाची आवड असलेल्या सॅलीने टेनिस खेळातही प्रावीण्य मिळवले होते. भाषा विषय तिचा आवडता होता. त्यामुळे तिने इंग्लिश आणि भौतिकशास्त्र अशा विषयात पदवी प्राप्त केली. पुढे स्टॅनफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून १९७८ मध्ये तिने 'डॉक्टरेट' (पीएच.डी.) मिळवली.
आंतरतारकीय म्हणजे दोन ताऱ्यांमधील क्ष-किरणांच्या प्रक्रियेविषयी तिने विशेष खगोल भौतिक अभ्यास केला. त्याच वेळी म्हणजे १९७८ मध्ये 'नासा'ने 'स्पेस प्रोगॅम' साठी एक जाहिरात दिली होती. अमेरिकाभरच्या ८००० तरुण-तरुणींनी त्यासाठी अर्ज केले होते. त्यापैकी एकटय़ा सॅली राइडची निवड झाली. यावरून तिची बुद्धिमत्ता जाणवते.
'नासा'च्या कारकीर्दीत सुरुवातीला सॅलीने स्पेसमध्ये जाणाऱ्या अंतराळयानांच्या तंत्रज्ञानाच्या पृथ्वीवरील विभागात काम केले. त्याच वेळी तिने अंतराळयानाचा 'कॅनॅडेरम' रोबोट आर्म विकसित केला. सॅली अंतराळयात्रा करणार असे नासाने ठरवल्यावर तिला हा प्रवास झेपेल का, अशा आशयाचे प्रश्न विचारले गेले. त्यावर 'स्त्री अथवा पुरुष हा प्रश्न येतोच कुठे? मी एक 'ऍस्ट्रॉनॉट' आहे' असे परखड उत्तर तिने दिले. आणि चॅलेंजर या यानातून ती १८ जून १९८३ रोजी अंतराळात झेपावली.
अंतराळात 'रोबर्ट आर्म'चा वापर करून उपग्रहात दुरुस्ती करणारीही ती पहिली महिला ठरली. १९८४ मध्ये सॅली राइड यांना पुन्हा एकदा 'चॅलेंजर' मधूनच अंतराळात जाण्याची संधी मिळाली. तिने एकूण ३४३ दिवस अंतराळात संशोधन करण्यात खर्च केले. पुढे 'चॅलेंजर'ला अपघात झाला. त्याबाबतच्या चौकशी समितीत राइड होत्या.
१९८७ मध्ये सॅली राइड यांनी 'नासा'ची नोकरी सोडली. त्यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले. या उत्साही संशोधक महिलेला कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाने ग्रासले. त्यातच २३ जुलै २०१२ रोजी ६१व्या वर्षी त्या कालवश झाल्या.
*❀ २३ जुलै ❀*
*क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद जन्मदिन*
जन्म - २३ जुलै १९०६ (मध्यप्रदेश)
स्मृती - २७ फेब्रुवारी १९३१ (अलाहाबाद)
ते जन्मतःच आझाद होते आणि संपूर्ण जीवन सुद्धा आझाद म्हणून जगले आणि मृत्यूलाही भेटले ते आझाद म्हणूनच. देश तर आझाद झाला परंतु असे असंख्य आझाद मृत्यूच्या पारतंत्र्यात मात्र विलीन झाले.
आपल्या भारतावर सुमारे १५० वर्षे इंग्रजांचे राज्य होते. स्वराज्य मिळावे यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि अनेकांनी अनेक विविध मार्ग अवलंबिले. अनेक स्वातंत्र्यवीर आपल्या भारतासाठी कसे लढले याचे धडे आपल्याला लहानपणापासूनच दिले जातात. त्यांच्याशी निगडित अनेक किस्से, गोष्टी आपण ऐकत असतो.
असाच एक स्वातंत्र्यवीर आपल्या भारतासाठी स्वतःचे प्राण त्यागून अजरामर झाला. व्यवस्थित भांग पाडलेले काळेभोर केस, हातावर घड्याळ, पिळदार आणि टोकेरी मिश्या आणि एका हाताने त्या मिश्याना पीळ देणारा फोटो आपण पाहिला कि आपल्या ओठांवर लगेच नाव येते आझाद ! चंद्रशेखर आझाद ! जहाल मतवादी आझाद हे आजही सर्वांना प्रेरणा देऊन जातात. आज याच आझादांच्या आझाद अशा आयुष्यावर हा लेख.
*कसे झाले तिवारी ते आझाद ?*
२३ जुलै १९०६ मध्ये, मध्य प्रदेश मधील भाबरा या गावात सीताराम तिवारी आणि जागरानी देवी तिवारी यांच्या पोटी मुलगा जन्माला आला, मुलाचे नाव ठेवले चंद्रशेखर. लहानपणापासूनच ते अभ्यासात हुशार आणि मल्लखांब सारख्या खेळांत प्रवीण होते. या छोट्याश्या गावात चंद्रशेखर यांना स्वतःचे अस्तित्व सापडत नव्हते. वयाच्या १३/१४ व्या वर्षी आपल्या गावात येणाऱ्या एका व्यापाऱ्यासोबत चंद्रशेखर आपला रस्ता बनवत निघाले मुंबई कडे. मुंबई मध्ये आले, काही काळ जहाजावर काम देखील केले, मग संस्कृत शिक्षणासाठी ते गेले बनारस येथे.
मुंबई, बनारस यांसारखी मोठी शहरे त्या काळी स्वातंत्र्य आंदोलनाची केंद्रे होती. याच काळात जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यामुळे संपूर्ण देश दुःखाच्या गर्तेत होता. या आंदोलनांची माहिती सर्वांसारखीच चंद्रशेखर या १५ वर्षाच्या मुलापर्यंत सुद्धा येऊन पोहोचली. त्याने मात्र फक्त या बातम्या ऐकल्या नाहीत, त्याने या बातम्यांचा एक भाग होण्याचे ठरविले आणि या १५ वर्षाच्या मुलाने महात्मा गांधीजी यांनी सुरु केलेल्या असहकार चळवळीत स्वतःला झोकून दिले. त्यांच्या सोबत अनेक विद्यार्थ्यांनी या आंदोलनात भाग घेतला होता, पोलिसांनी अनेक मुलांना अटक केली आणि यात चंद्रशेखर यांना सुद्धा अटक केली गेली.
त्यांच्यावर कोर्टात खटला चालू झाला, याच खटल्यात त्यांना पेश करताच त्यांना नाव विचारण्यात आले, यावर ते म्हणाले, "मी चंद्रशेखर आझाद" आणि बस्स त्या दिवसापासून चंद्रशेखर तिवारी यांना सगळे चंद्रशेखर आझाद म्हणून ओळखू लागले.
*जहाल मतवादी प्रवास*
असहकार आंदोलनातील खटल्यामध्ये शिक्षा भोगून आझाद बाहेर पडले परंतु देशासाठी आता आक्रमक वृत्तीने आपल्याला पेटून उठले पाहिजे आणि इंग्रजांना जश्यास तसे उत्तर दिले पाहिजे या विचाराने आझाद स्वस्थ बसू शकत नव्हते. गांधीजींनी लोकांच्या हिंसक पद्धतींमुळे असहकार आंदोलन स्थगित केले आणि मग आझाद यांना आपला मार्ग बदलावासा वाटला. फक्त अहिंसेने क्रांती येणार नाही तर त्याला हिंसेची सुद्धा जोड हवी म्हणून चंद्रशेखर आझाद यांनी जहाल मतवाद्यांचा मार्ग स्वीकारला आणि आझाद यांनी खऱ्या अर्थाने भारताच्या आझादीकडे पाऊले टाकली.
या प्रवासात ते अनेकांना भेटले आणि यातूनच ते जोडले गेले हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेसोबत. ते मनापासून या संघटनेचा भाग झाले आणि संघटनेसाठी प्रचार करीत असत. या संघटना चालवायच्या म्हणजे पैसे हवेत आणि पैसे मिळवण्यासाठी आझाद या संघटनेसोबत मिळून अनेक सरकारी मालमत्तेवर दरोडा टाकायचे. या इंग्रज सरकारने भारताला बरेच लुटले, आता वेळ होती आपण त्यांना लुटण्याची. या छोट्या मोठ्या चोऱ्या आणि लूटमार करून आझाद स्वस्थ नव्हते, त्यांच्या भक्कम शरीरयष्टी, बुद्धिमत्ता, पडेल ते काम करायची हिम्मत आणि निर्णयक्षमता या गुणांमुळे ते लवकरच संघटनेचा एक उत्तम, विश्वासू चेहरा आणि पुढारी बनले.
*काकोरी आणि बरंच काही :*
नियमित अभ्यास, कसरत, बंदुकीसारख्या शस्त्रांचा सराव यामुळे आझाद आता अतिशय तरबेज झाले होते. अशा छोट्या मोठ्या चोऱ्या करण्यापेक्षा आता एक मोठा झटका देणे त्यांच्या मनात आले. यातूनच त्यांना युक्ती सुचली काकोरी लूटमारीची. ९ ऑगस्ट १९२५ मध्ये काकोरी येथे इंग्रजांच्या खजिन्याची मालगाडी जात असताना अचानक त्या मालगाडीवर हल्ला करून मोठी धनसंपत्ती या क्रांतिकारकांनी गोळा केली.
या घटनेने इंग्रजांना चांगलेच हादरवून सोडले. त्यांनी आरोपींवर ताबडतोब खटले चालविले आणि या काळात आझाद आपला वेष बदलून अज्ञातवासात आपले कार्य करीत होते. या आरोपींमध्ये हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे अध्यक्ष बिस्मिल आणि त्यांच्यासोबत संघटनेचे अनेक महत्त्वाचे क्रांतिकारी सामील होते आणि या सर्वाना फाशीची शिक्षा सुनावली गेली.
संघटनेचा मुख्य आधार गेल्यावर संघटना विखुरली गेली. आझाद यांच्या खूप प्रयत्नांनंतरही काही झाले नाही. परंतु त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत. कालांतराने त्यांची ओळख भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू अशा क्रांतिकारकांशी झाली आणि मग आझाद यांना बळ आले. त्यांनी भगत सिंग, सुखदेव आणि अजून काही साथीदारांसोबत मिळून पुन्हा हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना करायचे ठरविले आणि अखेर सप्टेंबर १९२८ मध्ये त्यांनी हिंदुस्थान सोसिएलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. आता या संघटनेचे आझाद हे प्रमुख होते आणि या संघटनेमध्ये भगत सिंग आणि त्यांचे साथीदार अतिशय उल्लेखनीय कामगिरी बजावत होते.
या नंतर या संघटनेमार्फत बॉम्ब बनविणे, शस्त्रसाठा जमा करणे आणि अशी अनेक क्रांतिकारी कामे केली जात होती. अशातच भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. आता आझाद पुन्हा एकटे, तरीही हार न मानता त्यांनी या तिघांना सोडविण्याचे सर्व प्रयत्न केले परंतु ते निष्फळ ठरले. तरीही आपल्या क्रांतिकारी कामांमध्ये आझाद यांनी खंड पडू दिला नाही. आता तर ते अजून आक्रमक झाले आणि १९२९ मध्ये त्यांनी चक्क दिल्ली जवळील व्हाइसरॉयची अक्खी रेल्वे गाडी बॉम्ब लावून नेस्तनाबूत केली. आता मात्र इंग्रज अजूनच दचकले आणि आझाद यांना पकडण्याचे त्यांचे प्रयत्न अजून जोरात चालू झाले. अनेक प्रयत्नांनंतरही इंग्रज आझाद यांना पकडू शकत नव्हते.
*आहे आझाद नि राहीन आझाद :*
आपल्या संघटनेची सुटत चाललेली एकता, अनेक क्रांतीकारकांना खटल्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न, संघटनेसाठी धन गोळा करण्याचे विविध मार्ग या साऱ्यांचा विचार आझाद यांच्या मनात घर करून होता. त्यांचे अनेक साथीदार त्यांच्या विरुद्ध झाले होते याची देखील त्यांना खबर लागली नव्हती. २७ फेब्रुवारी १९३१ रोजी अलाहाबाद येथील अल्फ्रेड उद्यानात आझाद आपला साथी सुखदेव (फाशी गेलेला सुखदेव नाही) याच्यासोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करीत होते आणि अनेक समस्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत होते.
अशातच त्यांचा एक जुना साथीदार वीरभद्र तिवारी याने त्या भागातील पोलीसांना बातमी दिली कि तुम्ही ज्या आझादला शोधून दमला आहात तोच आझाद सध्या अल्फ्रेड उद्यानात तुम्हाला सापडेल. ताबडतोब इंग्रज अधिकारी आपल्यासोबत मोठी फौज घेऊन उद्यानाकडे रवाना झाले. या प्रकारची खबर आझाद यांना मुळीच नव्हती.
अनेक विषयांवर चर्चा करत ते सुखदेव सोबत एका झाडाच्या सावलीत बसलेले होते. अचानक एकाएकी अक्खे उद्यान इंग्रजांनी काबीज केले आणि आझाद यांना शरण येण्याची आज्ञा करण्यात आली, केलेली आज्ञा धुडकावून आझाद यांनी आपली पिस्तूल काढली आणि ते इंग्रजांवर गोळीबार करू लागले. यातच इंग्रजाची गोळी थेट आझाद यांच्या मांडीवर येऊन लागली. यातनांना कुरवाळत बसायला वेळ नव्हता, सगळं कठीण होऊन बसलं होतं.
पिस्तूल छोटी, त्यात गोळ्या सुद्धा मोजक्या आणि समोर अक्खी पोलीस फौज आणि मागे अनेक जबाबदाऱ्या आणि या साऱ्याच्या पलीकडे माझ्या भारत मातेचे स्वातंत्र्य. काय करावे काही सुचेना. त्यांनी सुखदेव याला सुखरूप पळण्यास वाट दिली आणि पुढील देशकार्य चालू ठेवण्यास सांगितले.
इंग्रजांच्या गोळीबाराला आझाद उत्तर तर देत होते परंतु हळूहळू परिस्थिती बदलून गेली. आझाद एकटे आणि मोजक्या बंदुकीच्या गोळ्या. याउलट इंग्रजांची फौज आणि अमाप गोळ्या. कसा मुकाबला व्हावा ?
लढता लढता शेवटची एक गोळी शिल्लक राहिली. काय करावे ? इतरांसारखे इंग्रजांना शरण जावे आणि मग त्यांनी आज्ञा दिल्यावर फाशी जावे ? त्यांचा विजय होऊ द्यावा कि आझाद हे नाव सार्थ करावे ?
आझाद यांनी पहिल्यांदा जेव्हा पोलिसांच्या तावडीतून स्वतःची सुटका केली होती तेव्हाच ठरविले होते कि आझादला या पुढे कोणताही पोलीस हात लावू शकणार नाही आणि कोणतेही कारागृह बंद करून ठेऊ शकणार नाही आणि इंग्रजांच्या बेड्या कधीही माझ्या हाताची कार्यक्षमता जखडु शकणार नाहीत. आपला हा निश्चय टिकविणे त्यांना जास्त योग्य वाटले. त्यांनी मन घट्ट केले, शेवटची एक गोळी पिस्तुलात टाकली. भारतमातेला आठवून तीच पिस्तूल आपल्या कपाळाला लावून त्यांनी स्वतःला संपविले.
इंग्रज आले पण आझाद नाही तर आझादांचा मृतदेह त्यांच्या हाती आला. आझाद यांनी आपले नाव सार्थ केले. ते जन्मतःच आझाद होते आणि संपूर्ण जीवन सुद्धा आझाद म्हणून जगले आणि मृत्यूलाही भेटले ते आझाद म्हणूनच. देश तर आझाद झाला परंतु असे असंख्य आझाद मृत्यूच्या पारतंत्र्यात विलीन झाले.
ते आझाद होते नि आझाद म्हणूनच राहिले !
प्रणाम या भारतमातेच्या थोर पुत्राला !
*२३ जुलै *
*भारतीय प्रसारण दिन*
आपण गेले कित्येक वर्षे ज्यावर संगीत, माहिती व इतर गोष्टीचा आनंद घेत आहोत, ज्याने आपले बालपण नि तरुणपण आनंदात गेले त्या आकाशवाणीचा आज प्रसारण दिन.
भारतात २३ जुलै १९२७ रोजी मुंबई आणि कोलकाता येथे आकाशवाणीचे प्रसारण सुरू झाले. त्यामुळे दरवर्षी २३ जुलै हा 'भारतीय प्रसारण दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.
‘नमस्कार! हे आकाशवाणीचे केंद्र. सकाळचे ६ वाजून ३५ मिनिटे झाली आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम...’ बोलणारी व्यक्ती अदृश्य; तरीही परिचयाची. आवाजातील सातत्य आणि न चुकता तो ऐकण्यातील नियमितता. अशावेळी कुठल्याही दृश्याकृतीची गरज भासत नाही. आपोआपच एक अनामिक बंध जुळला जातो.
स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ चे स्वातंत्र्योत्तर काळात आकाशवाणी (१९५७) असे नामकरण झाले. ‘आकाशवाणी’ हे संयुक्तिक नाव थोर साहित्यिक व नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी सुचविले होते. त्यानंतर सुरु झालेली आकाशवाणीची वाटचाल हा भारतीय संस्कृतीच्या आणि एकूणच भारतीयत्वाच्या सर्वंकषतेचा परिपाकच म्हणावयास हवा.
देशभरात आकाशवाणीची ४१० केंद्रे असून २० अवघ्या महाराष्ट्रातच आहेत. ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान ते विभिन्न कला-सांस्कृतिक मूल्यांची रुजवात, रोजच्या घडामोडी ते आदर्शवत जीवनपद्धतीचा अवलंब अशा अनेकविध गोष्टी आबालवृद्धांसहित प्रत्येक वयोगटासाठी हाताळण्यातील संवेदनशीलता, जवळपास २३ भाषांतील प्रसारणाचा प्रचंड आवाका आणि मागील ९० वर्षे सातत्याने त्यातील भाषिकस्तर कायम राखण्याचे कसब, या सर्व गोष्टी खरोखरच वाखाणण्याजोग्या आहेत.
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे तत्व चालवत आकाशवाणीची अतिशय जोमाने वाटचाल चालू आहे. जागतिकीकरणानंतर आलेल्या खाजगीकरणाच्या लाटेत अनेक व्यावसायिक माध्यमांचा पसारा वाढला. सुरुवातीला मात्र आकाशवाणी हे मनोरंजन व जनप्रबोधनाचं, सरकारी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचं सशक्त माध्यम होतं. ‘संगीत सरिता’ ही शास्त्रीय संगीताच्या जलशांची वाहिनी तर ‘विविध भारती’ या आकाशवाणीच्या व्यावसायिक वाहिनीवरुन विविध सिनेसंगीत प्रसारित होतात.
