पिंपरी चिंचवड महानगरपालिका
किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यु , चिकुनगुन्या डास नियंत्रण
पर्यावरण व्यवस्थापनाकरीता ब्रिडींग चेकर्स पदे भरणेबाबत ६ पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी- ४११०१८
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन , २ रा मजला , वैद्यकिय विभाग , मुंबई - पुणे हायवे लगत , पिंपरी ४११०१८
पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यु , चिकुनगुन्या डास नियंत्रण , पर्यावरण व्यवस्थापनाकरीता ब्रिडींग चेकर्स या पदाची पदे खालील प्रमाणे भरावयाची आहेत
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पदाची शैक्षणिक अर्हता व वय खालील प्रमाणे आहे.
शैक्षणिक अर्हता मुलाखतीचे स्थळ , दिनांक व वेळ नवीन थेरगाव रुग्णालय , थेरगाव दिनांक -२४ / १२ / २०२२ सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत या पदासाठी उमेदवारांची शैक्षणिक अर्हता किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . किमान १८ वर्षे ते कमाल ४३ वर्षे
१) राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत भरण्यात येणाऱ्या वरील पदाची निवड थेट मुलाखतीने करण्यात येईल.
२) सदरची पदे राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राहतील,
सदर पदांचा पिंपरी चिंचवड • म.न.पा. आस्थापनेशी कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही . तसेच सदर पदाचे काम केलेल्या कोणाचाही अनुभव शासकीय नोकरीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही .
३) सदरची पदे पुर्णपणे केवळ राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम कामकाजासाठी तात्पुरत्या स्वरूपात भरावयाची असल्याने अर्जदारास कायमपदी नियुक्तीचा हक्क सांगता येणार नाही
ज्या दिवशी सदर पदांची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटीशीशिवाय त्यांची सेवा समाप्त केली जाईल .
४) सदरच्या पदांवरील नेमणूका या अत्यंत हंगामी स्वरुपाच्या असून उमेदवाराला कायमस्वरुपी हक्क सांगता येणार नाही असे हमीपत्र १०० रुपयांच्या स्टॅम्पवरती नोटरीव्दारे प्रमाणित करुन नियुक्ती वेळी सादर करणे बंधनकारक राहील
५) सदरच्या पदावरील कर्मचारी यांनी महिन्यातून किमान २५ दिवस काम करणे आवश्यक आहे .
६) सदरच्या पदावरील कर्मचा - यांच्या नेमणूका या २ ९ दिवसांकरिता आहेत त्यामुळे प्रत्येक २ ९ दिवसानंतर या कर्मचा - यांच्या सेवेमध्ये ०१ दिवसाचा खंड करून त्यांना परत २ ९ दिवसांचे आदेश देण्यात येवुन त्यांचा एकुण सेवा कालावधी फक्त ०५ महिन्यांचा असेल .
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
७) सदर पदावरील
कर्मचा - यांना दररोज र.रु .४५० / - प्रमाणे काम केलेल्या दिवसांचे ( Daily Wages ) वेतन अदा करण्यात येईल .
८) सदर पदावरील कर्मचा - यांना वेतन देताना त्यांनी एका महिन्यांमध्ये साधारण २५ दिवस काम केले असल्यास २५४४५० रु . असे रु . ११२५० / - असे एका महिन्याचे वेतन काढण्यात येईल .
९) सदर पदावरील कर्मचा - यांच्या हजेरीचा तसेच कामकाजाचा आढावा पर्यवेक्षकामार्फत घेऊन मगच त्यांचे वेतन अदा करण्यात येईल .
१०) सदर जाहिरातीमधील पदसंख्येमध्ये बदल होऊ शकतो .
११) सदर पदाची मुलाखत २० गुणांची असुन यामध्ये उमेदवारांची निवड करताना उमेदवार १० वी पास असल्यास ०२ गुण , १२ वी पास असल्यास ०४ गुण , अतिरिक्त शिक्षण असल्यास ०४ गुण निवड समितीस जास्तीत जास्त १० गुण देता येतील व मुलाखत १० गुणांची राहील .
१२) सदर पदासाठी फक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रहिवासी असलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाईल .
इतर अर्जाचा विचार केला जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी रहिवासी पुरावा (आधारकाकार्ड, मतदान ओळखपत्र रेशनिंगकार्ड छायांकित सत्यप्रत) अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील .
१३) सदरची भरती रद्द करणे अथवा स्थगित करणे तसेच निवड / नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार मा . आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी राखून ठेवलेले आहेत .
१४) प्रस्तुतचे जाहिरातीमधील पदाकरिता करावयाच्या अर्जाचा नमुना जाहिराती सोबत
महापालिका संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in
वर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे . सदरचा अर्ज उपलब्ध करुन घेऊन उमेदवाराने सादर करणे अपेक्षीत आहे . याकरिता महापालिकेमार्फत स्वतंत्रपणे अर्ज उपलब्ध करून दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी .
१५ ) सदर जाहिरातीच्या अनुषंगाने गुणानुक्रम यादी तसेच अंतिम निवड यादी नेमणूक आदेश , महापालिकेच्या
संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in वर प्रसिध्द केले जातील ते संबंधीत उमेदवारांनी उपलब्ध करुन घेऊन मुदतीत वैद्यकिय विभाग मुख्य कार्यालय पिंपरी चिंचवड महानगरपालिका , पिंपरी -१८ येथे रुजू व्हावयाचे आहे . याकरीता कोणत्याही उमेदवारास स्वंतंत्रपणे पत्रव्यवहार , दुरध्वनी , मोबाईल अथवा एस.एम.एस.ब्दारे संपर्क करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी .
१६) मुलाखतीच्या वेळापत्रकामधील दिनांकास १ तासामध्ये म्हणजे सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत या वेळेत जेवढे उमेदव उपस्थित असतील अशा उमेदवारांची हजेरी नोंदवून व त्यांचेकडून विहित नमुन्यातील अर्ज व कागदपत्रे घेण्यात येतील .. त्यानंतर उपस्थित असलेल्या उमेदवारांची मुलाखतीसाठी नोंदणी करणेत येणार नाही व याबाबतचा अंतिम निर्णय सदस्य सचिव तथा वैद्यकिय संचालक पि.चि.म.न.पा. यांचा राहील .
१७) परिपुर्ण भरलेला अर्ज व पुढील आवश्यक कागदपत्रे जोडण्यात आलेले अर्ज पात्र होतील अपुर्ण अर्जांचा • विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी .
कागदपत्रे
१. इच्छुक व पात्र उमेदवारांनी महापालिका संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in वर दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत शैक्षणीक अर्हता प्रमाणपत्रे व खालील कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रती जोडाव्यात. (अर्जासोबत मुळ कागदपत्रे जोडून नयेत )
२. इयत्ता १० उत्तीर्ण प्रमाणपत्र
३ पासपोर्ट साईज फोटो
४ जन्म तारखेचा पुरावा ( जन्माचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला )
५. रहिवाशी दाखला किंवा आधारकार्ड , मतदान ओळखपत्र , रेशनिंगकाई
६. अनुभव प्रमाणपत्र
कोई टिप्पणी नहीं: