स्टाफ नर्स भरती 2022>> राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर जाहिरात📚📚

स्टाफ नर्स भरती 2022

सदर भरती ची जाहिरात काळजी पूर्वक वाचावीत ही नम्र विनंती👇👇
विशेषतः जाहिरात ही online गुगल फॉर्म भरून द्यावयाची आहे 

याची नोंद घ्यावी तसेच गुगल लिंक साठी आपण खालील लिंक वापरू शकतात किंवा अधिकृत वेबसाइट वर जाऊन ही लिंक चा वापर करू शकतात

MBBS officer 👇👇
https://forms.gle/NcRNfd3MndMhiRr47

STAFF NURSE👇👇
https://forms.gle/UuobngnVvakLf9119

MPW MALE👇👇
https://forms.gle/3kyeSFhhnzUxX8R37

👉👉👉सदर  दि .०६ / ० ९ / २०२२ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे ते कमाल ३८ वर्षे राहील . अंतिम राहील




राष्ट्रीय आरोग्य अभियान , जिल्हा चंद्रपूर १५ वा वित्त आयोग अंतर्गत रिक्त पदभरतीच्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचना 

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी , चंद्रपूर अंतर्गत १५ व्या वित्त आयोगाच्या मंजूर प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शहरी व ग्रामीण भागात आरोग्य सेवा उपलब्ध होण्याचे दृष्टीने कंत्राटी तत्वावर रिक्त पदे भरण्याकरीता👇👇

स्टाफ नर्स भरती 2022


जाहिरात https://zpchandrapur.co.in/ किंवा https://zpchandrapur.maharashtra.gov.in/en 

👆👆या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येत असुन अर्ज करावयाच्या पध्दतीबाबत सर्वसाधारण सुचना / माहिती खालील प्रमाणे देण्यात येत आहेत . 

सर्व सुचनांचे काळजी पुर्वक वाचन करून अर्ज विहित केलेल्या पध्दती नुसारच अर्ज सादर करावा . अर्जामध्ये दिलेल्या नमुद माहितीच्या आधारे व मुलाखती दरम्यान सादर केलेल्या प्रमाणपत्रांच्या / कागदपत्रांच्या आधारे उमेदवार पात्र व अपात्र ठरविण्यात येईल . 

त्या आधारे त्याचा समावेश पुढील निवड प्रक्रियेत करण्यात येईल . अर्ज स्वीकरण्यात आला किंवा पुढील निवड प्रक्रियेत समावेश करण्यात आला म्हणजे उमेदवाराची निवड झाली असा होणार नाही . निवड प्रक्रिये दरम्यान कोणत्याही वेळी किंवा उमेवाराच्या निवडी नंतर अर्जदार विहित अर्हता धारत करीत नसल्याने किंवा कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा उमेदवाराची निवड तात्काळ रद्द करण्यात येईल . 

स्टाफ नर्स भरती 2022


क ) अर्ज करण्याच्या अनुषंगाने सुचना - 

१ ) उमेदवारांनी जाहिरातीत नमुद गुगल लिंकवर ऑनलाईन गुगल फार्म मध्येच अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे . 

खालील लिंक कॉपी करा 👇👇

Medical Officer ( MBBS ) या पदाकरीता :

 https://forms.gle/NcRNfd3MndMhiRr47 Staff Nurse या पदाकरीता : https://forms.gle/Uuobngn VvakLf9119 MPWMale या पदाकरीता : https://forms.gle/3kyeSFhhnzUxX8R37 

२ ) अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्याची माहिती अचुक भरावी . एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी . 

३ ) गुगल फार्म परीपुर्ण भरल्यावर त्याची प्रिंट काढावी

४ ) पुर्ण भरलेल्या गुगल फॉमची स्वसाक्षांकित प्रत सोबत धनाकर्ष व दिलेल्या चेकलिस्ट नुसार आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रती मुद्दा ( ट ) मधील क्र . ८ मध्ये नमुद पत्यावर विहित कालमर्यादेत सादर करावा . दिलेल्या मुदतीनंतर सादर करण्यात येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही . टपालाने / कुरीयरने सादर करण्यात आलेले अर्ज विहित कालावधीत या कार्यालयात पोहोचतील याची दक्षता घ्यावी . उशीरा प्राप्त अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी . 

५ ) अर्जदाराने प्रत्यक्ष भरलेल्या गुगल फार्मची प्रत तसेच आवश्यक सर्व दस्ताऐवज या कार्यालयास प्राप्त नसल्यास असा अर्ज अपुर्ण समजण्यात येऊन तो रद्द करण्यात येईल .

स्टाफ नर्स भरती 2022

६ ) एका पदाकरीता एकच गुगल फार्म भरणे आवश्यक आहे . एका पेक्षा अधिक पदांकरीता उमेदवार अर्ज करत असेल , त्यावेळेस प्रत्येक पदाकरीता स्वतंत्र्य गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे . तसेच प्रत्येक पदाकरीता अर्ज शुल्काचा स्वतंत्र्य धनाकर्ष जोडणे आवश्यक आहे .

 ख ) वयोमर्यादा 

१ ) गुगल अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकास म्हणजेच दि .०६ / ० ९ / २०२२ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे ते कमाल ३८ वर्षे राहील . 

२ ) राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा पाच वर्षांनी शिथिलक्षम राहील . 

३ ) शासन सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी कमाल वयोमर्यादा ६५ वर्षे राहील . तथापी संबंधीतांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे शारिरिक व मानसीक दृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहिल . 

४ ) राष्ट्रीय आरोग्य अभियानात सद्यस्थितीत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कमाल वयोमर्यादा लागु राहणार नाही . तथापी अर्जासोबत सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या कार्यालयाच्या प्रमुखांचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे अनिवार्य आहे . 

ग ) अर्ज भरण्याबाबतच्या सुचना १ ) २ ) ३ ) ४ ) ५ ) ६ ) ७ ) ८ ) सर्व प्रथम ज्या पदाकरीता अर्ज करावयाचा आहे त्या पदाकरीता दिलेल्या गुगल क्लिक करुन त्यानुसार अर्ज भरावा . 

ज्या जातीच्या प्रवर्गामध्ये अर्ज करावयाचा आहे ते जातीचे प्रवर्ग निवडावे ..

स्टाफ नर्स भरती 2022


 उमेदवाराने स्वतःचे पुर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्रा प्रमाणेच अचुक पणे नोंदवावे . अर्जासोबत माध्यमिक शालांत परिक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी . 

लिंकला माध्यमिक शालांत परिक्षा प्रमाणपत्रामध्ये नमुद केलेली जन्म तारीखच अर्जात नमुद करावी . जाहिरात प्रसिध्द केलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवाराचे वय ( वर्ष , महिने व दिवस ) अर्जात अचुक नमुद करावे . 

अर्जात उमेदवाराचे लिंग (पुरुष/स्री) या बाबतची माहिती नमुद करावी . 

अर्ज करीत असणारी अर्जदार विवाहित असलयास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र ( Gazette ) अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे . 

अर्जामध्ये उमेदवाराने स्वतःचा वैध ई - मेल आयडी / पर्यायी ई - मेल आयडी , चालु भ्रमणध्वनींचा क्रमांक / पर्यायी भ्रमणध्वनीचा क्रमांक नमुद करणे बंधनकारक आहे . 

मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखती संदर्भात देण्यात येणाऱ्या सुचना ई - मेल व्दारे देण्यात येतील . 

पात्र उमेदवारांची यादी विभागाच्या संकेत स्थाळावर प्रसिध्द करण्यात येईल . 

सदर ई - मेल आयडी पद भरती प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत चालु राहील व ईमेल वेळोवेळी तपासण्याची जबाबतदारी उमेदवाराची राहील . 

९ ) उमेदवाराने आपला जातीचा तपशिल अचुकपणे नमुद करावा . 

स्टाफ नर्स भरती 2022


१० ) इतर मागासवर्ग , विमुक्त जाती व भटक्या जमाती , विशेष मागासप्रवर्ग , आर्थिक दृष्टया दुर्बल घटक प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील . 

