आरोग्य ब, क आणि ड च्या भरती परीक्षेचे सुधारित वेळापत्रक घोषित.📚📚🙏🙏

मित्रानो बऱ्याच दिवसापासून आपण आरोग्य भरतीची वाटत बघत होतो की, नेमके परिक्षा तारखा कधी जाहीर होतील शेवटी त्या परिक्षा तारखा Declair झाल्या.

आरोग्य ब, क आणि ड च्या भरती

खालील माहिती अधिकृत वेबसाईट वरून मिळवलेली आहे👇👇👇

अधिसूचना 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक या आस्थापनेवरील गट - ब , गट - क व गट ड संवर्गातील शिक्षकेतर रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता जाहिरात क्र . ० ९ / २०२२ दि . २५/०७/२०२२ प्रसिध्द करण्यात आली आहे. 


संदर्भ क्र . २ वरील कार्यालयीन परिपत्रकान्वये लेखी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशतः बदल करण्यात आलेला आहे . सदर जाहिरातीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सुचना निर्गमित करण्यात येत आहे : 

दि. १४/१०/२०२२. दि . १५/१०/२०२२ व दि . १७/१०/२०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या लेखी परीक्षेच्या अनुषंगाने परीक्षांचे प्रवेशपत्र ( Hall Ticket ) विद्यापीठ संकेतस्थळावर Online पध्दतीने उपलब्ध करुन देण्यात आले आहे . उमेदवारांनी अर्ज भरतेवेळी प्रविष्ठ केलेल्या मोबाईल क्रमांक टाकून परीक्षांचे प्रवेशपत्र ( Hall Ticket ) डाऊनलोड करुन घ्यावे . विद्यापीठाकडून प्रवेशपत्र निर्गमित केले जाणार नाही याची नोंद घ्यावी . 

२) उमेदवारांनी अर्ज भरतेवेळी त्यांच्या नावात , वडीलांच्या नावात अथवा आडनावात काही टंकलेखनाची ( Typographical Error ) चुक झाली असल्यास , अशा उमेदवारांनी अशा दुरुस्तीसाठी admin@muhs.ac.in या ईमेल वर दि . ५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत संपर्क साधावा . तदनंतर उमेदवारांच्या चुकीच्या नावात दुरुस्ती केली जाणार नाही . 


३ ) जाहिरातीतील पृष्ठ क्र . ३७ वरील मुद्दा क्र . १४ मध्ये महत्वाच्या सूचना नमूद केलेल्या आहेत . त्यानुसार उमेदवारांना परीक्षेच्या प्रवेशपत्रावर ( Hall Ticket ) नमूद केलेले परीक्षा केंद्र कुठल्याही परिस्थितीत बदलून दिले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी . 


४) दिव्यांग उमेदवार- लेखनिक व अनुग्रह कालावधीबाबत प्रत्यक्ष परीक्षेच्यावेळी उत्तरे लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या , पात्र विकलांग उमेदवारांना , लेखनिकाची मदत आणि अथवा अनुग्रह कालावधीची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांकरीता प्रवेशपत्रासोबत ( Hall Ticket ) लेखनिक घोषणापत्र प्राप्त करून देण्यात आलेले आहे . सदरील घोषणापत्र ( Declaration Form ) राजपत्रित अधिकारी यांच्याकडून लेखनिकाच्या छायाचित्रासह साक्षांकित करुन परीक्षेच्या वेळी सोबत आणणे बंधनकारक राहील . तसेच त्याची एक प्रत admin@muhs.ac.in या ईमेल वर पाठविण्यात यावी . 


५ ) ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतेवळी अलिकडच्या काळातील फोटो व उमेदवाराची स्वाक्षरी अपलोड केलेली नव्हती अशा उमेदवारांचे अर्ज जाहिरातीमधील तरतुदीनुसार “ अपूर्ण अर्ज " म्हणून बाद आहेत . अशा उमेदवारांनी याबाबत कुठलाही संपर्क करु नये . तसेच , अशा उमेदवारांना संगणक प्रणालीद्वारे परीक्षेचे प्रवेशपत्र ( Hall Ticket ) उपलब्ध झालेले असले तरी त्यांची उमेदवारी कुठल्याही परिस्थितीत ग्राहय समजण्यात येणार नाही . 

६ ) उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतेवळी जो प्रवर्ग नमूद केलेला आहे तसेच ज्या प्रवर्गातून अर्ज केलेला आहे त्यात आता कुठल्याही उमेदवारास त्याचा प्रवर्ग यास्तरावर बदलता येणार नाही याची देखील संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी .







या ब्लॉग वर सादर केलेली भरती विषयक माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. आम्ही कोणतीही भरतीची हमी देत नाही. भरती रिक्त पदावर नियुक्त केलेल्या कंपनी किंवा संस्थेच्या अधिकृत भरती प्रक्रियेनुसार केली जाईल. ही नोकरीची माहिती देण्यासाठी आम्ही कोणतेही शुल्क आकारत नाही. या लेखातील कोणत्याही माहितीमुळे उद्भवलेल्या कोणत्याही प्रकारच्या हानी किंवा हानीसाठी किंवा त्यावर अवलंबून असलेल्या कोणत्याही कृतींसाठी लेखक त्याचे कोणतेही दायित्व स्वीकारत नाहीत.

फक्त आणि फक्त मला मिळालेली माहिती जनसामान्य व्यक्ती पर्यंत पोहचावी हा उद्देश आहे

🙏🙏🙏🙏

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आस्थापनेवरील गट ब, क, आणि ड संवर्गातील रिक्त शिक्षकेतर पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत.

भरतीप्रक्रियेसाठी १४,१५ व १७ ऑक्टोबरला लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. 

आरोग्य ब, क आणि ड च्या भरती

तसेच या परीक्षांमधील काही पदांसाठीच्या परीक्षा वेळापत्रकात अंशतः बदल करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या  वेबसाईट 👈👈👈



👇👇👇👇👇👇👇

जाहिरात क्रं. ० ९ / २०२२ : अर्जदारांसाठी डॅशबोर्ड ( दिनांक 14 , 15 आणि 17 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजित लेखी परीक्षांचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी अर्जदारांनी भेट द्यावी )

👆👆👆👆

या संकेतस्थळावर नवीन वेळापत्रक घोषित केल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी दिली . 

खालील बातमी सविस्तर पहा👇👇👇👇



विद्यापीठ भरतीप्रक्रियेत विविध पदांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, लातूर, कोल्हापूर व नाशिक येथील निर्देशित केलेल्या परीक्षा केंद्रांमध्ये घेण्यात येणार आहे. येत्या १४ तारखेला सकाळी १० ते दुपारी १२ वेळेत लिपिक कम टंकलेखक, डेटा एंट्री ऑपरेटर, रोखपाल, भांडारपाल या पदांसाठी तसेच दुपारी २ ते ४ वेळेत कक्ष अधिकारी, कक्ष अधिकारी (खरेदी), अधीक्षक पदासाठी आणि सायंकाळी ५ ते ६.१५ या कालावधीत शिपाई पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

आरोग्य ब, क आणि ड च्या भरती

तसेच १५ ऑक्टोबरला सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत वरिष्ठ लिपिक कम डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी तसेच दुपारी २ ते ४ वेळेत वरिष्ठ सहायक पदासाठी आणि सायंकाळी ५ ते ६.१५ वेळेत वाहनचालक पदाकरिता लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.


दरम्यान, १७ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे सकाळी १० ते दुपारी १२ वेळेत सहायक लेखापाल , वीजतंत्री पदांसाठी तसेच दुपारी १ ते २.३० वेळेत निम्नश्रेणी व उच्चश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक , छायाचित्रकार , आर्टिस्ट कम ऑडिओ अँड व्हिडिओ एक्स्पर्ट या पदांसाठी आणि दुपारी ३.३० ते ५ .३० वेळेत सांख्यिकी सहायक पदासाठी आणि दुपारी ३.३० ते सायंकाळी ५ वेळेत विद्युत पर्यवेक्षक पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे . सर्व अर्जदारांनी परीक्षा वेळेतील बदलाबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


आरोग्य ब, क आणि ड च्या भरती परीक्षेचे सुधारित वेळापत्रक घोषित.📚📚🙏🙏  आरोग्य ब, क आणि ड च्या भरती परीक्षेचे सुधारित वेळापत्रक घोषित.📚📚🙏🙏 Reviewed by Best Seller on 10/07/2022 02:18:00 pm Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

🚶‍♂️💃🚶‍♂️

Blogger द्वारा संचालित.