भाषावार प्रांतरचनेप्रमाणे राज्यांतर्गत येणाऱ्या आकाशवाणी केंद्रावरुन त्या-त्या राज्यभाषेतील सुगम-संगीतांचे कार्यक्रम होतात. नाट्य-संगीत हे सुरुवातीला सुगम-संगीत या प्रकारात समाविष्ट होते. परंतु त्यातील शब्द-स्वरांचा सुरेख समन्वय लक्षात घेऊन त्यास आकाशवाणीतर्फे उपशास्त्रीय संगीताचा दर्जा देण्यात आला.
मनोरंजनासोबतच बाल, युवा, महिला यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी गंमत-जंमत, युवावाणी, वनिता मंडळ असे कार्यक्रम प्रसारित होतात. अशा कार्यक्रमातून त्या-त्या वयोगटाचे भावविश्व व्यक्त होत असते. त्यातूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचीही जडण-घडण होत असते. त्याच प्रमाणे कामगार सभा, कृषीवाणी, माझं आवार माझं शिवार अशा माहितीपर कार्यक्रमांचा कामगार आणि शेतकरी बांधवांनाही फायदा होतो. त्यामुळे आकाशवाणी ही कित्येकांच्या रोजच्या जगण्यातील आधारस्तंभ बनली आहे.
येथे पुनर्प्रसारण, ज्याला आपण रिपीट ब्रॉडकास्ट म्हणतो, ते एक-दीड-दोन वर्षांतून कधीतरी होते. कारण येथे सृजनशीलतेला बराच वाव असून श्रोत्यांना उत्तम व सकस खाद्य ‘कंटेट’ पुरविण्यावर प्रामुख्याने भर दिला जातो. त्यामुळे आकाशवाणीवरुन प्रसारित होणारी कुठलीही गोष्ट ही संयत असते. त्यात ना ‘ब्रेकींग न्यूज’ चा धडाका असतो, ना भावनांचा उद्रेक. निर्मळ आनंद देताना वास्तवाची जाणीव आणि त्यातूनही चांगलं कसं शोधावं हा विचार आकाशवाणी आपल्या श्रोत्यांना देत असते.
यात सतत बदलणाऱ्या सुधारित तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना आकाशवाणीने विकसित केलेले स्वतःचं ‘ऑल इंडिया रेडिओ’ हे अॅप असेल, ‘न्यूज ऑन एअर’ अंतर्गत दर तासाला एखादा नंबर फिरवून चालू घडामोडीतील कुठल्याही तीन बातम्या मिळवणे असेल, आपल्या बलस्थानांवर भर देऊन, आपलं मूळ टिकवून नव्या जगाशी नव्या काळाशी जोडले जाणे हे आकाशवाणीचे नव्या पदार्पणातलं ध्येय आहे. कारण ज्यावेळी ‘तुमचा कार्यक्रम ऐकताना जगणं सुसह्य होतं’ अशी प्रतिक्रिया आकाशवाणीतील उमा दीक्षिता सारख्या अनेक कर्मचाऱ्यांना श्रोत्यांकडून मिळते. इतक्या वर्षांचे सहसंबंध दृढ होत असतातच; पण त्याचबरोबर ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ ही बहुआयामी उद्घोषणा सार्थ ठरत असते.
शनिवार, 23 जुलाई 2022 के मुख्य सामाचार
- 🔸देश में कोरोना हो रहा खतरनाक, पिछले 24 घंटे में 21,880 नए केस मिले, 60 की मौत
- 🔸बंगाल शिक्षा भर्ती घोटाले में टीएमसी नेता पार्थ चटर्जी के करीबी के घर ईडी की छापेमारी, 20 करोड़ कैश बरामद
- 🔸ईडी की भगोड़े नीरव मोदी पर बड़ी कार्रवाई, हांगकांग में जब्त की 253 करोड़ की प्रोपर्टी
- 🔸शिवसेना पर किसका होगा अधिकार-एकनाथ शिंदे या उद्धव ठाकरे? चुनाव आयोग ने मांगे दोनों गुटों से दस्तावेज
- 🔸किसकी शिवसेना असली? चुनाव आयोग ने शिंदे और उद्धव गुट को बहुमत साबित करने बुलाया
- 🔸बिहार के फुलवारी शरीफ टेरर मॉड्यूल मामले की जांच करेगी NIA, गृह मंत्रालय ने जारी किया नोटिस
- 🔸पश्चिम बंगाल में 21.22 करोड़ का Gold बरामद, तस्कर बांग्लादेश की ओर भागे
- 🔸ITR Filing: जल्द भर लें आयकर रिटर्न, सरकार ने कहा - 31 जुलाई से आगे नहीं बढ़ेगी डेडलाइन
- 🔸UNSC में भारत की स्थायी सदस्यता को चार देशों का साथ, चीन अभी भी खिलाफ
- 🔸UK Elections: नए सर्वे में ब्रिटेन पीएम की दौड़ में ऋषि के मुकाबले लिज आगे, उम्मीद कायम
- 🔸लाइव रूस-यूक्रेन के बीच अनाज की सप्लाई को लेकर हुआ अहम समझौता, निगरानी के लिए तुर्की में बनेगा सेंटर
- 🔸National Herald Case: 25 के बजाय सोनिया गांधी 26 जुलाई को होंगी ED के सामने पेश, भेजा गया नया समन
- 🔸CBSE 10वीं में हरियाणा के छात्रों ने किया टॉप:अंजलि और पूर्वांशु देश में पहले स्थान पर; किसी सब्जेक्ट में नहीं कटा कोई नंबर
- 🔸Udaipur News: एनआईए ने कन्हैया हत्याकांड के आठवें आरोपी को किया गिरफ्तार, साजिश में निभाई थी अहम भूमिका
- 🔸जम्मू-कश्मीर के डोडा में आतंकी ठिकाने का भंडाफोड़, हथियार और गोला-बारूद बरामद
- 🔸केजरीवाल सरकार ने शराब माफिया को पहुंचाया फायदा, मुख्यमंत्री को देना चाहिए जवाब : भाजपा
- 🔸'सऊदी अरब की यात्रा की, विदेशी योगदान मिला': सुरक्षा एजेंसियों की नजर में जुबैर
- 🔹IND vs WI: रोमांचक मैच में भारत ने वेस्टइंडीज को 3 रन से हराया
- *♨️मुख्य समाचार*
- *◼️श्रीमती द्रौपदी मुर्मू देश के 15वें राष्ट्रपति के रूप में सोमवार को शपथ ग्रहण करेंगीं*
- *◼️अंटार्टिक विधेयक 2022 पारित होने के साथ लोकसभा की कार्यवाही दिनभर के लिए स्थगित, राज्यसभा की कार्यवाही सोमवार दो बजे तक स्थगित*
- *◼️रेलवे ने विभिन्न समूह-ग पदों के लिए एक लाख 68 हजार से अधिक उम्मीदवारों की भर्ती की*
- *◼️केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड ने दसवीं और बारहवीं कक्षा के परीक्षा परिणाम घोषित किये, प्रधानमंत्री ने परीक्षा उत्तीर्ण करने वालों को बधाई दी*
- *◼️68वें राष्ट्रीय फिल्म पुरस्कारों की घोषणा*
- *🇮🇳राष्ट्रीय*
- *◼️विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकर जापान के पूर्व प्रधानमंत्री शिंजो आबे को श्रद्धांजलि देने के लिए उनके मित्रों और प्रसंशकों के साथ जुड गए*
