साधारणपणे २५ मे पर्यंत बारावीचा तर दहावीचा निकाल ६ जूनपूर्वी जाहीर होईल.तर जुलै मध्ये होणार पुरवणी परिक्षा

 

नमस्कार वाचक मित्र हो...

🙏🙏🙏🙏🙏 

सदर माहिती ही सोशल मीडिया वरून प्राप्त केलेली आहे. 

फक्त आपल्या समोर माहितीसाठी सादर करीत आहोत एक्झॅक्ट तारीख लवकर कळेल यात शंका नाही.


विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल.._

━━━━━━━━━━━━━

🧾 दहावी, बारावीचा निकाल 'या' तारखेला लागणार

━━━━━━━━━━

📋 दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आसून २५ मेपर्यंत बारावीचा तर दहावीचा निकाल ६ जूनपूर्वी जाहीर होईल, तर परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होईल अशी माहिती मिळाली आहे...


✒️ *बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल*


१) *ओपन बुक परीक्षा पद्धती :


विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत पुस्तक घेऊन परीक्षा देता येईल. पण, परीक्षेतील प्रश्नांची काठिण्य पातळी जास्त राहील. विद्यार्थ्यांना उत्तर पाहून लिहिताना स्वत:चा सविस्तर अभ्यास परीक्षेपूर्वी करावाच लागेल असा हा पॅटर्न असणार आहे.


२) *सेमिस्टर पॅटर्न :* 


दहावी व बारावीच्या परीक्षा आता वर्षातून एकदाच नव्हे तर दोन सेमिस्टरमध्ये होतील. पदवी, पदव्युत्तरच्या धर्तीवर भविष्यात दिवाळीपूर्वी एक तर उन्हाळ्यापूर्वी एक सेमिस्टर होईल. अजून त्यासंदर्भात काही निर्णय झाला नाही, पण भविष्यात काळानुसार हा बदल होवू शकतो.


📝 *पुरवणी परीक्षेत उत्तीर्णांना नवीन वर्षात प्रवेश* 


दहावी- बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच म्हणजेच जुलैमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा पार पडेल. त्यांचा निकाल काही दिवसांत जाहीर होईल आणि त्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेता येईल, असे बोर्डाचे नियोजन आहे.


मागील १०वी, १२वीचा निकाल लवकरच; या प्रकारे डाऊनलोड करता येइल तुमची डिजिटल मार्कशीट


💁🏻‍♂️ विद्यार्थ्यांनो तुमची मार्कशीट डाऊनलोड करण्यासाठी डिजिलॉकरवर डिजिलॉकरवर नोंदणी आणि त्यानंतर आवश्यक कागदपत्रे डाउनलोड कसे करावे. डिजिलॉकरवर १० वी आणि १२ वीचे निकालपत्र अपलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे डिजिलॉकर खाते असणे आवश्यक आहे.


डिजीलॉकर खाते कसे तयार करावे?

१. DigiLocker च्या साईटला भेट द्या – https://www.digilocker.gov.in

२. इनपुट फील्डसह एक नवीन विंडो उघडेल

३. तुमचा मोबाईल नंबर एंटर करा आणि नंतर ‘Continue’ बटणावर क्लिक करा

४. या नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. नवीन विंडोमध्ये दिलेल्या जागेत हा OTP भरा.

५. नंतर 'Verify' बटणावर क्लिक करा.

६. लिंक नवीन विंडोवर पुनर्निर्देशित केली जाईल

७. खात्यासाठी युजरनेम आणि पासवर्ड सेट करा

८. पासवर्डमध्ये वापरकर्त्याचं नाव नसावं

९. शेवटी, तुमचा आधार क्रमांक सबमिट करा आणि तो OTP किंवा फिंगरप्रिंट पर्यायाद्वारे सेट करा.

१०. तुम्ही आता डिजिलॉकर ॲपवर यशस्वीरित्या साइन अप केले आहे.


🤔 *डिजीलॉकरवरून महाराष्ट्र १०वी १२वीचा निकाल कसा डाउनलोड करायचा?* 

१. युजरनेम आणि पासवर्ड वापरून डिजिलॉकर ॲपवर लॉग इन करा

२. 'प्रोफाइल' पेजवर जा आणि आधार क्रमांक सिंक करा. डिजीलॉकर खाते आधीपासून आधार क्रमांक वापरून तयार केले असल्यास, पुन्हा करण्याची गरज नाही.

