21 जुलै 2022 रोजीचे दिनविशेष>>जन्म दिवस व मृत्यू दिवस सविस्तर माहिती📚🖋️📚

21 जुलै 2022 रोजीचे दिनविशेष

👆👆
📚🖋️📚
👇👇

  • इ.स. पूर्व ३५६: जगातील सात आश्चर्यांपैकी एक एफिसस आर्टेमिसचे मंदिर नष्ट झाले.

  • १८३१: बेल्जिअमचा पहिला राजा लिओपॉल्ड याचा शपथविधी झाला.

  • १९४४: २० जुलै १९४४ रोजी अ‍ॅडॉल्फ हिटलरची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गला फाशी.

  • १९६०: सिरीमाओ बंदरनायके या श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान बनल्या. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत.

  • १९७६: आयर्लंडमधील ब्रिटिश राजदूताची हत्या.

  • १९८३: अंटार्क्टिका वरील व्होस्टॉक येथे उणे ८९.२ सेल्सियस या पृथ्वीवरील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली गेली.

  • २००२: जगभर दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या वर्ल्ड कॉम या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.

  • २१ जुलै रोजी झालेले जन्म वाचूया साहित्य उत्सववर

  • १९४७: भारतीय क्रिकेटपटू चेतन प्रतापसिंग चौहान यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट २०२०)

  • १८५३: ज्योतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल १८९८)

  • १८९९: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १९६१)

  • १९१०: स्वातंत्र्यसैनिक, रोजगार हमी योजनेचे जनक वि. स. पागे यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च १९९०)

  • १९११: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान उमाशंकर जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९८८)

  • १९२०: गीतकार आनंद बक्षी यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट २००२)

  • १९३०: भारतीय संस्कृतीचे अभ्यासक संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांचा जन्म.

  • १९३४: क्रिकेट कप्तान आणि निवड समितीचे अध्यक्ष चंदू बोर्डे यांचा जन्म.

  • १९४५: दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू बॅरी रिचर्ड्स यांचा जन्म.

  • १९४७: सलामीचे फलंदाज आणि राज्यसभा सदस्य चेतन चौहान यांचा जन्म.

  • १९६०: पंजाबी गायक अमरसिंग चमकीला यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९८८)

  • २१ जुलै रोजी झालेले मृत्यू वाचूया साहित्य उत्सववर

  • १९७२: भूतानचे राजे जिग्मेदोरजी वांगचूक यांचे निधन. (जन्म: २ मे १९२९)

  • १९९४: मराठी बखर वाङ्‌मयाचे अभ्यासक डॉ. र. वि. हेरवाडकर यांचे निधन.

  • १९९५: संगीतकार मेंडोलिन वादक सज्जाद हुसेन यांचे निधन.

  • १९९७: साहित्यिक राजा राजवाडे यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९३६)

  • १९९८: अमेरिकन अंतराळवीर ऍलन शेपर्ड यांचे निधन.

  • २००१: दाक्षिणात्य अभिनेते शिवाजी गणेशन यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९२८)

  • २००२: मराठी चित्रकार गोपाळराव बळवंतराव कांबळे यांचे निधन.

  • २००९: किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका गंगूबाई हनगळ यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १९१३)

  • २०१३: भारतीय मार्शल आर्टिस्ट लूरेम्बॅम ब्रजेशोतोरी देवी यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९८१)

*✹ २१ जुलै ✹*
*अंतराळवीर ॲलन शेपर्ड स्मृतिदिन*
********************************


जन्म - १८ नोव्हेंबर १९२३
स्मृती - २१ जुलै १९८८

ॲलन शेपर्ड हा अंतराळ प्रवास करणारा जगातील दुसरा व अमेरिकेचा पहिला व्यक्ती.

ॲलन बार्टलेट शेपर्ड, ज्युनिअर हा अमेरिकेच्या नौसेनेचा वैमानिक, नासाचा अंतराळवीर व व्यवसायिक होता. १९६१ मध्ये अंतराळ प्रवास करणारा जगातील दुसरा व अमेरिकेचा पहिला व्यक्ती बनला जेव्हा प्रोजेक्ट मर्क्युरी अंतराळयान केवळ अंतराळात जाऊन परतले. 

दहा वर्षांनंतर, वयाच्या ४१व्या वर्षी तो अपोलो १४ यानावरील दलनायक होता व त्याने लँडर चंद्रावर अचूकरित्या उतरवले. तो या मोहिमेत वयाने सर्वात मोठ होता. तो चंद्रावर चालणारा पाचवा मनुष्य होता तसेच त्याने या मोहिमेदरम्यान चंद्रावर दोन गोल्फ चेंडूपण मारले.


*अभिनेता शिवाजी गणेशन स्मृतिदिन*
********************************


जन्म - १ ऑक्टोबर १९२८ (तमिळनाडू)
स्मृती - २१ जुलै २००१

तमिळ रंगभूमीवरील व चित्रपटसृष्टीतील एक श्रेष्ठ अभिनेते शिवाजी गणेशन यांचा जन्म १ ऑक्टोबर १९२८ रोजी तमिळनाडूमधील विलुपुरम (जि. दक्षिण अर्काट) या छोट्या गावात झाला.

शिवाजी गणेशन यांचे पूर्ण नाव विलुपुरम चिनय्या गणेशन्. चित्रपटात येण्यापूर्वी ते तमिळ नाटक "सिवाजी कांड इंद राज्यम" ह्या नाटकात प्रमुख भूमिकेत काम करित असत जे मराठी राजे शिवाजी ह्यांच्या पराक्रमावर आधारीत तमिळ नाटक होते, त्यात वयाच्या सोळाव्या वर्षी गणेशन् यांनी छ. शिवाजी महाराजांची वठवलेली अप्रतिम भूमिका पाहून ई.व्ही. रामस्वामी नायकर यांनी त्यांना सिवाजी गणेशन् असे कौतुकाने संबोधले व नंतर याच नावाने ते ओळखले जाऊ लागले. त्यावरून त्यांची ओळख "सिवाजी गणेसन" म्हणजेच शिवाजी गणेशन् अशी पडली. 

शिवाजी गणेशन् यांचा जन्म एका गरीब परंतु देशभक्त कुटुंबात झाला. त्यांच्या जन्मदिवशीच त्यांच्या वडिलांना अटक झाली होती. स्वातंत्र्यप्रेमाचे बाळकडू त्यांना वडिलांकडून मिळाले. लहानपणापासूनच रंगभूमी व अभिनय यांकडे त्यांचा ओढा होता. कट्टबोम्मन ह्या वीरनायकाच्या चरित्रावर आधारित नाटकामुळे ते विलक्षण प्रभावित झाले होते.

लहानपणी तमिळ रंगभूमीवर त्यांनी लहानसहान पौराणिक भूमिका केल्या. वयाच्या बाराव्या वर्षी नाटकात काम करण्यासाठी त्यांनी घर सोडले आणि गावोगावी जाऊन खेळ करणाऱ्या नाटककंपनीत ते दाखल झाले. तिथे त्यांना चिन्नई पोन्नुस्वामी हे गुरू भेटले. त्यांनी गुरूशिष्य परंपरेनुसार शिवाजी गणेशन् यांना अभिनयाचे उकृष्ट प्रशिक्षण दिले. 

नृत्य, गायन, श्लोकपठण, अभिनय हे सर्व त्यांच्या कडून करवून घेतले. १९५० साली चित्रपटवितरक पी. ए. पेरुमल ह्यांनी शिवाजी गणेशन् ह्यांना तमिळ चित्रपटसृष्टीत आणले. १९५२ साली प्रदर्शित झालेल्या त्यांच्या पराशक्ती या चित्रपटाने तमिळ चित्रपटांच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला. त्यानंतर विविध प्रकारच्या चित्रपटीय भूमिकांचा त्यांच्यावर वर्षाव झाला. 

१९५२ साली त्यांचा विवाह कमला ह्यांच्याशी झाला. त्यांचा संसार आणि चित्रपटातील कारकीर्द दोहोंचीही सुरुवात तेव्हापासून झाली. पराशक्तीतील त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले आणि तमिळ चित्रपटसृष्टीत शिवाजी गणेशन् ह्यांच्या अजोड अभिनयाचे पर्व सुरू झाले. 

त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये वीरपांड्य कट्टबोम्मन, कपलोट्टी तमिळन, ओट्टीवर उरवू, तिल्लाना मोहनाम्बाळ मनोहारा, सरस्वती सबथम, आलेयमणी, तिरबेर पार, मनगेर तिलकम, रंगून राधा, मोटर सुंदरम पिल्लै, थेवर मगन, नानगल चिनै मरुमुगळ्, व्हिएटनाम विड इ. चित्रपटांचा समावेश आहे. या सर्व चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिजात अभिनयाचा ठसा जनमानसावर उमटवला. 

पद्मिनी, बी. सरोजादेवी, पी. भानुमती, सावकार जानकी, के. आर. विजया, सावित्री, देविका इ. अभिनेत्रींबरोबरचे त्यांचे चित्रपट गाजले. ‘नडिगार तिलकम’ म्हणजे ‘कलावंतांचा मुकुटमणी’ हे गौरवास्पद बिरुद रसिकांनी त्यांना बहाल केले. नवरसांचा परिपोष घडवणाऱ्या नवरात्री ह्या चित्रपटात त्यांनी नऊ भूमिका सादर केल्या. 

त्यांची भारत सरकारने १९८२ साली राज्यसभेवर नेमणूक केली. १९८४ साली त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार लाभला. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च बहुमानाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ त्यांना १९९७ मध्ये प्राप्त झाला. 

संवेदनशील, सरळमार्गी व्यक्तिरेखांच्या त्याचप्रमाणे प्रामाणिक एकनिष्ठ सेवकाच्या तसेच जिवलग मित्राच्या भूमिका त्यांनी संस्मरणीय केल्या. ऐतिहासिक पौराणिक व्यक्तिरेखा त्यांच्या अभिनय सामर्थ्याच्या निदर्शक आहेत. त्यांच्या तेजस्वी चित्रपटीय कारकीर्दीचे भागीदार म्हणून दिग्दर्शक बी. आर. पंथलु, भीम सिंग, संगीतकार एम. एस. विश्वनाथन, सुप्रसिध्द गीतलेखक कन्नदासन, संवादलेखक एम. करुणानिधी इत्यादींचा उल्लेख करावा लागेल.

सांस्कृतिक राजदूत म्हणून १९६२ साली त्यांना अमेरिकेत बोलवण्यात आले. त्यांचा देव मगन हा चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी सुचविण्यात आला होता. शिवाजी गणेशन यांनी २४७ हून अधिक चित्रपटांतून भूमिका केल्या. 

खाजगी जीवनात मात्र एक साधा माणूस म्हणूनच ते ओळखले जात. तमिळ चित्रपटांतील दिमाखदार कारकीर्द सांभाळून आपल्या शिवाजी नाटक मंडळीतर्फे उत्कृष्ट तमिळ नाटके सादर करण्याची परंपरा त्यांनी जपली. कलांचे आश्रयदाते तसेच समाजबांधवांच्या उत्कर्षासाठी झटणारे कार्यकर्ते म्हणून शिवाजी गणेशन यांचा लौकिक होता.

‘ते फक्त अभिनय करत नसून भूमिका जगतात’, असा सार्थ गौरवोद्गार त्यांच्याबद्दल काढला जातो. दिग्दर्शकांच्या सर्व सूचना पाळणारे ते विनम्र कलाकार आहेत. महान कलावंत, प्रेमळ मित्र, जबाबदार व्यावसायिक आणि कौटुंबिक परिवारात रमणारे मातृभक्त अशी त्यांची विविध रूपे होती. तमिळ चित्रपट तथा रंगभूमीला त्यांनी दिलेले योगदान ऐतिहासिक महत्त्वाचे आहे. 

शिवाजी गणेशन यांचे २१ जुलै २००१ रोजी निधन झाले.


*❀ २१ जुलै ❀*
*गीतकार आनंद बक्षी जन्मदिन*


जन्म - २१ जुलै १९३०
स्मृती - ३० मार्च २००२

गीतकार आनंद बक्षी यांचा जन्म २१ जुलै १९३० रोजीचा. आनंद बक्षी हे अभ्यासू, परिश्रम घेणारे गीतकार म्हणून ओळखले जात होते. 

भगवानदादांची भूमिका असलेला ‘भला आदमी’ हा चित्रपटापासून त्यांनी गीते लिहण्यास सुरवात केली. हा चित्रपट १९५८ मध्ये प्रदर्शित झाला मात्र त्यापूर्वीच ‘शेरएबगदाद' आणि ‘सिल्व्हर किंग’ हे त्यांचे चित्रपट झळकले. शैलेंद्रसारख्या दिग्गज गीतकाराने अनेक निर्मात्यांकडे बक्षी यांच्यासाठी शब्द टाकला तर साहिर सारख्या प्रतिभावंताने बक्षींना वेळोवेळी मार्गदर्शन केले. 

