रिक्त पदांचे नाव आणि पदसंख्या :
1) सहायक कक्ष अधिकारी:- 42 पदे
2) राज्यकर निरीक्षक :-77 पदे
3) पोलीस उपनिरीक्षक:-603 पदे
4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-78 पदे
शारीरिक मोजमापे/अर्हता :
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी विकल्प नमूद करणा-या उमेदवारांकडे उपरोक्त अर्हतेसोबत खालीलप्रमाणे किमान शारीरिक अर्हता असणे आवश्यक आहे
पुरुष
उंची – १६५ सें मी
छाती न फुगविता : ७९ सें
फुगविण्याची क्षमता किमान ५ सें मीमी ::
महिला : १५७ सें मी
परीक्षा फी :
अमागास – रु. 394/-
मागासवर्गीय- रु. 294/-
शुद्धी पत्रक
विषय : - जाहिरात क्रमांक ५३/२०२२ , दिनांक २३ जून , २०२२ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ च्या जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याच्या दिनांकास खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.
१. विहित पद्धतीने अर्ज सादर करून ऑनलाईन शुल्क भरण्याची कार्यवाही , तसेच भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास चलनाची प्रत घेण्याची कार्यवाही दिनांक २४ जुलै , २०२२ रोजी २३ :५८वाजेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.
२. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास भारतीय स्टेट बँकेमध्ये दिनांक २५ जुलै , २०२२ पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत भरणे आवश्यक आहे . विहित दिनांकानंतर परीक्षा शुल्क भरल्यास वैध मानले जाणार नाही , तसेच परीक्षा शुल्काचा परतावाही केला जाणार नाही.
दिनांक २३ जून , २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही.
सहसचिव ,
जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग
खालील लिंक वर क्लिक करून विस्तृत जाहिरात pdf सह डाऊनलोड करू शकतात
👇👇👇👇👇
महाराष्ट्र लोकसेवा आयोग > दुय्यम सेवा अराजपत्रित, गट- ब
कोई टिप्पणी नहीं: