NEET परीक्षा अपडेट !! शूजवर बंदी || ड्रेस कोड सह परीक्षा केंद्रावरील १० नियम आताच जाणुन घ्या..

सदर माहिती सोशियल प्लॅटफॉर्म वरून तयार केली असून आपल्या माहितिस्तव सादर करीत आहोत....🙏🙏🙏🙏🙏



━━━━━━━━━━━━━

NEET परीक्षा! 

शूजवर बंदी, काय आहे ड्रेस कोड, जाणून घ्या परीक्षा केंद्रावरील १० नियम

━━━━━━━━━━━━━

📃 _परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी असणारी नियमावली

👇🏻👇🏻

१. *नीट ड्रेस कोड :* 👔👟

* नीट परीक्षेसाठी जाणाऱ्या मुलांनी हाफ स्लीव्ह शर्ट किंवा टी-शर्ट घालून जावे. साधी पँट घालून जावे. पँटमध्ये खिसे असू शकतात. अनेक साखळ्या आणि मोठी बटणे असलेले कपडे घालण्यास मनाई करण्यात आली आहे.

* विद्यार्थ्यांना शूज घालण्याची परवानगी नाही. त्यांना फक्त चप्पल किंवा सँडल घालण्याची परवानगी आहे. मुली कमी टाचांच्या सँडल घालून येऊ शकतात.

- दागिने घालून येण्यासही मनाई आहे. परीक्षेत सनग्लासेस, घड्याळ किंवा टोपी घालून बसण्याची परवानगी नाही. हेअरबँड, ताबीज, बेल्ट, स्कार्फ, अंगठ्या, बांगड्या, कानातल्या रिंग, नाकातील नथ, हार, बिल्ला, मनगटावर घड्याळ, बांगड्या, कानातले आदि धातूच्या वस्तू सोबत आणण्यास मनाई करण्यात आली आहे.


२. कोणत्याही उमेदवाराला प्रवेशपत्र, स्वघोषणापत्र, फोटो आयडी प्रूफ, फ्रिस्किंगशिवाय परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.


३. जर उमेदवारांनी सांस्कृतिक, पारंपारिक पोशाख, किंवा धर्माशी संबंधित गोष्टी परिधान केल्या असतील, तर त्यांना परीक्षा केंद्रावर तपासणीसाठी रिपोर्टिंग वेळेच्या किमान दीड तास आधी म्हणजे दुपारी १२.३० वाजेपर्यंत कळवावे लागणार आहे.


४. *नीटमध्ये फक्त या गोष्टींना परवानगी आहे.* 

* NEET प्रवेशपत्राव्यतिरिक्त, उमेदवारांनी मूळ आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा इतर कोणताही फोटो आयडी पुरावा सोबत आणावा.

* प्रवेशपत्रावर पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत न्यावे. 

* प्रवेश पत्रकावर हे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र द्यावे लागणार आहे. 

* फोटोच्या मागची बाजू ही पांढरी असावी. प्रवेशपत्रासह डाउनलोड केलेल्या फॉर्ममध्ये पोस्ट कार्ड आकाराचा हा फोटो लावावा. हे प्रवेश पत्र परीक्षा हॉलमधील पर्यवेक्षकाला द्यावे लागणार आहे.

* जे उमेदवार प्रवेशपत्रासह डाउनलोड केलेल्या प्रोफॉर्मावर पेस्ट केलेले पोस्टकार्ड आकाराचे (4X6) छायाचित्र आणि एक पासपोर्ट आकाराचा फोटो आणणार नाहीत त्यांना प्रवेश दिला जाणार नाही.

* उमेदवार एक पारदर्शक पाण्याची बाटली जवळ ठेऊ शकतात.

* या सोबतच हँड सॅनिटायझरची ५० मिलीची बाटली देखील सोबत ठेऊ शकतात.

* नीट प्रवेशपत्रासोबत स्वयंघोषणा फॉर्म आणि अंडरटेकिंग फॉर्म देखील आणावा लागेल. तो भरलेला असावा.


६. ही परीक्षा दुपारी २ वाजता सुरू होईल. प्रवेश फक्त अर्धा तास अगोदर म्हणजेच दुपारी १.३० पर्यंत दिला जाणार आहे. दुपारी १.३० नंतर येणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही.

७. परीक्षा लिहिण्यासाठी फक्त निळा किंवा काळा बॉलपॉइंट पेन सोबत ठेवावा लागणार आहे.


8. *या गोष्टी करण्यास मनाई :* 

* कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरण परीक्षा केंद्रांवर आणण्यास परवानगी दिली जाणार नाही. 

* मोबाईल फोन, ब्लूटूथ, मायक्रोफोन, कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, पेन्सिल बॉक्स, घड्याळे यांना परवानगी नाही.

* परीक्षा केंद्रावर कोणतेही खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नाही. 

* तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये दागिने घालण्याची परवानगी दिली जाणार नाही.


९. यावर्षी देखील नीटचा पेपर ७२० गुणांचा असेल. एक प्रश्न चार गुणांचा असेल. निगेटिव्ह मार्किंग असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जाईल. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र या चार विषयांमध्ये विभाग अ मध्ये ३५ आणि विभाग ब मध्ये १५ प्रश्न असतील. १५ पैकी कोणतेही १० प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल.


१०. नीटचा निकाल १४ जून २०२४ रोजी जाहीर केला जाईल.


📃 *१०वी १२वीचा निकाल 'या' वेबसाईटवर सुद्धा पाहता येणार...* 


✒️ दहावी बारावीच्या निकालाची विद्यार्थ्यांसोबतच पालक, शिक्षक सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मात्र दहावी सीबीएसई बोर्डाचा निकाल या महिन्यात जाहीर होणार आहे. 


📃 केंद्रीय बोर्डाने सीबीएसईच्या निकालाची तारीख आणि वेळ यासंबंधी अद्याप माहिती दिली नाही. मात्र लवकरच हा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


👉 सीबीएसईच्या इयत्ता 10वी आणि 12वीचा निकाल बोर्डाच्या https://results.cbse.nic या अधिकृत वेबसाइटवर जाऊन पाहू शकता. 


👩🏻‍💻 *या वेबसाईटवर सुद्धा पाहू शकता निकाल :

cbse.gov.in

cbseresults.nic.in

cbse.nic.ind

digilocker.gov.in

results.gov.in


 👍🏻 

राशीभविष्य : ४ मे शनिवार..


🐏 *मेष -* 

मेष राशीच्या व्यावसायिक लोकांसाठी आजचा दिवस थोडा कमजोर असेल, परंतु तरीही ते त्यांच्या जुन्या योजनांमधून चांगला नफा मिळवू शकतात, ज्यामुळे ते त्यांचे दैनंदिन खर्च सहजरित्या भागवू शकतील. तुम्ही सर्व क्षेत्रात प्रभावी कामगिरी कराल. कामाच्या ठिकाणी तुमच्या योग्यतेनुसार काम मिळाल्याने तुमच्या आनंदाला पारावार राहणार नाही. धार्मिक कार्यक्रमांमध्येही तुम्ही उत्साहाने सहभागी व्हाल, ज्यामुळे तुमची प्रतिमा आणखी उंचावेल. भागीदारीत कोणतेही काम करणे तुमच्यासाठी चांगले राहील.


🦬 *वृषभ –* 

वृषभ राशीच्या लोकासाठी आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने थोडा कठीण जाणार आहे. तुमच्या महत्त्वाच्या कामांची यादी बनवणे आणि सध्या सुरू असलेल्या तब्येतीच्या बारीकसारीक कुरबुरींकडे दुर्लक्ष करू नका. नाहीतर भविष्यात याच कुरबुरी एखाद्या मोठ्या आजाराचे रूप घेऊ शकतात. कोणत्याही करारावर अतिशय विचारपूर्वक स्वाक्षरी करा. तुमच्या कामात कसलाही दबाव घेऊ नका. कोणत्याही जोखमीच्या कामात हात आजमावणे तुमच्यासाठी हानिकारक ठरेल, त्यामुळे तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल.


👩‍❤️‍👨 *मिथुन –* 

आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचा असणार आहे. एखाद्या जमिनीवर जर तुमचे कोणत्याही स्वरूपाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असेल तर त्यात सावधगिरी बाळगावी लागेल. व्यवसायात तुमच्या योजना अतिशय काळजीपूर्वक वृद्धिंगत करा. कुटुंबातील काही शुभ घटना आनंद देतील. तुमच्याकडून सर्वांचा आदर राखला गेला पाहिजे, नाहीतर समस्या उद्भवू शकतात. तुम्ही एका ध्येयावर लक्ष केंद्रित केले तरच तुमचे काम पूर्ण होईल. आज नेतृत्व क्षमता प्रबळ असेल.


🦀 *कर्क -* 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कठोर परिश्रमाने भरलेला असणार आहे. पैसे उधार घेणे टाळावे लागेल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांनी आपल्या अधिकाऱ्यांशी वाद घालू नये, अन्यथा त्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. व्यवसायाशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. आर्थिक बाबतीत बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नका. विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल त्यांच्या मेहनतीनुसार चांगला लागल्याने त्यांच्या आनंदाला पारावार राहणार नाही. 


🦁 *सिंह -* 

आजचा दिवस सिंह राशीच्या लोकासाठी सुखद परिणाम घेऊन येईल. काही नवीन योजनांचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्याल. कामाच्या ठिकाणी कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेऊ नका. तुमचे कोणतेही रखडलेले काम आज पूर्ण होऊ शकते. सर्वांना सोबत घेण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य आणि साहचर्य मिळेल. आपल्या आजोळातील लोकांसोबत समेट घडवून आणण्यासाठी तुम्ही तुमच्या आईला त्यांच्याकडे घेऊन जाण्याची शक्यता आहे.


👧🏻 *कन्या -* 

आजचा दिवस कन्या राशीच्या मंडळींच्या सुख-सुविधांमध्ये वाढ करणारा ठरेल. नवीन वाहन खरेदी करण्याची तुमची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. तुम्ही सर्वांच्या हिताची काळजी घ्याल. काही महत्त्वाच्या कामांमध्ये घाई करावी लागेल, तरच ती पूर्ण करता येतील. कुटुंबात सुरू असलेल्या समस्या बाहेरील व्यक्तीला सांगू नका, नाहीतर तो त्याचा फायदा घेऊ शकतो. तुम्ही तुमच्या मुलांना काही जबाबदाऱ्या दिल्या असतील तर ते त्या पूर्ण करतील. विद्यार्थ्यांना आज शिक्षणात येणाऱ्या अडचणींपासून दिलासा मिळेल.


⚖️ *तूळ -* 

तूळ राशीच्या लोकांमध्ये आजच्या दिवशी साहस आणि धाडसात वाढ होईल. सामाजिक कार्यक्रमात मोठे पद मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. काही वादविवाद आणि चर्चेत भाग घेण्याची संधीही मिळेल. आज तुम्ही सरकारी योजनांमध्ये सहभागी होऊन चांगला नफा मिळवण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला तुमच्या एखाद्या नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळू शकेल. तुम्ही तुमच्या स्वतःच्या कामापेक्षा इतरांच्या कामात जास्त लक्ष द्याल, त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. व्यवसायात अपेक्षित नफा मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल.


🦂 *वृश्चिक –* 

आजचा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी संमिश्र परिणाम देणारा ठरेल. कुटुंबातील सदस्याचे लग्न ठरल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांचे नियमित येणे-जाणे सुरू राहील. तुम्हाला एखादी मौल्यवान वस्तू भेट म्हणून मिळू शकते. तुम्ही तुमच्या मूल्ये आणि परंपरांवर पूर्ण भर द्याल. काही बाहेरच्या लोकांशीही संबंध वाढवण्यात यशस्वी व्हाल. कोणतेही काम पूर्ण आत्मविश्वासाने करावे लागेल, तरच ते पूर्ण होईल असे वाटते. 


🏹 *धनू –* 

आज धनू राशीच्या मंडळींना सर्जनशील कार्यात खूप रस वाटेल. तुमचे सहकर्मी तुमचे व्यक्तिमत्व पाहून आश्चर्यचकित होतील. तुम्ही वरिष्ठ सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण कराल. जर तुम्ही एखाद्याला वचन दिले असेल तर ते पाळण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आज तुम्ही काही अनोखे प्रयत्न यशस्वीपणे कराल. आज बोलण्यात आणि वागण्यात गोडवा ठेवा. कोणतेही काम पूर्ण आत्मविश्वासाने करावे लागेल, तरच ते पूर्ण होईल असे वाटते. तुमच्या मुलाच्या तब्येतीबाबत तुम्हाला थोडी चिंता लागून राहील.


🦐 *मकर –* 

आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचा असणार आहे. धर्मादाय कार्यात तुमची रुची देखील वाढेल. तुमच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा, नाहीतर काही समस्या उद्भवू शकतात. आज तुम्हाला तुमच्या भूतकाळातील काही चुकांमधून शिकावे लागेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. काही व्यावसायिक कामासाठी तुम्ही लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. कुटुंबातील कोणत्याही वरिष्ठ व्यक्तीकडून कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करू नका. 


🍯 *कुंभ –* 

कुंभ राशीच्या व्यावसायिक लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी एखाद्या नवीन स्त्रोतांकडून चांगला नफा मिळेल, ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. घरगुती जीवनातील काही समस्या तुम्हाला बऱ्याच काळापासून त्रास देत असतील तर त्या संपुष्टात येतील. स्थिरतेची भावना प्रबळ होईल. तुम्हाला आरोग्याबाबत जागरुक राहण्याची गरज आहे. काही महत्त्वाची कामं रखडली तर ती तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात, त्यामुळे वेळेतच ती पूर्ण करा..


🦈 *मीन –* 

मीन राशीच्या लोकांनी त्यांची मिळकत आणि खर्च यात समतोल राखणे त्यांच्यासाठी इष्ट राहील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामात काही अडथळे येतील, जे तुम्ही तुमच्या वरिष्ठांच्या मदतीने दूर करू शकाल. आज तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटू शकता. यावेळी तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. तुमच्या सकारात्मक विचारांचा तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला तुमच्या आजोळकडून आर्थिक लाभ होताना दिसत आहे. तुम्ही तुमच्या खर्चाच्या अंदाजपत्रकाकडे पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. नाहीतर तुम्हाला नंतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 


🙏🏻 

NEET परीक्षा अपडेट !! शूजवर बंदी || ड्रेस कोड सह परीक्षा केंद्रावरील १० नियम आताच जाणुन घ्या.. NEET परीक्षा अपडेट !!  शूजवर बंदी || ड्रेस कोड सह परीक्षा केंद्रावरील १० नियम आताच जाणुन घ्या.. Reviewed by Best Seller on 5/04/2024 02:16:00 pm Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

🚶‍♂️💃🚶‍♂️

Blogger द्वारा संचालित.