महाराष्ट्र शासनाच्या कृषि पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अखत्यारितील कृषि आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील सहायक प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र कृषि प्रशासकीय सेवा,गट_ब संवर्गातील पद भरती करीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत
मुदत-१५ जुलै २०२२
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या
भरावयाच्या उपरोक्त संवर्ग / पदांचा सामाजिक / समांतर आरक्षणाबाबतचा तपशील शासनाच्या मागणीपत्रानुसार आहे . तसेच , वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे .
शासनाकडून पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल प्राप्त झाल्यास याबाबतची माहिती / बदल वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल व त्यानुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येईल .
विविध मागास प्रवर्ग , महिला , प्राविण्यप्राप्त खेळाडू , अनाथ इत्यादींसाठी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणा - या आदेशानुसार राहील .
महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणा - या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी ( Domiciled ) असल्याबाबत तसेच नॉन क्रीमीलेअर मध्ये मोडत असल्याबाबत ( अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून ) स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे.
विमुक्त जाती ( अ ) , भटक्या जमाती . ( ब ) , भटक्या जमाती ( क ) व भटक्या जमाती ( ड ) प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून • आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल .
अर्ज करताना एखादी जात / जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्यासच तसेच सक्षम प्राधिकान्याने प्रदान केलेले प्रमाणपत्र उमेदवाराकडे उपलब्ध असेल तर संबंधित जात / जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील.
समांतर आरक्षणाबाबत शासन परिपत्रक , सामान्य प्रशासन विभाग , क्रमांक एसआरव्ही -१०१२ / प्र.क्र .१६ / १२ / १६ - अ दिनांक १३ ऑगस्ट २०१४ तसेच शासन शुध्दीपत्रक , सामान्य प्रशासन विभाग , क्रमांक संकीर्ण -१ ९ १८ / प्र.क्र .३ ९ / १६ - अ , दिनांक १ ९ डिसेंबर , २०१८ आणि तदनंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.
आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील ( ईडब्लूएस ) उमेदवारांकरीता शासन निर्णय , सामान्य प्रशासन विभाग , क्रमांक : राआधो -४०१ ९ / प्र.क्र .३१ / १६ - अ . दिनांक १२ फेब्रुवारी , २०१ ९ व दिनांक ३१ मे , २०२१ अन्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र , ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी सादर करणे आवश्यक राहील .
अद्ययावत नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणून सक्षम प्राधिकाऱ्याने वितरित केलेले व अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे .
सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी शासनाने मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या वयोमर्यादेमध्ये सवलत घेतलेल्या उमेदवारांचा अराखीव ( खुला ) पदावरील निवडीकरीता विचार करणेबाबत शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करण्यात येईल . याबाबतचा तपशील वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल .
अराखीव ( खुला ) उमेदवारांकरीता विहित केलेल्या वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक निकषासंदर्भातील अटींची पुर्तता करणा - या सर्व उमेदवारांचा ( मागासवर्गीय उमेदवारांसह ) अराखीव ( खुला ) सर्वसाधारण पदावरील शिफारशीकरीता विचार होत असल्याने सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित / उपलब्ध नसले तरी , अर्जामध्ये त्यांच्या मूळ प्रवर्गासंदर्भातील माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे .
कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे .
सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधत्व कायदा १९५० च्या कलम २० अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल . कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा ( सामाजिक अथवा समांतर ) अथवा सोयी सवलतींचा दावा करणा - या उमेदवाराकडे संबंधित कायदा / नियम / आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरुन अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे . सामाजिक व समांतर आरक्षणासंदर्भात विविध न्यायालयामध्ये दाखल न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदभरतीची कार्यवाही करण्यात येईल .
खेळाडू आरक्षण
शासन निर्णय , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , क्रमांक : राक्रीधो -२००२ / प्र.क्र .६८ / क्रीयुसे- २. दिनांक १ जुलै २०१६ , तसेच शासन शुध्दीपत्रक , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , क्रमांक : राक्क्रीधो -२००२ / प्र.क्र .६८ / क्रीयुसे -२ . दिनांक १८ ऑगस्ट २०१६ शुध्दीपत्रक क्रमांक : राक्रीधो २००२ / प्र.क्र .६८ / क्रीयुसे -२ , दिनांक ११ मार्च २०१९ व शासन शुद्धिपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , क्रमांक : राक्रीधो २००२ / प्र.क्र .६८ / क्रीयुसे -२ , दिनांक २४ ऑक्टोबर , २०१९ आणि तदनंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्राविण्य प्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमर्यादेतील सवलतीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल.
प्राविण्य प्राप्त खेळाडू व्यक्तींसाठी आरक्षणाचा दावा करणा - या उमेदवारांच्या बाबतीत क्रीडा विषयक विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिका - याने प्रमाणित केलेले पात्र खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र पूर्व परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचे किंवा तत्पूर्वीचे असणे बंधनकारक आहे .
विहित दिनांकास खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य दर्जाचे असल्याबाबत तसेच उमेदवार खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरीता पात्र ठरतो , याविषयीच्या पडताळणीकरीता त्यांचे प्राविण्य प्रमाणपत्र संबंधित विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे पूर्व परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या दिनांकापूर्वीच सादर केलेले असणे बंधनकारक आहे . अन्यथा प्राविण्य प्राप्त खेळाडूसाठी आरक्षणाकरीता पात्र समजण्यात येणार नाही.
कागदपत्रे पडताळणी / मुलाखतीच्यावेळी संबंधित संवर्ग / पदाकरीता विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिका - याने प्रमाणित केलेले प्राविण्य प्रमाणपत्र प्राविण्य प्रमाणपत्र योग्य असल्याबाबत तसेच कोणत्या संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरीता उमेदवार पात्र ठरतो . याविषयी सक्षम प्राधिका - याने प्रदान केलेले विहित दिनांकास वैध असलेले प्राविण्य प्रमाणपत्र पडताळणीबाबतचा अहवाल सादर केला तरच उमेदवारांचा संबंधित संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावर शिफारशीकरीता विचार करण्यात येईल.
एकापेक्षा जास्त खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे असणा - या खेळाडू उमेदवाराने एकाच वेळेस सर्व खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे प्रमाणित करण्याकरीता संबंधित सक्षम प्राधिका - याकडे सादर करणे बंधनकारक आहे
दिव्यांग आरक्षण :
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या आधारे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक दिव्यांग २०१८ / प्र.क्र .११४ / १६ अ , दिनांक २९ मे , • २०१९ तसेच यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तींच्या आरक्षणासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल
शासन निर्णय, कृषि, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग क्रमांक : - कृषिआ -२५ ९९ / प्र.क्र . ५३ / १६ ए . दिनांक १६ जून , २०२१ अन्वये
खालील दिव्यांग प्रवर्गातील व्यक्ती / उमेदवार सदर पदाकरीता अर्ज करण्यास पात्र आहेत :
( १ ) Blind , Low Vision .
( २ ) Deaf , Hard Hearing ,
( ३ ) One Arm , Both Arm , One Leg , Both Leg , One Arm and One Leg , Both Leg & One Arm , Both Legs Arms , Cerebral Palsy , Leprosy cured , Dwartism , Acid Attack Victim , Muscular Dystrophy
( ४ ) Mental llinsess ,
( ५ ) Multiple Disabilities involving ( १ ) To ( b ) above
दिव्यांग व्यक्तींसाठी असलेली पदे भरावयाच्या एकूण पदसंख्येपैकी असतील.
दिव्यांग व्यक्तींची संबंधित संवर्ग / पदाकरीता पात्रता शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहील
दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित पदांवर शिफारस करताना उमेदवार कोणत्या सामाजिक प्रवर्गातील आहे. याचा विचार न करता दिव्यांग गुणवत्ता क्रमांकानुसार त्यांची शिफारस करण्यात येईल.
संबंधित दिव्यांगत्वाच्या प्रकारचे किमान ४० % दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र धारक उमेदवार / व्यक्ती आरक्षण तसेच नियमानुसार अनुज्ञेय सोयी / सवलतीसाठी पात्र असतील
लक्षणीय दिव्यांगत्व असलेले उमेदवार / व्यक्ती खालील सवलतींच्या दाव्यास पात्र असतील :
( १ ) दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४० % अथवा त्यापेक्षा जास्त असल्यास तसेच पद लक्षणीय दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित असल्यास नियमानुसार अनुज्ञेय आरक्षण व इतर सोयी सवलती .
( २ ) दिव्यांगत्याचे प्रमाण किमान ४० % अथवा त्यापेक्षा जास्त असल्यास तसेच पद संबंधित दिव्यांग प्रकारासाठी सुनिश्चित केले असल्यास नियमानुसार अनुज्ञेय साथी सवलती
लक्षणीय दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या वयोमर्यादेचा अथवा इतर कोणत्याही प्रकारचा फायदा घेऊ इच्छिणा - या उमेदवारांनी शासन निर्णय , सार्वजनिक आरोग्य विभाग , क्रमांक अप्रकि -२०१८ / प्र.क्र .४६ / आरोग्य -६ ,
दिनांक १४ सप्टेंबर , २०१८ मधील आदेशानुसार केंद्र शासनाच्या www.swavlambancard.gov.in अथवा SADM या संगणकीय प्रणालीदवारे वितरित करण्यात आलेले नवीन नमुन्यातील
• दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे .
लक्षणीय दिव्यांगत्व असणा -या उमेदवारांना अर्जामध्ये
केलेला दिव्यांगत्वाचा प्रकार / उप प्रकार बदलणे अनुज्ञेय नाही .
•अनाथ आरक्षण :
अनाथ व्यक्तींचे आरक्षण शासन निर्णय , महिला व बालविकास विभाग , क्रमांक : अनाथ- २०१८ / प्र.क्र .१८२ / का -०३ , दिनांक २३ ऑगस्ट , २०२१ तसेच यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणा - या आदेशानुसार राहील
अनाथांसाठी आरक्षित पदावर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गाचा आहे त्या प्रवर्गातून करण्यात येईल
प्रस्तुत पदासाठी अर्जाद्वारे अनाथ आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांनी दिनांक २३ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे विहित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार सुधारित नमुन्यातील अनाव प्रमाणपत्र व महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आयोगाकडून निश्चित करण्यात येणाऱ्या विहित कालावधीत सादर करणे आवश्यक राहील अन्यथा अनाथ आरक्षणाचा दावा विचारात घेतला जाणार नाही .
एमपीएससी>> प्रशासकीय अधिकारी> महाराष्ट्र कृषि प्रशासकीय सेवा,गट - ब मुदत-१५ जुलै २०२२
Reviewed by Best Seller
on
7/15/2022 04:23:00 pm
Rating:
कोई टिप्पणी नहीं: