10 वी 12 वी निकालानंतर विद्यार्थ्यांना अचूक प्रवेश मार्गदर्शन इथे सविस्तर पहा



━━━━━━━━━━━━━

 👩🏻‍🎓 दहावी-बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी

 'हे' पर्याय आहेत

अचूक प्रवेश घ्या अन्‌ करिअरची दिशा निश्चित करा

━━━━━━━━━━━━━

💁🏻‍♂️ बारावी आणि दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना कला (बीए), वाणिज्य (बीकॉम), विज्ञान (बीएससी) शाखेशिवाय अभियांत्रिकीसह लॉ, डीएड, फार्मसी अशा विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची संधी आहे.


👩🏻‍💻 बारावीनंतर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, मेडिकल, कला (एमपीएससी, युपीएससी व्यवस्थित तयारी, अभ्यास केल्यास), जिओग्रॅफीकल सर्व्हे ऑफ इंडिया सर्वेअर म्हणून संधी मिळू शकते. नर्सिंग, पॅथॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक्स, बायोइन्फॉरमेटिक्स, डीएड, बीएसएल, फार्मसी, डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी, बीएससी, बीएससी ॲग्री, बीए, बीकॉम, बीबीए, बीसीए, बीबीएम, फॉरेन लॅंग्वेज अशा अभ्यासक्रमांसाठी देखील प्रवेश घेता येईल.


🧐 *विद्यार्थ्यांनी प्रवेशापूर्वी घ्यावी संपूर्ण माहिती*

बारावीनंतर विद्यार्थ्यांनी कॉलेजची वेबसाईट पाहावी व तेथील प्रवेश प्रक्रिया पहावी, त्याठिकाणी भेट देऊन प्रवेश व अभ्यासक्रम, विषयांची माहिती घ्यावी. सध्या कौशल्याधारित अभ्यासक्रमाकडे कल जास्त असून स्वायत्त महाविद्यालयांमध्ये त्यादृष्टीने भरपूर कोर्सेस आहेत. त्या त्या महाविद्यालयांमधील विषय पाहून आवडीचे विषय विद्यार्थ्यांना निवडता येतात. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कला शाखेचा विद्यार्थी 'विज्ञान' व 'वाणिज्य'चा विषय देखील घेऊ शकतो. त्याला आवडीच्या विषयाची माहिती त्यातून मिळू शकते.


🌐 *महत्त्वाची काही संकेतस्थळे*

- तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन (अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट) www.dte.org.in

- वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, महाराष्ट्र शासन (www.dmer.org)

- व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन (www.dvet.gov.in),

- भारतीय प्रौद्योगिक संस्था आयआयटी, जेईईसंबंधी (बी.टेक पदवी) www.iitb.ac.in

- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) www.aipmt.nic.in

- 'एनडीए' प्रवेश परीक्षांसंबंधी केंद्रीय लोकसेवा आयोग www.upsc.gov.in.


🏢 *बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी*

1️⃣ *बीबीए, बीबीएम व बीसीए*

* कालावधी : तीन वर्षे

* प्रवेश : सीईटी किवा गुणवत्ता यादीनुसार थेट प्रवेश

* संधी कोठे? : औद्योगिक व आयटी क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार, नागरी सेवा परीक्षा


2️⃣ *फॉरेन लॅंग्वेज (जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज, जॅपनीज, कोरियन)*

* कालावधी : बेसिक, सर्टिफिकेट किंवा इतर कोर्सेसवर आधारित तांत्रिक शिक्षण


3️⃣ *इंजिनिअरिंग डिप्लोमा*

* कालावधी : तीन वर्षे

* पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र, थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश

* संधी कोठे? : आयटी औद्योगिक क्षेत्रात, उद्योग- व्यवसाय, स्वयंरोजगार

* उच्च शिक्षण : बीईच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश


4️⃣ *बीई*

* कालावधी : चार वर्षे

* पात्रता व प्रवेश : बारावी विज्ञान, सीईटी किंवा गुणवत्तेनुसार

* संधी कोठे? : स्वतःचा व्यवसाय, आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी व अभियांत्रिकी सेवा परीक्षा

* उच्च शिक्षण : एमई, एमटेक, एमबीए; तसेच जीआरई देऊन परदेशात एमएस


5️⃣ *बीटेक*

* कालावधी : चार वर्षे

* पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र, आयआयटी जेईई, एआयईईई

* संधी कोठे? : औद्योगिक क्षेत्र, सरकारी व खासगी उद्योग, संशोधन संस्था, आयटी क्षेत्र, नागरी सेवा व अभियांत्रिकी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार

* उच्च शिक्षण : एमई, एमटेक, एमबीए किंवा जीआरई देऊन परदेशात एमएस


6️⃣ *ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी*

* कालावधी : चार वर्षे

* पात्रता : बारावी शास्त्र, सीईटी किंवा गुणवत्तेनुसार

* पुढील शिक्षण : ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण


7️⃣ *टूल ॲण्ड डाय मेकिंग*

* कालावधी : चार वर्षे

* पात्रता : दहावी- बारावी पास

* संधी : टूल ऍण्ड डाय इंडस्ट्री, भारत आणि मलेशियाशियामध्ये भरपूर संधी गव्हर्नमेंट टूल रूम ऍण्ड ट्रेनिंग सेंटर (जीटीटीसी), नेट्टूर टेक्‍नॉलॉजी ट्रेनिंग फाउंडेशन (एनटीटीएफ)


8️⃣ *डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्‍नॉलॉजी*

* कालावधी : तीन वर्षे

* पात्रता : बारावी (किमान ७० टक्के)

* संधी कोठे : प्लॅस्टिक आणि मोल्ड इंडस्ट्रीमध्ये संधी, सिंगापूर, मलेशियामध्ये संधी


9️⃣ *बीआर्च*

* कालावधी : पाच वर्षे

* पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र, एनएटीए, जेईई

* संधी कोठे? : स्वतःचा व्यवसाय किंवा बांधकाम उद्योगांमध्ये नोकरी, नागरी सेवा परीक्षा

* उच्च शिक्षण : एमआर्च, एमटेक


1️⃣0️⃣ *एमबीबीएस, बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस, बीडीएस*

* कालावधी : साडेपाच वर्षे

* पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र, नीट

* संधी कोठे? : स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी


1️⃣1️⃣ *बीएससी इन नर्सिंग*

* कालावधी : चार वर्षे

* पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र व नीट उत्तीर्ण

* संधी कोठे? : रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी


1️⃣3️⃣ *बीव्हीएससी ॲण्ड एएच*

* कालावधी : पाच वर्षे

* पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र व नीट

* संधी कोठे? : प्राणी, जनावर रुग्णालयात नोकरी, प्राणी संग्रहालय, अभयारण्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय


1️⃣4️⃣ *डी- फार्मसी, बी-फार्मसी*

* कालावधी : चार वर्षे

* पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र, सीईटी किंवा गुणवत्तेनुसार

* संधी कोठे? : औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्थेत नोकरी, स्वतःचा व्यवसाय, नागरी सेवा परीक्षा


🔥 जळालेल्या ट्रान्स्फॉर्मर(डीपी)ची होणार लगेच दुरुस्ती! 'इथे' नोंदवा तक्रार.

💁🏻‍♂️ ट्रान्स्फॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास तत्काळ दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने 'महावितरण'ला तसे निर्देश दिले आहेत. स्थानिक नागरिकांनी त्यासंबंधीची तक्रार करण्यासाठी 'महावितरण'ने *१८००२१२३४३५* किंवा *१८००२३३३४३५* हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले आहे, शिवाय महावितरणच्या ॲपवरूनही तक्रार नोंदवता येणार आहे.


🤳🏼 'महावितरण'ला ट्रान्स्फॉर्मर बिघडल्याची खबर मिळाल्यानंतर किमान तीन दिवसात ट्रान्स्फॉर्मर बदलून तथा दुरुस्त करून दिला जात आहे. तथापि, ट्रान्स्फॉर्मर जळाल्याचे उशिराने समजल्यानंतर प्रत्यक्षात वीज पुरवठा पुन्हा सुरू होण्यास आणखी विलंब होतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. त्यावर तक्रार आल्यानंतर तत्काळ दुरुस्ती करून दिली जात आहे. त्यासाठी ग्राहकांना एक रुपयाही भरावा लागत नाही हे विशेष.


🤳🏼 *ॲपवरून तक्रार अशी करा...* 

* सर्वप्रथम मोबाईलवर 'महावितरण' ॲप उघडा

* नादुरुस्त रोहित्राची माहिती कळवा त्या बटणावर

* ग्राहकाचे नाव नंबर दिसेल त्यावर

* आपले कनेक्शन ज्या ट्रान्सफॉर्मरला जोडले आहे, त्याचा नंबर, गाव, तालुका- जिल्ह्याची माहिती भरलेली दिसेल.

* ट्रान्सफॉर्मर जवळील खूण कोणती, कधीपासून ट्रान्सफॉर्मर बंद आहे आणि कोणता बिघाड दिसतो याची माहिती भरा

* संबंधीत ट्रान्सफॉर्मरचा फोटो काढून अपलोड करा

* नोंद करा किंवा सबमिट हे बटण दाबा


📝याप्रमाणे ट्रान्सफॉर्मरची तक्रार नोंदविली जाईल. त्याची नोंद थेट महावितरणच्या मुख्य सर्वरमध्ये होईल आणि तातडीने दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना एसएमएसद्वारे सूचना दिली जाईल.


✉️ ट्रान्सफॉर्मर बदलला की, त्याची माहिती ग्राहकाला एसएमएसद्वारे दिली जाते.


⚛️ *राशीभविष्य : ३ जून सोमवार.

🐏 *मेष -* 

आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असेल. घरात पाहुणे आल्याने खर्चात वाढ होईल. नातेसंबंधातील दूरावा संवादाने संपवाल. जोडीदारासाठी दागिने किंवा भेटवस्तू खरेदी कराल. नैतिक मूल्यांना पूर्ण महत्त्व द्याल. पैशाशी संबंधित चांगली बातमी ऐकू येईल. कोणतीही मोठी जोखीम घेणे टाळावी, अन्यथा समस्या येतील


🦬 *वृषभ -*  

आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्त असणार आहे. नवीन कामे सुरु करण्याची संधी मिळेल. ज्यामध्ये अधिक धावपळ करावी लागेल. तुमच्या विचाराने लोकांना आकर्षित करण्यात यशस्वी व्हाल. बोलण्यातला सौम्यपणा तुम्हाला आदर देईल. मोठ्या नफ्याच्या शोधात तुम्ही छोट्या संधी सोडू नका, समस्या येतील. कामच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल. लोक तुमची प्रशंसा करताना दिसतील.


👩‍❤️‍👨 *मिथुन -* 

आजचा दिवस तुमच्यासाठी संयमाचा असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी शत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. एखाद्याला दिलेले वचन वेळेवर पूर्ण करा. व्यवहाराच्या बाबतीत, तुमचा मुद्दा लोकांसमोर मांडावा लागेल. न्यायालयिन प्रकरणांमध्ये थोडे सावध राहा. कोणतेही काम जबाबदारीने करणे तुमच्यासाठी चांगले असेल. जुना मित्र खूप दिवसांनी भेटेल.


🦀 *कर्क -* 

आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असेल. आज धैर्य आणि शौर्य वाढेल. मोठ्या ध्येयाकडे वाटचाल करणे तुमच्यासाठी चांगले राहिल. काही वरिष्ठ लोकांच्या भेटीमुळे समस्या सहज सुटतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी त्यांच्या योजनांकडे पूर्ण लक्ष द्यावे. बाहेर फिरण्याचा प्लान करत असाल तर सावधगिरी बाळगा.


🦁 *सिंह -* 

आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. व्यवसायात चांगला नफा मिळाल्याने तुमचे मन प्रसन्न राहिल. नोकरी करणाऱ्या लोकांचे पद आणि प्रतिष्ठा वाढू शकते. काही महत्त्वाच्या चर्चेत भाग घेण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात पूर्ण लक्ष द्यावे. कोणतेही काम घाईने करणे टाळा. एखाद्या मित्राकडून आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या विचारसरणीचा पुरेपुर फायदा घ्याल.


👧🏻 *कन्या -* 

आजचा दिवस भाग्याच्या दृष्टीने चांगला असेल. अध्यात्मिक कार्यात रुची जागृत होईल. काही धार्मिक कार्यातही सहभाग घ्याल. अधिक ठिकाणाहून पैसे मिळाल्यास तुमचे मन प्रसन्न राहिल. मोठ्या ध्येयाचा पाठलाग कराल. पार्टनरशीपमध्ये कोणत्याही कामातून नफा मिळेल. ज्यामुळे कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल.


⚖️ *तुळ -* 

आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस थोडा कमजोर असेल. बेफिकीर राहाणे टाळा. तुमच्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्यावे. कामाच्या ठिकाणी कोणतेही जोखीमीचे काम करणे टाळा, अन्यथा अडचणींना सामोरे जावे लागेल. तुमच्या सूचनांचे पालन केले जाईल. आकस्मिक लाभामुळे तुमचे मन प्रसन्न राहिल. विचारपूर्वक पुढे जा.


🦂 *वृश्चिक -* 

आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. निरोगी अन्नपदार्थांचे सेवन करा. पोटाशी संबंधित काही समस्या तुम्हाला त्रास देतील. तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. कामात चांगली कामगिरी केल्यामुळे तुमची प्रशंसा केली जाईल. जुन्या चुकीमुळे तुम्ही अडचणीत सापडाल. तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी ऐकू येईल. स्वत:मध्ये सुधारणा कराल.


🏹 *धनु-* 

आजचा दिवस व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगला असेल. त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळेल. कामाच्या ठिकाणी स्वत:चे स्थान निर्माण करण्यात यशस्वी होतील. आज जबाबदाऱ्यांमुळे थोडे चिंतेत असाल. तरीही तुम्ही वेळेवर काम पूर्ण कराल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांचे प्रयत्न आज तीव्र होतील. कामात काही समस्या येतील. कोणालाही उधार पैसे देणे टाळा, नुकसान होईल.


🦐 *मकर-* 

आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. पैशाशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगा, अन्यथा समस्या येतील. वडिलाधाऱ्यांचा आदर ठेवावा. कलात्मक कौशल्य देखील सुधारेल. स्पर्धेच्या क्षेत्रात तुम्ही पुढे जाल आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल.


🍯 *कुंभ -* 

आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देईल. कुटुंबातील सदस्यांशी समन्वय राखण्यात यशस्वी व्हाल. वैयक्तिक बाबींवर पूर्ण लक्ष ठेवा, समस्या उद्भवतील. कोणतेही काम करताना त्याचे धोरण आणि नियम लक्षात ठेवा. मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद सोडवला जाऊ शकतो. ज्यामुळे विजय मिळेल. कोणाशीही उद्धपणे बोलणे टाळावे. घाईत निर्णय घेऊ नका.


🦈 *मीन -* 

आजचा दिवस सामाजिक कार्यात गुंतलेल्या लोकांसाठी चांगला जाणार आहे. तुमच्या एखाद्या नातेवाईकांकडून काही माहिती ऐकायला मिळू शकते. कौटुंबिक जीवन आनंदमय राहिल. जोडीदाराशी समन्वय चांगला राहिल. तुमच्यात सहकार्याची भावनाही असेल. काही महत्त्वाच्या गोष्टी गुप्त ठेवाल. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात अडचणी येतील.



10 वी 12 वी निकालानंतर विद्यार्थ्यांना अचूक प्रवेश मार्गदर्शन इथे सविस्तर पहा 10 वी 12 वी निकालानंतर विद्यार्थ्यांना अचूक प्रवेश मार्गदर्शन इथे सविस्तर पहा Reviewed by Best Seller on 6/03/2024 12:58:00 pm Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

🚶‍♂️💃🚶‍♂️

Blogger द्वारा संचालित.