12 वी सायन्स नंतर कम्प्युटर सायन्सच्या टॉप कोर्सेसची यादी इथे पहा सविस्तर

 


━━━━━━━━━━━━━

बारावीनंतर कॉम्प्युटर सायन्सचे 'हे' 

कोर्स कराल तर मिळेल लाखोत पगार! 

ही आहे कम्प्युटर सायन्सच्या टॉप कोर्सेसची यादी

━━━━━━━━━━━━━

1️⃣ *बॅचलर ऑफ इंजीनियरिंग इन कम्प्युटर सायन्स:* 

यामध्ये बीई हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सिस्टम शिकवली जाते. 

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनियर, नेटवर्क इंजिनिअर किंवा डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर अशा पदांवर हा कोर्स केलेल्या उमेदवाराला नोकरी मिळते व सुरुवातीलाच अगदी वार्षिक चार ते आठ लाख रुपयांची पॅकेज मिळू शकते. 

या अभ्यासक्रमामध्ये मॅन्युफॅक्चरिंग, आयटी आणि कम्युनिकेशन क्षेत्रामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतात.


2️⃣ *बीएससी इन कम्प्युटर सायन्स:* 

बीएससी इन कॉम्प्युटर सायन्सच्या माध्यमातून पदवीधरांना सॉफ्टवेअर किंवा सॉफ्टवेअर डेटा अनालिस्ट म्हणून म्हणून काम करणाऱ्या वेब डेव्हलपर्स वर्षाला तीन ते सहा लाख रुपयांचे पॅकेज कमवतात. 

हा कोर्स केल्यानंतर आयटी आणि संशोधन क्षेत्रामध्ये मोठी संधी उपलब्ध होते.


3️⃣ *बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी:* 

आयटीच्या माध्यमातून सॉफ्टवेअर विकास तसेच संगणक प्रणाली आणि नेटवर्क प्रशासन यांचा समावेश आहे. या माध्यमातून नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर किंवा सायबर सिक्युरिटी अनालिस्ट म्हणून यामध्ये पदवीधरांना वार्षिक 4 ते 9 लाख रुपयांचे पॅकेज मिळू शकते. 

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तसेच फायनान्स आणि सरकारी क्षेत्रामध्ये हा कोर्स पूर्ण केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर करिअरच्या संधी उपलब्ध आहेत.


4️⃣ *बॅचलर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन म्हणजेच बीसीए:* 

या अभ्यासक्रमामध्ये कंप्यूटर एप्लीकेशन आणि प्रोग्रामिंग भाषांवर जोर देण्यात येतो.

 सॉफ्टवेअर टेस्टिंग तसेच डेव्हलपमेंट किंवा सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेशन सारख्या पदांवर या कोर्समध्ये पदवीधर असलेल्या पदवीधरांना वार्षिक अडीच ते पाच लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो.

 हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आयटी कंपन्या तसेच सरकारी संस्था आणि ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये चांगल्या संधी उपलब्ध आहेत.


5️⃣ *बीएससी इन डेटासायन्स:* 

बीएससी डेटा सायन्स अभ्यासक्रमामध्ये डेटा विश्लेषण, एमएल आणि सांख्यिकीय मॉडेलिंग वर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाते. 

डेटा अनालिस्ट, सायंटिस्ट किंवा बीआय ऍनालिस्ट म्हणून पदवीधरांना वर्षाला पाच ते दहा लाख रुपये पर्यंत पॅकेज मिळते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अनालिटिक्स आणि एआय उद्योगांमध्ये प्रचंड संधी उपलब्ध आहे.


6️⃣ *बीएससी सॉफ्टवेअर:* 

हा अभ्यासक्रम अभियांत्रिकी पद्धती तसेच कोडींग आणि प्रकल्प व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करतो. 

यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर तसेच सॉफ्टवेअर डेव्हलपर्स किंवा टेस्टर म्हणून पदवीधरांना एका वर्षाला साडेतीन ते सात लाख रुपये पर्यंत पॅकेज मिळते.


8️⃣ *बीएससी इन सायबर सिक्युरिटी:* 

या अभ्यासक्रमामध्ये येथे एथीकल हॅकिंग आणि मॅनेजमेंट व नेटवर्क सेक्युरिटी इत्यादी विषयावर लक्ष केंद्रित केले जाते.

 सायबर सुरक्षा तज्ञ, अधिकारी किंवा प्रवेश परीक्षक म्हणून पदवीधरांना एका वर्षाला चार ते आठ लाख रुपयांचे पॅकेज मिळते. सायबर सिक्युरिटी कंपन्या तसेच सरकार आणि फायनान्समध्ये या क्षेत्रातील उमेदवारांना चांगल्या संधी उपलब्ध आहेत.


दुसरी बातमी 👇👇👇


👮🏻‍♂️ पोलीस भरतीची मैदानी चाचणी ६ जूनपासून तर लेखी परीक्षा ३० ऑगस्टपूर्वी होणार..


💁🏻‍♂️ लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पोलीस भरतीची मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन गृहविभागाने केले आहे. राज्य राखीव पोलीस बल या घटकातील पोलीस भरतीची प्रक्रिया येत्या ६ जून २०२४ रोजी सुरू होत आहे...


🤷🏻‍♂️ *प्रशिक्षण कधी सुरू होणार?* 

पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीनंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यात लेखी परीक्षा एकच वेळी होणार असून ३० ऑगस्टपूर्वी भरितीची प्रक्रिया संपविण्याचे गृहविभागाचे नियोजन असून ऑक्टोबर महिनाअखेर या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू होईल, अशी माहिती आहे.


👁️ *अशी होते मैदानी चाचणी* 

1. पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणीत १०० मीटर व १६०० मीटर धावणे (महिलांसाठी ८०० मीटर) आणि गोळाफेक असे प्रकार घेतले जातात. 

2. या चाचणीत उमेदवारास किमान ४० टक्के गुण घेणे बंधनकारक आहे. 

3. मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी १० उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील. 

4. १०० गुणांच्या लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण अपेक्षित आहेत. 

5. मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून, त्या दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळविलेल्यांची मेरिट यादी प्रसिद्ध होईल. त्यानुसार पोलिस शिपायांची निवड होणार असून, चालक पोलिस शिपाई पदासाठी स्वतंत्रपणे वाहतुकीसंदर्भातील चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे.


एक आरोग्याची बातमी


*■ दमा होण्याची कारणे, लक्षणे, उपचार !*

*संकलन : डॉ. नरेंद्र वानखडे* 

*MBBS, MS* 


*दमा म्हणजे काय?*

दमा (अस्थमा) हा श्वसनसंस्थेचा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रुग्णास अस्थमाचा झटका येत असतो. यामध्ये श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनतात. त्यातून अधिक प्रमाणात कफाची (Mucus) निर्मिती होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास निर्माण होतो. घशात कफ साठल्याने श्वासोच्छवासाच्या वेळी घुरघुर किंवा साँयसाँय असा आवाज योतो.


*अस्थमाची लक्षणे*

◆ खोकला येतो, रात्रीच्या वेळी किंवा पहाटे खोकला अधिक प्रमाणात येणे. खोकल्याची उबळ अधिकतेने येत असते, मात्र छातीत कफ इतका चिकटलेला असतो की, खोकून खोकून व्यक्ती बेजार होते पण कफ सुटत नाही. श्वास घुटमळल्या सारखे होते, बराच वेळ खोकल्यावर थोडा जरी कफ पडला, तरी काही काळापुरते बरे वाटते, पण पुन्हा खोकला येतोच.

◆ दम लागतो, बैचेनी होते, वारंवार छाती चोंदणे, बोलण्यास त्रास होतो.


*दम्याचा झटका येणे किंवा अस्थमाचा अटॅक येणे म्हणजे काय?* 

दम्याच्या रुग्णांना वरचेवर दम्याचा झटका येत असतो त्याला अस्थमा अटॅक (Asthma attack) असेही म्हणतात. अनेकदा दमा रुग्णास धुळ, धुर, परागकण, केसाळ पाळीव प्राणी, दमट हवामान, प्रखर सुर्यकिरण, कचरा, हवेतील प्रदूषित कण व मानसिक ताणामुळेही अस्थमाचा अटॅक येऊ शकतो. अस्थमाचा अटॅक काही मिनिटांपासून ते काही तासापर्यंत राहू शकतो.


*दमा होण्याची कारणे*

◆ शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती मधील विकृती ही दमा रोगास प्रमुख कारण असते.

◆ ढगाळ वातावरण, हिवाळा व पावसाळा ह्या सारख्या आर्द्र वातावरणामुळे अस्थमाचा अटॅक

येतो.

◆ धुळ, धुर, धुके, माती, कचरा, बारीक तंतू, परागकण, पाळीव प्राण्यांचे केस, पेंट्स, उग्र

वास असणाऱ्या पदार्थांच्या संपर्कात आल्यामुळे अस्थमाचा अटॅक येतो, सिगरेट किंवा इतर प्रकारचा धूरामुळे, शारीरीक अतिश्रमामुळे, अतिव्यायामामुळे, हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे.

◆ वायु प्रदुषणामुळे ताप, फ्लू, घसा सुजणे, ब्राँकायटिस, खोकला यासारखे रोग उत्पन्न झाल्याने.

◆ मानसिक ताणतणावामुळे अस्थमा रुग्णांना अस्थमाचा अटॅक येण्याचा धोका अधिक असतो.

*दम्याचा त्रासात घ्यायची काळजी*

◆ योग्य आहार, विहार आणि योग्य औषधोपचाराद्वारे दम्याच्या अटॅक पासून दूर राहता येते,

◆ दम्याचा पहिला दौरा आल्यानंतर भविष्यात अशी स्थिती उद्भवू नये म्हणून सतर्क रहावे, धुम्रपान करु नये.

◆ मानसिक ताणतनाव रहित रहावे.

◆ धुळ, धूर, हवेच्या प्रदुषणापासून दूर रहावे.

◆ दमा रुग्णांनी घरात पाळीव प्राणी पाळू नयेत.

◆पावसाळा नि हिवाळ्यात विशेष काळजी घ्यावी.

◆ प्रखर उन्हामध्ये जाणे टाळावे.

◆ थंड पदार्थ खाऊ नये, थंड पाणी घेऊ नये. 

◆ मोकळ्या हवेत फिरावयास जावे.

◆ विटामिन A आणि D युक्त आहार घ्यावा. बदाम, हिरव्या पालेभाज्या आहारात असाव्यात.

◆ डॉक्टरांनी दिलेले उपचार घ्यावेत.


*गेट लाईफ लेझर पाइल्स हॉस्पिटल*

*लाली लॉन समोर,ओल्ड बायपास रोड*

*अमरावती*


12 वी सायन्स नंतर कम्प्युटर सायन्सच्या टॉप कोर्सेसची यादी इथे पहा सविस्तर 12 वी सायन्स नंतर कम्प्युटर सायन्सच्या टॉप कोर्सेसची यादी इथे पहा सविस्तर Reviewed by Best Seller on 6/03/2024 07:58:00 pm Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

🚶‍♂️💃🚶‍♂️

Blogger द्वारा संचालित.