३. डाव्या साइडबारमधील 'पुल पार्टनर डॉक्युमेंट्स' बटणावर क्लिक करा.

४. पुढील स्क्रीनवर दोन ड्रॉपडाउन असतील.

५. पहिल्या ड्रॉपडाउनमध्ये, 'महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ' निवडा.

६. पुढील ड्रॉप-डाउनमध्ये, मार्कशीट निवडा म्हणजे HSC/ SSC मार्कशीट/ स्थलांतर किंवा उत्तीर्ण इ.

७. पुढील स्क्रीनमध्ये महाराष्ट्र एसएससी ॲडमिट कार्ड/महाराष्ट्र एचएससी ॲडमिट कार्डवर नमूद केल्याप्रमाणे उत्तीर्ण होण्याचे वर्ष आणि रोल नंबर यासारखे आवश्यक तपशील भरा.

८. 'Get Document' वर क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र HSC/Maharashtra SSC डिजिटल मार्कशीट/प्रमाणपत्र डाउनलोड होईल.

९. ही कागदपत्रे डिजीलॉकर खात्यात सेव्ह करण्यासाठी सेव्ह टू लॉकर बटणावर क्लिक करा.


🤗 *डिजीलॉकर वापरण्याचे फायदे* 

शालेय प्रमाणपत्र आणि मार्कशीट व्यतिरिक्त आधार कार्ड, कोविड १९ लसीकरण प्रमाणपत्र, वाहन नोंदणी आणि ड्रायव्हिंग लायसन्सची सुविधा डिजीलॉकरवर उपलब्ध आहे. आपण या ॲपवर एसएससी मार्कशीट, एचएससी मार्कशीट, रेशनकार्ड, निवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि जातीचे प्रमाणपत्र या सुविधेचा लाभ घेऊ शकता.आपली सर्व महत्त्वाची कागदपत्रे या लॉकरमध्ये ठेवली जाऊ शकतात.

राशीभविष्य : २९ एप्रिल सोमवार 


🐏 *मेष*  

आजच्या दिवसाची सुरुवात उर्जेनी आणि निर्धारांनी भरलेली असेल. निर्णय विचारपूर्वक घ्या. नोकरी-व्यवसायासाठी उत्तम दिवस मात्र तुमच्या कौटुंबिक आयुष्यात गोंधळ असेल. जुन्या गोष्टींना उजाळा देणे टाळा. सध्याच्या काळ भविष्याच्या योजना आखण्याचा आहे.


🦬 *वृषभ:* 

आज तुमचे दगदगीचे वेळापत्रक व अनियमित जेवणामुळे तुम्ही आनंदी व समाधानी असणार नाही. आर्थिक लाभ संभवतो. उत्पन्न वाढेल. लांबचे प्रवास फलदायी असतील आणि त्यांचे चांगले परिणाम होतील. मात्र आज कष्ट करण्याची आवश्यकता असेल..


👩‍❤️‍👨 *मिथुन :* 

आज मुलांच्या आरोग्याच्या कुरबुरी राहतील, वैवाहिक आयुष्यात तुम्ही अधिक वेळ देणे आणि बांधिलकी दर्शविणे आवश्यक असेल. कामाबाबत अलिप्तता जाणवेल. मात्र आजचा दिवस कुटुंबासोबत व्यतीत करणे फायद्याचे ठरेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.


🦀 *कर्क:* 

तुम्ही आज थोडे आक्रमक असाल, ज्याचा विपरित परिणाम होईल, तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आज यश मिळविण्यासाठी विशेष मेहेनत करावी लागेल. कामात काही अपेक्षाभंग होण्याचीही शक्यता आहे. आर्थिक संचयात वृद्धी संभवते. एखाद्या तीर्थयात्रेची योजना आखाल.


🦁 *सिंह :* 

आज घरात आणि कामाच्या ठिकाणी वाद आणि भांडणे टाळणे गरजेचे आहे, कारण त्यामुळे तुमच्या संपत्तीचे नुकसान होऊ शकते. स्वतःच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल असे कोणतेही काम करू नका. आरोग्याची काही तक्रारी उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. आज काही नवीन गोष्टी शिकला.


