━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━
🫵🏻 तुम्हाला माहिती आहे का, बँकेकडून तुम्हाला एटीएम कार्ड जारी होताच ग्राहकांना अपघात विमा आणि अकाली मृत्यू विमा मिळतो. याची माहिते फार कमी लोकांना असते. तसेच बँकाही ग्राहकांना अशी माहिती देण्यास टाळाटाळ करतात.
🗣️ बिहार परिवहन विभागाचे सचिव संजय कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, बँक ग्राहकाला एटीएम कार्ड जारी करताच, ग्राहकाला अपघात किंवा अकाली मृत्यूविरूद्ध विमा मिळतो. एटीएम कार्डच्या श्रेणीनुसार, तुम्हाला मिळणारी विम्याची रक्कम 1 ते 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते. परंतु माहितीअभावी एटीएम कार्डधारकाचा अपघात किंवा अकाली मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना विम्याचा लाभ मिळत नाही.
🧾 *कोणत्या एटीएम कार्डवर किती विमा?*
एटीएम कार्डनुसार, अपघात आणि अकाली मृत्यू विमा उपलब्ध आहे. नियमानुसार, ग्राहक 45 दिवसांपासून कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा गैर-राष्ट्रीयीकृत बँकेचे एटीएम वापरत असावा. एटीएम कार्डच्या श्रेणीनुसार विम्याची रक्कम दिली जाते.
✅ क्लासिक कार्डवर 1 लाख रुपये,
✅ प्लॅटिनम कार्डवर 2 लाख रुपये,
✅ ऑर्डिनरी मास्टरकार्डवर 50 हजार रुपये,
✅ प्लॅटिनम मास्टरकार्डवर 5 लाख रुपये,
✅ व्हिसा कार्डवर 1.5 लाख ते 2 लाख रुपयांपर्यंत तर दुसरीकडे, रुपे कार्डवर 1 ते 2 लाखांचा विमा उपलब्ध आहे.
💥 जर एटीएम कार्डधारक अपघाताचा बळी ठरला असेल. ज्यामध्ये जर तो एक हात किंवा पाय गमावला आणि अपंग झाला तर त्याला 50 हजार रुपयांचा विमा मिळतो. दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावल्यास 1 लाख रुपयांचा विमा उपलब्ध आहे. मृत्यू झाल्यास 1 ते 5 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षणाची तरतूद आहे.
💳 *नियम व अटी*
नियम आणि अटींबद्दल बोलायचे झाल्यास कार्ड अपघाताच्या 90 दिवस आधी वापरात असले पाहिजे. तसे न झाल्यास विम्याचा लाभ मिळणार नाही. विमा संरक्षणाबद्दल वर दिलेली सर्व माहिती विमान अपघात नसलेल्यांबद्दल आहे. जर कार्डधारकाचा विमान अपघातात मृत्यू झाला तर विमा संरक्षण जवळजवळ दुप्पट मिळणार आहे. मात्र त्यासाठी ते कार्ड एअर तिकीट बुकिंगमध्ये वापरलेले असणे आवश्यक आहे.
⁉️ विमावर क्लेम कसा करायचा?
एटीएम कार्डवर विम्याचा दावा करण्यासाठी, कार्डधारकाच्या नॉमिनीला संबंधित बँकेच्या शाखेत अर्ज करावा लागेल. ज्यामध्ये एफआयआरची प्रत, उपचाराचे प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यानंतर विमा दावा काही दिवसात खात्यात येतो. दुसरीकडे मृत्यू झाल्यास, कार्डधारकाच्या नॉमिनीला मृत्यू प्रमाणपत्र, एफआयआर प्रत, आश्रितांचे प्रमाणपत्र, मृताच्या प्रमाणपत्राची मूळ प्रत सादर करावी लागते. या संपूर्ण प्रक्रियेनंतर विम्याचा लाभ मिळतो.
कोई टिप्पणी नहीं: