पोलीस शिपाई संवर्गातील सन 2021 मधील रिक्त पदे 100% भरण्यासाठी निर्बधातून सूट पदे👉 11443

 



१ ) वित्त विभाग , शासन निर्णय क्रमांक - पदनि -२०२२ / प्र.क्र .२/ २०२२ / आ.पु.क., दि .१२.०४.२०२२ २ ) पोलीस महासंचालक , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांचे अ.शा.पत्र क्र . पोमसं / प्रशि / पोशि भरती प्रक्रिया २०२१/१८८/२०२१/२८०५ , दि .०७.०९ .२०२२

( ३ ) पोलीस महासंचालक , प्रशिक्षण व खास पथके , महराष्ट्र राज्य , मुंबई यांचे पत्र क्र . प्रशि / पोशि भरती प्रक्रिया २०२१ / १८८ / २०२१ / १८८ / २०२१ / २ ९९ ४ , दि .२६.० ९ .२०२२

राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन २०२१ मध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक व सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गात सुमारे ११४४३ इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत.

दरम्यान वित्त विभाग , शासन निर्णय क्र . पदनि -२०२२/ प्र.क्र .२ / २०२२ / आ.पु.क. , दि. १२/०४/२०२२ अन्वये पदभरतीच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या असून यामध्ये सुधारीत आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत,


अशा सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य पदे ५० टक्के भरण्यास अनुमती देण्यात आली आहे .

सद्यस्थितीत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील १००% रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे .

त्यानुषंगाने संदर्भाधिन क्र . १ च्या शासन निर्णय , वित्त विभाग दि .१२ / ०४ / २०२२ च्या तरतूदीमधून सूट मिळण्यासाठीच्या प्रस्तावास दि .२७ / ० ९ / २०२२ रोजीच्या बैठकीमध्ये मा . मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे .

मा . मंत्रिमंडळाच्या दि .२७ / ० ९ / २०२२ रोजीच्या बैठकीतील निर्णयाच्या अनुषंगाने सन २०२१ मधील पोलीस शिपाई गट - क संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता संदर्भ क्र .१ येथील वित्त विभाग , शासन निर्णय दि .१२ / ०४ / २०२२ मधील तरतूदींमधून सूट देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती .

शासन निर्णय : राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई , गट - क या संवर्गातील सन २०२१ या वर्षात विविध कारणास्तव रिक्त झालेली पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील एकूण ११४४३ पदे १०० % भरण्यास शासन निर्णय , वित्त विभाग क्र . पदनि ०२२ / प्र.क्र .२ / २०२२ / आ.पु.क. , दि .१२ / ०४ / २०२२ मधील तरतुदींमधून सूट देण्यात येत आहे

२. प्रस्तुत प्रस्तावासाठी येणारा खर्च यासाठी मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा . तसेच याद्वारे कोणतीही नवीन पद निर्मिती अपेक्षित नसून मंजूर पदांच्या मर्यादेत रिक्त पदे भरण्यात यावीत .

३ सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in 

👆👆या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२१०१४१२१३२५६०२९ असा आहे . 


👆👆 वर प्रदान केलेली भरती माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. आम्ही कोणतीही भरती हमी देत नाही. भरती रिक्त पदावर नियुक्त केलेल्या कंपनी किंवा संस्थेच्या अधिकृत भरती प्रक्रियेनुसार केली जाईल. 

ही नोकरीची माहिती देण्यासाठी आम्ही कोणतेही शुल्क आकारत नाही. 

या लेखातील कोणत्याही माहितीमुळे उद्भवलेल्या कोणत्याही प्रकारच्या हानी किंवा हानीसाठी किंवा त्यावर अवलंबून असलेल्या कोणत्याही कृतींसाठी लेखक त्याचे कोणतेही दायित्व स्वीकारत नाहीत.

पोलीस शिपाई संवर्गातील सन 2021 मधील रिक्त पदे 100% भरण्यासाठी निर्बधातून सूट पदे👉 11443 पोलीस शिपाई संवर्गातील सन 2021 मधील रिक्त पदे 100% भरण्यासाठी निर्बधातून सूट पदे👉 11443 Reviewed by Best Seller on 10/15/2022 08:51:00 pm Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

🚶‍♂️💃🚶‍♂️

Blogger द्वारा संचालित.