जिल्हा परिषदेतील गट-क भरती- अभ्यासक्रम- प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, प्रश्नपत्रिकेचा दर्जा व गुण सविस्तर माहिती

जिल्हा परिषदेतील गट-क भरती प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, प्रश्नपत्रिकेचा दर्जा व गुण स्पष्ट केलेले आहे.

त्याचबरोबर सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक: प्राणिम १२२२ / प्र.क्र-५४/ का.१३-अ दिनांक ४ मे, २०२२ नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित) गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत.

दिनांक ५ जुलै, २०१४ चे शासन परिपत्रकातील परिशिष्ट अ मध्ये संवर्गनिहाय मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धीमापन व गणित व तांत्रिक प्रश्न याबाबत प्रश्न व त्याला असणारे गुण निश्चित केलेले आहेत. त्याचबरोबर वरील विषयांची काठिण्य पातळी समजण्याकरता प्रश्नपत्रिकेचा दर्जाही निश्चित केलेला आहे.

प्रश्नपत्रिकेच्या दर्जावरून उमेदवारांना प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नासंदर्भात पुरेसे आकलन होत नव्हते, यावरून उमेदवारांकडून वारंवार विचारणा केली गेली होती. त्यामुळे उमेदवारांच्या सुलभ संदर्भासाठी प्रश्न पत्रिकेचे स्वरूप, दर्जा निश्चित करणे शासनाच्या विचाराधीन होते.

परिशिष्ट अ

संवर्गनिहाय मराठी संबंधित प्रश्न, इंग्रजी संबंधित प्रश्न, सामान्य ज्ञान संबंधित प्रश्न, बुद्धिमापन व गणित संबंधित प्रश्न, तांत्रिक प्रश्न, प्रश्नपत्रिकेचा दर्जा (काठिण्य पातळी) व परीक्षेची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे.

परिशिष्ट ब

ज्या संवर्गामध्ये तांत्रिक प्रश्न विचारले जाणार आहेत, त्याची काठिण्य पातळी (दर्जा) समजून येणेसाठी व उमेदवारांच्या सुलभ संदर्भासाठी अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला आहे.











संवर्ग 

👇👇👇

 १) आरोग्य पर्यवेक्षक


२) आरोग्य सेवक (पुरूष)


३) आरोग्य सेवक (महिला)


४) औषध निर्माण अधिकारी


५) कंत्राटी ग्रामसेवक


६) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु. / लघु पाटबंधारे)


७) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)


८) कनिष्ठ अभियंता (विद्युत)


९) कनिष्ठ लेखाधिकारी


१०) जोडारी


११) तारतंत्री


१२) पशुधन पर्यवेक्षक


१३) प्रयोगशाळा तंत्रज्ञ


१४) वरिष्ठ सहाय्यक (लेखा)


१५) विस्तार अधिकारी (कृषि)


१६) विस्तार अधिकारी (शिक्षण)


१७) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (स्थापत्य / लघु पाटबंधारे)































जिल्हा परिषदेतील गट-क भरती- अभ्यासक्रम- प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, प्रश्नपत्रिकेचा दर्जा व गुण सविस्तर माहिती जिल्हा परिषदेतील गट-क भरती- अभ्यासक्रम- प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, प्रश्नपत्रिकेचा दर्जा व गुण सविस्तर माहिती Reviewed by Best Seller on 8/23/2023 12:48:00 pm Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

🚶‍♂️💃🚶‍♂️

Blogger द्वारा संचालित.