अन्यथा अशा उमेदवारांचे अर्ज नाकारण्यात येतील . 

११) अर्जदाराने आपला सध्याच पत्ता व कायमस्वरूपी पत्ता गुगल फार्ममध्ये अचुक नमुद करावा 

 पदभरतीबाबत पात्र / अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची यादी आणि पदभरती बाबतच्या आवश्यक सुचना व सुधारणा वेळोवेळी या कार्यालयाच्या https://zpchandrapur.co.in/ किंवा https://zpchandrapur.maharashtra.gov.in/en संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येतील याकरीता उमेदवारांना वेळोवळी संकेतस्थळावर भेट देणे देखील बंधनकारक आहे .

घ ) शैक्षणिक अर्हता / पात्रता - 

१ ) शैक्षणिक अर्हतेबाबतचा सविस्तर व अचुक तपशिल नोंद करावा . 

२ ) गुगल अर्ज सादर करावयाच्या शेवटच्या तारखेला उमेदवाराकडे जाहिरातीमध्ये नमुद शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे आवश्यक आहे . 

३ ) शैक्षणिक अर्हता ज्या तारखेस प्राप्त केली आहे ती तारीख अर्जात नमुद करणे आवश्यक आहे . ( निकाल घोषित झालेली तारीख ) 

४ ) अर्ज भरत असताना अंतिम वर्षाच्या मिळालेल्या गुणांची टक्केवारी अचुकपणे नमुद करावी . ग्रेड अथवा अन्य श्रेणी नमुद न करता गुणांची टक्केवारी नमुद करणे अनिवार्य आहे . 

प्रमाणपत्रात नमूद गुणांची टक्केवारी व अर्जात नमुद टक्केवारी न जुळल्यास असे अर्ज नामंजुर करण्यात येतील . 

५ ) अंतिम प्रमाणपत्रामध्ये ग्रेड अथवा श्रेणी नमुद असल्यास संबंधित संस्थेकडुन त्याचे गुणांमध्ये रुपांतर करून ते संबंधित संस्थेकडुन प्रमाणित करुन घ्यावे . मुलाखतीच्या वेळी ती सादर करावी . 

६ ) उपरोक्त पदांपैकी तांत्रिक पदांकरीता उदा . वैद्यकिय अधिकारी , स्टाफ नर्स या पदांकरीता तत्सम कौन्सिलचे वैध नोंदणी प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील . 

अन्यथा उमेदवारांस अपात्र ठरविण्यांत येईल .

स्टाफ नर्स भरती 2022


 ७ ) एमपीडब्ल्यू ( पुरुष ) या पदाकरीता विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा

 किंवा 
शासनाने तिच्याशी समतुल्य घोषित केलेली इतर कोणतीही परिक्षा उत्तीर्ण केलेली आहेत आणि विभागाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था , नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेली निमवैद्यकिय मुलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम

 किंवा 
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरिक्षक ( सॅनिटरी इन्सपेक्टर ) किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरिक्षक ( सॅनिटरी इन्सपेक्टर ) किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण करुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . 

८ ) उमेदवारांची गुगल फार्ममध्ये नमुद माहिती नुसर अर्जाची छाननी करण्यात येईल . 

पात्र उमेदवारांनी अर्जात नमुद केलेल्या सर्व शैक्षनिक अर्हतेबाबतची सर्व प्रमाणपत्र / कागदपत्र मुलाखतीच्या वेळी एक प्रत या कार्यालयास सादर करणे अनिवार्य राहील . 

९ ) पात्र उमेदवारांनी मुलाखतीच्या दरम्यान आवश्यक शैक्षणिक अर्हतेच्या गुणपत्रिका तसेच राखीव संवर्गाकरीता आवश्यक दस्ताऐवज न जोडल्यास सदरील उमेदवारांना अपात्र ठरविले जाईल . 

१० ) पदाकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता / पात्रता ही शासकीय मान्यताप्राप्त विद्यापिठातुनच प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे . 

ड ) अनुभव - 

१ ) शैक्षणिक अर्हता व आवश्यक अतिरीक्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतरचा अनुभव ग्राहय धरण्यात येईल . 

त्यानुसार शैक्षणिक अर्हता धारण करण्यापूर्वीच्या अनुभवाची नोंद करण्यात येऊ नये . त्या अनुभवाची परिगणना करण्यात येणार नाही . 

२ ) अनुभव हा शासकिय , निमशासकिय स्थानिक स्वराज्य संस्था अथवा राष्ट्रीय आरोग्य अभियान यांचाच ग्राहय धरण्यात येईल . 

३ ) अनुभवाचा तपशिल नमुद करीत असताना पहिली नियुक्तीचा कालावधी ते सध्याचा नियुक्ती कालावधी या क्रमानेच द्यावा . 

४ ) अनुभवाचा तपशिल नमुद करीत असतांना ज्या कार्यालयाचे अनुभव प्रमाणपत्र प्राप्त आहे अशाच कार्यालयाचा तपशिल फार्ममध्ये नमुद करावा . 

अनुभव प्रमाणपत्र नसल्यास सदरचा अनुभव ग्राहय धरण्यात येणार नाही . 

अनुभव प्रमाणपत्रामध्ये अनुभवाचा कालावधी सुस्पष्टपणे नमुद करावा .

५ ) अनुभवाचा तपशिल नमुद करीत असताना रुजु दिनांक व कार्यमुक्तीचा दिनांक अचुकपणे नमुद करावा . सदर तारखा अनुभव प्रमाणपत्रानुसारच नोंदविण्याची दक्षता घ्यावी . यामध्ये तफावत आढळल्यास सदर प्रमाणपत्र अवैध ठरविले जाईल . 

६ ) ज्या पदाकरीता अर्ज केला आहे त्या पदाकरीता आवश्यक असलेला अनुभवच ग्राहय धरण्यात येईल . या व्यतिरीक्त इतर अनुभव असल्यास असा अनुभव विचारात घेतला जाणार नाही .

 च ) संगणक व अर्हता व इतर

 १ ) MSCIT प्रमाणपत्र धारण करीता असल्याचा तपशील नमुद करावा . 

छ ) लहान कुटूंबाचे प्रमाणपत्र 

१ ) शासनाच्या धारेणानुसार उमेदवारास लहान कुटूंबाचे पालन करणे आवश्यक राहील . 

२ ) विहित नमुन्यातील प्रमाणपत्र मुलाखतीस पात्र उमेदवाराने मुलाखती दरम्यान सादर करणे अनिवार्य आहे . 

ज ) अर्ज शुल्क 

१ ) उमेदवारास अर्जासोबत अर्ज शुल्काचा धनाकर्ष ( Demand Draft ) जोडणे आवश्यक आहे . 👇👇

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु .२००/ - व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु . १००/ - रकमेचा धनाकर्ष ( डिमांड ड्राफट ) अर्ज शुल्क असेल . धनाकर्ष पुढील नावे काढावा . 

"District Integrated Health & Family Welfare Society , Chandrapur" 

२ ) योग्य धनाकर्षाशिवाय प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत . 

३ ) एका पेक्षा अधिक पदाकरीता अर्ज करीत असल्यास प्रत्येक पदाकरीता स्वतंत्र धानकर्ष जोडावा .

 झ ) उमेदवाराचा फोटो व स्वाक्षरी - 

१ ) उमेदवाराने गुगल फॉर्मची प्रिंट काढल्यावर प्रिंटच्या पहिल्या पानावरील खालील जागेत त्याचे अलीकडील काढलेला सुस्पष्ट फोटो चिकटवावा फोटो स्टेपल करु नये . 

२ ) स्वाक्षरी करीता राखीव जागेत स्वाक्षरी करावी . 

त्र ) निवड प्रक्रिया - 

१ ) सदर पदभरतीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या संख्येनुसार निवड प्रक्रिया केवळ मुलाखतीव्दारे किंवा लेखी व मुलाखतीव्दारे ठरविण्याचे सर्व अधिकार मा . मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे राखून ठेवले आहेत . 

२ ) अर्जाच्या संख्येनुसार उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेण्यात येईल . 

३ ) लेखी परिक्षा घ्यावयाची झाल्यास त्याबाबत संबंधित सुचना यथावकाश निर्गमित करण्यात येईल.

 ४ ) मुलाखतीव्दारे निवड करावयाची असल्यास मा . मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या मान्यतेने निकष लावुन १:३ ते १:५ उमेदवारांची निवड मुलाखतीसाठी करण्यात येईल . 

मुलाखतीने उमेदवार निवडताना उमेदवाराचे गुणांकन आवश्यक अर्हतेच्या परिक्षेतील अंतिम वर्षाचे गुण , अतिरीक्त अर्हता , अनुभव आणि मुलाखतीचे गुण विचारात घेऊन खालील तक्त्यानुसार करण्यात येईल . 

गुणांच्या गुणांच्या अ पदाकरीता आवश्यक किमान | अंतिम वर्षातील एकुण प्राप्त अर्हता ( टक्केवारीच्या प्रमाणात ५० गुण ) अंतिम वर्षातील एकुण प्राप्त ( टक्केवारीच्या प्रमाणात १० गुण ) प्रत्येक वर्षाकरीता २ गुण ( कमाल २० गुण ) ब क ड पदाकरीता आवश्यक अतिरीक्त अर्हता / पदव्युत्तर अर्हता पदाकरीता आवश्यक अनुभव आवश्यकतेनुसार मुलाखत

तक्त्याची image जोडली आहे म्हणजेच अपलोड केली आहे👇👇👇👇👇



>अर्जासोबत सादर करावयाच्या आवश्यक कागदपत्रांच्या प्रती ( चेकलिस्ट ) - 

१ ) पदाकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक ( Marksheet ) 

२ ) पदवी / पदवित्तर पदवी असल्यास उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक ( Marksheet ) 

३ ) शाळा सोडल्याचा / जन्मतारखेचा दाखला . 

४ ) अनुभवाची प्रमाणपत्रे . 

५ ) जात प्रमाणपत्राची अद्यावत प्रत . 

६ ) नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ( ज्या प्रवर्गास लागू आहे त्यांचे करीता ) 

७ ) तांत्रिक पदांकरीता तत्सम कौन्सिलचे वैध नोंदणी प्रमाणपत्र . 

टिप - किंवा 

१ ) गुगल फॉर्ममध्ये नमुद केलेल्या माहितीनुसार मुलाखतीस पात्र / अपात्र उमेदवारांची यादी या कार्यालयाच्या https://zpchandrapur.co.in/ https : //zpchandrapur.maharashtra . gov.in/en संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल .

 २ ) जे उमेदवार मुलाखतीच्या वेळी मुळ कागदपत्रे व स्वसाक्षांकित कागदपत्राची प्रत या कार्यालयास सादर करणार नाहीत ते उमेदवार मुलाखतीस पात्र राहणार नाहीत , याची कृपया नोंद घेण्यात यावी .


वर प्रदान केलेली भरती माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. आम्ही कोणतीही भरती हमी देत नाही. भरती रिक्त पदावर नियुक्त केलेल्या कंपनी किंवा संस्थेच्या अधिकृत भरती प्रक्रियेनुसार केली जाईल. ही नोकरीची माहिती देण्यासाठी आम्ही कोणतेही शुल्क आकारत नाही. या लेखातील कोणत्याही माहितीमुळे उद्भवलेल्या कोणत्याही प्रकारच्या हानी किंवा हानीसाठी किंवा त्यावर अवलंबून असलेल्या कोणत्याही कृतींसाठी लेखक त्याचे कोणतेही दायित्व स्वीकारत नाहीत.









 

स्टाफ नर्स भरती 2022>> राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर जाहिरात📚📚 स्टाफ नर्स भरती 2022>> राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर जाहिरात📚📚 Reviewed by D.B.PATIL on 8/27/2022 08:47:00 pm Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

🚶‍♂️💃🚶‍♂️

Blogger द्वारा संचालित.