‘पारसमणी’ आणि ‘दोस्ती’ च्या गाण्यांनी चित्रपटसृष्टीत खळबळ उडवणाऱ्या लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीसह ‘मि.एक्स इन बॉम्बे’ या चित्रपटासाठी गीते लिहिण्याची संधी आनंद बक्षी यांना मिळाली. यातील ‘मेरे मेहबूब कयामत होगी’ आणि ‘खूबसूरत हसीना’ ही गाणी लोकप्रिय झाली. यानंतर ‘हिमालय की गोद में’ आणि ‘जब जब फूल खिले’ या कल्याणजी आनंदजी यांनी स्वरबद्ध केलेल्या चित्रपटांतील बक्षींनी लिहिलेली गाणी कमालीची गाजली. 

आशयगर्भ, हलकीफुलकी शब्दकळा, प्रेमगीत, विरहगीत, भजन, कव्वाली, थीम साँग, क्लब डान्स सर्व प्रकारची गाणी झटपट लिहून देणारा गीतकार म्हणजे आनंद बक्षी असे समीकरण रूढ झाले.

लक्ष्मीप्यारे यांच्यासोबत त्यांची भट्टी जमली. या जोडीने मिलन, आसरा, लुटेरा, आए दिन बहार के, फर्ज, तकदीर, अंजाना, आया सावन झुम के, जीने की राह, जिगरी दोस्त असे एकापेक्षा एक सुरेल चित्रपट देऊन ६० च्या दशकाची अखेर गाजवली. 

१९६९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आराधना’ ने घडवलेला इतिहास सर्वज्ञात आहे. प्रतिभावान कवी गीतकाराची सारी वैशिष्टय़े ‘अमर प्रेम’ मधील ‘चिंगारी कोई भडके’, ‘कूछ तो लोग कहेंगे’, ‘ये क्या हुआ’, ‘रैना बिती जाए’, ‘बडा नटखट है रे’, ‘डोली मे बिठाके’ या गाण्यांमध्ये होती. 

लक्ष्मीप्यारे सोबत त्यांनी ३०२ तर पंचम सोबत ९९ चित्रपट केले. राज कपूर, शक्ति सामंत, मनमोहन देसाई, यश चोप्रा, राज खोसला, सुभाष घई या आघाडीच्या निर्माता दिग्दर्शकांनी बक्षींकडून शेकडो गाणी लिहून घेतली यातच सारे आले. 

आर.के. ने ‘बॉबी’ च्या गाण्यांसाठी स्वत: बक्षी यांच्या घरी जाऊन त्यांना करारबद्ध केले. १९७०चे दशकही बक्षींचेच होते. आन मिलो सजना, गीत, हमजोली, कटी पतंग, खिलौना, द ट्रेन, दुश्मन, हरे राम हरे कृष्ण, हाथी मेरे साथी, अपना देश, नमक हराम, शोले, ज्यूली, सरगम, कर्ज, एक दुजे के लिये, हीरो, आशा, रॉकी, बेताब, लव्ह स्टोरी, अलग अलग या चित्रपटांद्वारे १९८०च्या दशकातही बक्षी आघाडीवर राहिले. 

तरुण पिढी ला आवडणारी ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘दिल तो पागल है’, ‘ताल’, ‘मोहब्बते’, ‘गदर’ या चित्रपटांतील गाणी आनंद बक्षी यांनी लिहलेली आहेत. नवीन पिढीतील संगीतकारांशीही त्यांचे सूर जुळले होते आनंद बक्षी यांनी साडेतीन हजार च्या वर गाणी लिहली. गीतकारासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांनी पाच वेळा पटकावला तर याच पुरस्कारासाठी एकदोन नव्हे तर तब्बल ४० नामांकने त्यांना लाभली. 

आनंद बक्षी यांचे ३० मार्च २००२ रोजी निधन झाले. 

आनंद बक्षी यांना आदरांजली !


21 जुलै 2022 रोजीचे दिनविशेष>>जन्म दिवस व मृत्यू दिवस सविस्तर माहिती📚🖋️📚 21 जुलै 2022 रोजीचे दिनविशेष>>जन्म दिवस व मृत्यू दिवस सविस्तर माहिती📚🖋️📚 Reviewed by D.B.PATIL on 7/21/2022 12:21:00 pm Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

🚶‍♂️💃🚶‍♂️

Blogger द्वारा संचालित.