👧🏻 *कन्या :* 

आज शब्द काळजीपूर्वक वापरावे लागतील, कारण त्या शब्दांमुळे वाद उद्भवून तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमच्या कामाचा विस्तार वाढविण्यासाठी तुम्ही घरापासून लांब जाऊ शकता आणि तिथे तुम्ही चांगली आर्थिक प्राप्ती कराल. पण, तुम्ही तुमच्या आप्तेष्टांपासून लांब राहाल. आंबट पदार्थ वर्ज्य करा. आज व्यवसायातून अधिक लाभाची शकयता.


⚖️ *तुळ :* 

आज विकास आणि प्रगती करण्यासाठी काही संधी चालून येतील, त्या ओळखून त्यांचा फायदा करून घ्या. तुमच्या आजुबाजूला अधिक उर्जा जाणवेल आणि तुम्हाला इतरांचे नेतृत्व करण्याची इच्छा निर्माण होईल. तुमचे काही आप्तेष्ट तुम्हाला योग्य प्रकारे समजून घेणार नाहीत आणि त्यामुळे तुमच्या नात्यांमध्ये काहीसे वितुष्ट येण्याची शक्यता आहे. आज वैवाहिक आयुष्य टिकवून ठेवण्यासाठी जोडीदारासोबत वाद टाळावेत.


🦂 *वृश्चिक :* 

आज खर्च प्रमाणापेक्षा अधिक असेल. उत्पन्नही असेल पण तुम्ही तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थी चांगली कामगिरी करतील आणि अधिक निर्धारी होतील. आज तुम्हाला धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात स्वारस्य निर्माण होईल, ज्याचा हळू हळू भविष्यात फायदा दिसून येईल. प्रेम प्रकरणात मिश्र स्वरुपाच्या घटना घडतील. एका बाजूला काही गैरसमज होतील तर दुसरीकडे तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून प्रेमाचा वर्षाव होईल.


🏹 *धनु :* 

आज तुम्ही तुमच्या कष्टांमुळे प्रगतीपथावर चालाल, मात्र तुम्ही आळशीपणा टाळला पाहिजे. वैवाहिक सुख वाढेल. कुटुंबासाठी काही अनुकूल घटना घडण्याची शक्यता. अनोळखी व्यक्तीवर अजिबात विश्वास ठेऊ नका. मुलांना अभ्यासात किंवा नवीन काही शिकण्यात थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील.


🦐 *मकर :* 

आज विविध प्रकारच्या संधींच्या माध्यमातून तुम्हाला चांगले आर्थिक परिणाम पाहायला मिळतील. तुमचे सामाजिक वर्तुळ अत्यंत सक्रीय असेल आणि तुमचे समाजातील स्थानही उंचावेल. मुलांमध्ये एकाग्रतेची कमतरता जाणवेल, त्यामुळे मेहेनत ही यशाची गुरकिल्ली असेल. आज काही आरोग्याच्या काही तक्रारी उद्भवू शकतात आणि त्यामुळे थोडा चिडचिडेपणा येऊ शकतो.


🍯 *कुंभ :* 

आजचा दिवस उत्तम असेल. आज तुम्हाला व्यावसायिक आयुष्यात समाधान लाभण्याची शक्यता. तुमच्या उपक्रमांना यश लाभेल. फार काळापासून असलेली इच्छा पूर्ण होऊ शकते. उत्पन्नाची आवक चांगली राहील. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या माध्यमातून लाभ संभवतो.


🦈 *मीन :* 

आज कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील आणि तुमच्या कल्पना आकार घेतील. व्यवसायासाठीही काही अनुकूल गोष्टी घडतील. आज आळस टाळावा. तुमचे सहकारी तटस्थ असतील, त्यामुळे तुम्ही स्वत:च्या क्षमतांवर विसंबून असावे. कमी अंतराचे काही प्रवास संभवतात. प्रवासात स्वतःच्या कागदपत्रांची काळजी घ्या.





साधारणपणे २५ मे पर्यंत बारावीचा तर दहावीचा निकाल ६ जूनपूर्वी जाहीर होईल.तर जुलै मध्ये होणार पुरवणी परिक्षा साधारणपणे  २५ मे पर्यंत बारावीचा तर दहावीचा निकाल ६ जूनपूर्वी जाहीर होईल.तर जुलै मध्ये होणार पुरवणी परिक्षा Reviewed by Best Seller on 4/29/2024 04:03:00 pm Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

🚶‍♂️💃🚶‍♂️

Blogger द्वारा संचालित.