- *◼️शिक्षा मंत्री धर्मेन्द्र प्रधान ने सी बी एस ई के दसवीं और 12वीं कक्षा के परीक्षा परिणामों पर विद्यार्थियों को शुभकामनाएं दी*
- *◼️नारी शक्ति पुरस्कार-2022 के लिए आवेदन आमंत्रित*
- *◼️सूचना और प्रसारण राज्य मंत्री डॉक्टर एल मुरूगन ने आज श्रीमती द्रौपदी मुर्मू से मुलाकात की*
- *◼️पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव ने आज यूनाइटेड किंगडम कॉप-26 के अध्यक्ष आलोक शर्मा से मुलाकात की*
- *🌍अंतरराष्ट्रीय*
- *◼️श्रीलंका में नए मंत्रिमंडल को शपथ दिलाई गई*
- *◼️यूरोप में गर्मी का प्रकोप महाद्वीप के पूर्व की ओर बढा*
- *◼️इटली के राष्ट्रपति सरगियो मातारेला ने संसद भंग की*
- *🏏खेल जगत*
- *◼️राष्ट्रमंडल खेलों का आयोजन बर्मिंघम में 28 जुलाई से आठ अगस्त के बीच किया जा रहा है*
- *◼️पहली खेलो इंडिया फेंसिंग विमेंस लीग सोमवार से नई दिल्ली में शुरू*
- *◼️खेल मंत्री अनुराग ठाकुर ने नीरज चोपड़ा, रोहित यादव और एल्धोस पॉल को उनके उत्कृष्ट प्रदर्शन के लिए बधाई दी*
- *🇦🇶राज्य समाचार*
- *◼️केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आज गुजरात पुलिस के लिए वाहन और मोबाइल चोरी की ई-प्राथमिकी दर्ज करने की प्रणाली का उद्घाटन करेंगे*
- *◼️जम्मू-कश्मीर के डोडा जिले में एक आतंकवादी ठिकाने से हथियार और गोला-बारूद बरामद*
- *◼️केरल में एक और व्यक्ति संक्रामक बीमारी मंकीपॉक्स से पीडित पाया गया*
- *◼️जम्मू-कश्मीर के विद्यार्थियों के लिए इस वर्ष प्रधानमंत्री विशेष छात्रवृत्ति योजना में पंजीकरण शुरू*
- *◼️उपराज्यपाल ने दिल्ली सरकार की आबकारी नीति की केंद्रीय अन्वेषण ब्यूरो से जांच कराने की सिफारिश की*
- *💰व्यापार जगत*
- *◼️बम्बई शेयर बाजार का संवेदी सूचकांक 56 हजार 72 पर बंद*
- *☔आज के मौसम का पूर्वानुमान*
- *◼️राष्ट्रीय राजधानी दिल्ली में आमतौर पर बादल छाए रहेंगे और मध्यम बारिश का अनुमान है। न्यूनतम तापमान 28 और अधिकतम 33 डिग्री सेल्सियस रह सकता है।*
- *◼️मुम्बई में भी बादल छाए रहेंगे और हल्की वर्षा के आसार हैं। तापमान 25 और 31 डिग्री सेल्सियस के बीच रहने की संभावना है।*
- *◼️कोलकाता में सामान्यतः बादल छाए रहेंगे और एक या दो बार गरज के साथ बौछारें पड़ने की संभावना है। तापमान 27 और 33 डिग्री सेल्सियस के आसपास रह सकता है।*
- *◼️चेन्नई में गरज के साथ बारिश का अनुमान है। न्यूनतम तापमान 24 और अधिकतम 35 डिग्री सेल्सियस रहने के आसार हैं।*
- *🚫चेतावनी: इस न्यूज़ बुलेटिन में दिए गए आंकड़े व समाचार भारत सरकार की न्यूज एजेंसी से लिए गए हैं अपने स्तर पर उनमें किसी तरह का बदलाव ना करें इसके लिए आप स्वयं जिम्मेवार होंगे*
२३ जुलै २०२२ दिनविशेष>> चालू घडामोडी >> मुख्य समाचार 📚🖋️📚
Reviewed by Best Seller
on
7/23/2022 09:10:00 am
Rating:
कोई टिप्पणी नहीं: