जन्म नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल, पहा नवीन बदल ही माहिती देणे बंधनकारक

जन्म नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल, पहा नवीन बदल ही माहिती देणे बंधनकारक..!

━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━

👶🏻 नवजात बालक जन्माला आले तर मुलाच्या जन्माच्या नोंदणीमध्ये पालकांच्या धर्माशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे. पालकांना ही माहिती स्वतंत्रपणे भरावी लागणार आहे. आतापर्यंतदेखील बालकाच्या जन्म नोंदणीवेळी कुटुंबाच्या धर्माची नोंद केली जात होती. पण केंद्र सरकारच्या यासंदर्भात प्रारुप नियमावली तयार केली आहे. गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना पाठवला आहे. त्यामुळे नव्या पालकांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे. यासाठी वेगळा कॉलम असणार आहे. त्या कॉलममध्ये तुम्हाला ही माहिती भरावी लागेल.


❓ *यात नवीन काय?* 

याआधी तुम्ही जन्माची नोंदणी केली असेल तर तुम्हाला फॉर्म क्रमांक 1 भरावा लागला असेल. त्यामध्ये तुम्हाला कुटुंबाच्या धर्मासाठी एक कॉलम होता. आता येथे तुम्हाला आणखी एक कॉलम दिसेल. यामध्ये मुलाच्या पालकांचा धर्म कोणता? हे विचारलं जाईल. ही माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे. दत्तक प्रक्रियेसाठी फॉर्म क्रमांक 1 देखील आवश्यक असेतो गेल्या वर्षी जन्म-मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा पारित करण्यात आला. यामध्ये विशेष बदल पाहायला मिळाले. यानुसार राष्ट्रीय स्तरावरही जन्म-मृत्यूची नोंदणी आवश्यक असेल, याची नोंद घ्या. 


🤨 *कशासाठी हा खटाटोप* 

सरकार येत्या काळात या माहितीचा विविध सरकारी योजना, विविध ओळखपत्रासाठी वापर करण्याची योजना आखत आहे. तुम्ही नोंदवलेल्या माहिती आधारे जन्मदाखल्याच्या फॉर्म क्रमांक 1 मधून मिळणाऱ्या डेटाबेस आधारे या सेवांसाठी त्याचा वापर होईल.


📑अनेक कागदपत्रांच्या अपडेटसाठी ही माहिती उपयोगी पडले. त्यासाठी तुम्हाला दहा वेळा दस्तावेजाची फोटो कॉपी देण्याची गरज नसेल. लहान मुलाच्या जन्माची ही माहिती डिजिटल सर्टिफिकेट सिंगल डॉक्युमेंट म्हणून जतन होईल. त्याला मान्यता असेल.

👁️ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग Anti Corruption Bureau ला तक्रार कशी करावी?* 

💁🏻‍♂️ सरकारी काम आणी सहा महीने थांब हाच आपल्या सर्व सामान्य नागरीकांचा समाज झाला आहे. ज्या नागरीका चे काम असते ते काम काही अधिकारी हे जाणीवपूर्वक करत नाही किंवा सामान्य नागरीकांना मुद्दाम हेलपटे मारायला लावले जातात त्या मागे त्यांचा हेतु हा फक्त आणी फक्त आर्थिक लालच हेच एकमेव उद्देश असतो. अशा वेळी सामान्य नागरीकाच्या मनात एकाच प्रश्न येतो तो म्हणजे अशा भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांना धडा कसा शिकवावा? लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACB - Anti Corruption Bureau यांना तक्रार कशी करावी या व तुमच्या मनातील अनेक प्रश्नाची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत...


१. सापळा रक्कम कोणाकडून पुरविली जाते?

* सापळा रक्कम तक्रारदाराकडून पुरविली जाते.


२. कोणत्या प्रकारच्या गुन्ह्याचा तपास ACB कार्यालयामार्फत केला जातो?

* शासकीय नोकराने लाचेची मागणी, लाच स्वीकारणे, शासकीय नोकरास लाच देणे, अपसंपदा व पदाचा दुरुपयोग करून भ्रष्टाचार.


३. अपसंपदा प्रकरण म्हणजे काय?

* शासकीय नोकराने भ्रष्टाचारामार्फत मोठ्या प्रमाणात स्वतःचे नावे किंवा त्याच्या वतीने कोणत्याही व्यक्तीकडे, पद धारण करण्याच्या कालावधीतील कोणत्याही वेळी तो समाधानकारक हिशोब देऊ शकणार नाही अशा आर्थिक साधन संपत्तीचा किंवा त्याच्या प्राप्तीच्या ज्ञात साधनांचा विसंगत प्रमाणात मालमत्ता जमविणे.


४. तक्रारदार कोणाविरुद्ध लाचेची मागणी संदर्भात तक्रार देवू शकतो?

* लोकसेवक किंवा खाजगी इसम जो लोकसेवकाच्या वतीने लाचेची मागणी करील व स्विकारेल त्याच्या विरोधात तक्रार देऊ शकतो.


५. लाचेच्या मागणी संदर्भात तक्रार कोणत्याही लोकसेवकाविरुद्ध देता येते का?

* ज्या लोकसेवकाकडे तक्रारदाराचे कायदेशीर काम प्रलंबित आहे अशा लोकसेवकाविरुद्ध तसेच त्याच्याकडे काम प्रलंबित नसतानाही स्वतःच्या फायद्यासाठी पदाचा दुरुपयोग करील अशा लोकसेवकाविरुद्ध.


६. सापळा कारवाई म्हणजे काय?

* लाचेची मागणी, लाच स्विकारताना व लाच देताना ऐसीबी मार्फ़त सरकारी नोकरास रंगेहाथ पकडणे.


७. सापळा रक्कम तक्रारदारास परत मिळते का?

* होय. सापळा रक्कम तक्रारदारास लवकरात लवकर परत केली जाते.


८. लाचेच्या मागणीची तक्रार केव्हा देता येते?

* सरकारी नोकराकडून कायदेशीर काम करण्याकरीता तसेच कायदेशीर काम न करण्याकरीता पैशाची/इतर गोष्टींची मागणी होत असेल तेव्हा.


९. सापळा करावाईकारता तक्रारदारास अेसीबी कार्यालयात हजर रहावे लागते का?

* होय, सापळा कारवाईत तक्रारदाराचा प्रत्यक्ष सहभाग असल्याने कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे.


१०. अेसीबी कार्यालयाची वेबसाईट कोणती आहे?

* www.acbmaharashtra.gov.in,

* www.facebook.com/MaharashtraACB


२१. गुन्हा दाखल झाल्यावर तक्रारदारास न्यायालयात हजर रहावे लागते का?

* न्यायालयीन प्रक्रिये दरम्यान न्यायालयात साक्षीकामी हजर राहणे आवश्यक असते.


२२. अपसंपदे संदर्भात तक्रार कोणत्याही लोकसेवकाविरुद्ध देता येते का?

* होय. ज्या लोकसेवकाने भ्रष्ट्राचारामार्फत मोठ्या प्रमाणात स्वतःचे नावे किंवा त्याच्या वतीने कोणत्याही व्यक्तीकडे पद धारण करण्याच्या कालावधीतील कोणत्याही वेळी तो समाधानकारक हिशोब देऊ शकणार नाही अशा आर्थिक साधन संपत्तीच्या किंवा त्याच्या प्राप्तीच्या ज्ञात साधनांच्या विसंगत प्रमाणात मालमत्ता जमविलेली आहे अशा लोकसेवकाविरुद्ध. ज्या लोकसेवकाने भ्रष्टाचार करून मोठया प्रमाणात अपसंपदा जमा केली आहे अशा लोकसेवाकाविरुद्ध.


२३. ऑनलाईन तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे का?

* होय, www.acbmaharashtra.gov.in वरील तक्रार या सदराखाली व www.facebook.com/MaharashtraACB या फेसबुक पेज वर lodge a complaint या सदराखाली.


२४. लोकसवकाने घटनास्थळीच लाचेची मागणी केली किंवा लाच स्विकारली तर ऐसीबी काय कारवाई करील ?(उदा. रेल्वे टीसी., ट्राफीक पुलिस, महानगरपालिकाचे नाका कर्मचारी, कोर्ट कर्मचारी यांचेकडून शपथपत्र दाखल करण्यासाठी, ई.)

* अशा लाचेच्या घटनांची माहितीबाबत मोबाईल/कॅमेरामध्ये ऑडिओ/व्हिडिओ टीपूण घेऊन ती एसीबीचे www.acbmaharashtra.net या मोबाइल ॲपवरील तक्रार पॅनल मधून पोस्ट करावी.


२५. लोकसेवकाने क्र.२५ मध्ये नमुद केलेल्या घटनांवर आळा बसण्यासाठी व त्यास प्रतिबंध करण्यासाठी ऐसीबी काय पावले उचलत आहे. तसेच त्याकारीता ऐसीबीला जनतेकडून कोणत्या सहकार्याची अपेक्षा आहे?

* होय. लाचेच्या घटनांची माहितीबाबत मोबाईल/कॅमेरामध्ये ऑडिओ/व्हिडिओ टीपूण घेऊन ती एसीबीचे www.acbmaharashtra.net या मोबाइल अॅप वरील तक्रार पॅनल मधून पोस्ट करावी.


राशीभविष्य : ७ एप्रिल रविवार

🪀 _*रोजचे राशीभविष्य बरोबरच लेटेस्ट न्यूज, जॉब अपडेट आणि महत्वाची माहिती तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा...*_


https://chat.whatsapp.com/G8OLgIHPjbi8SCrC41IlZp

➖➖➖➖

🐏 *मेष -* 

आज मेष राशीच्या लोकांना विचारपूर्वक कामे करावी लागतील. आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका, अजिबात निष्काळजीपणा करू नका, नाहीतर भविष्यात ती एखाद्या मोठ्या आजाराचे रूप धारण करू शकते. काही निराशाजनक माहिती मिळाल्यामुळे तुम्हाला अचानक प्रवासाला निघावे लागू शकते. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या गोष्टीची काळजी करत असाल तर ती काळजीही आज दूर होईल. तुम्ही कोणताही निर्णय भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नका, नाहीतर तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागेल.

आज भाग्य ७१ टक्के तुमच्या सोबत असेल. श्री गणेश चालिसाचे पठण करा.


🦬 *वृषभ –* 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. मित्रांसोबत काही मतभेद झाले असतील तर ते आज दूर होतील आणि तुमच्यातील जवळीक वाढेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी तुम्हाला काही जबाबदाऱ्या दिल्या तर तुम्ही त्या नक्कीच पूर्ण कराल. आपण एखाद्या मित्राच्या घरी मेजवानीसाठी जाऊ शकता. तुम्ही नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या संपत्तीत वाढ झाल्यामुळे तुम्ही कुटुंबातील सदस्याला दिलेले वचन सहज पूर्ण करू शका. तुम्ही कोणताही व्यवहार करताना तो अतिशय काळजीपूर्वक विचार करावा, नाहीतर कोणीतरी तुमची फसवणूक करू शकतो.

आज भाग्य ६९ टक्के तुमच्या सोबत आहे. सफेद चंदनाचा टिळा लावा आणि शंभोशंकराला तांब्याच्या पात्रातून जल अर्पण करा.


👩‍❤️‍👨 *मिथुन -* 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आवश्यक फायदे घेऊन येणार आहे. तुम्ही जर तुमच्या खर्चाचे अंदाजपत्रक बनवले तर ते तुमच्यासाठी चांगले होईल. कोणत्याही कामात दिनचर्या सांभाळावी, तरच ते पूर्ण होईल. देण्याघेण्याच्या व्यवहारात स्पष्टता ठेवावी, नाहीतर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तुम्ही दिवसातील काही वेळ तुमच्या आईवडिलांच्या सेवेत घालवाल. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याकडे तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करू शकता. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भरपूर पाठिंबा आणि सान्निध्य मिळत असल्याचे दिसते.

आज भाग्य ७२ टक्के तुमच्या सोबत असेल. गाईंना गूळ खाऊ घाला.


🦀 *कर्क –* 

आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी प्रगतीचा दिवस असेल. तुमच्या एखाद्या कामात अडथळे येत असतील तर तुम्ही त्यावरही मात करून पुढे जाल आणि विविध क्षेत्रात चांगली कामगिरी कराल. तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्याने तुमचे मन प्रसन्न राहील. जवळच्या एखाद्या व्यक्तीच्या सल्ल्याचे पालन केल्याने तुम्हाला चांगले नाव कमावण्याची संधी मिळेल. आपण विविध परिस्थितींवर नियंत्रण ठेवल्यास ते आपल्यासाठी चांगले होईल. जे लोक नोकरीसोबत काही काम करण्याचा विचार करत होते, त्यांची इच्छाही पूर्ण होऊ शकते.

आज भाग्य ८८ टक्के तुमच्या सोबत असेल. भगवान विष्णूची पूजा करा.


🦁 *सिंह -* 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायक असणार आहे. तुम्हाला तुमच्या काही घरगुती बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. कोणत्याही वादात पडू नका. जर तुम्ही कोणत्याही मालमत्तेचा व्यवहार करणार असाल तर त्याची स्थावर आणि जंगम बाजू स्वतंत्रपणे तपासा. तुमच्या जवळची व्यक्ती तुमच्या घरातील ताणतणाव निवळण्यासाठी हस्तक्षेप करू शकते, ज्यामुळे वातावरण शांततापूर्ण राहील. काही नवीन काम करण्यासाठी तुम्ही उत्साही असाल. तुमच्या मनातील एखादी इच्छा तुम्ही तुमच्या आई वडिलांसमोर व्यक्त करू शकता.

आज भाग्य ९३ टक्के तुमच्या सोबत असेल. बजरंग बाणाचे पठण करा.


👧🏻 *कन्या -* 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनेक गुंतागुंतीने भरलेला असणार आहे. तुम्ही बंधुत्व वाढवण्यावर पूर्ण भर द्याल. अविवाहितांना मनाप्रमाणे वैवाहिक प्रस्ताव येऊ शकतात. जर तुम्ही तुमच्या करिअरशी संबंधित एखाद्या समस्येशी झुंजत असाल तर त्या देखील आज सोडवल्या जातील. तुम्हाला जवळच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते, जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचे मार्ग मोकळे होतील. नवीन मालमत्ता खरेदी करण्याची इच्छाही पूर्ण होताना दिसत आहे.

आज भाग्य ६४ टक्के तुमच्या सोबत असेल. भगवान विष्णूला बेसनाच्या लाडवाचा प्रसाद अर्पण करा.


⚖️ *तूळ -* 

तूळ राशीच्या मंडळींसाठी आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये असलेला जुना रुसवा - फुगवा दूर होईल. सर्व जण एकमेकांसोबत मौजमजेत वेळ घालवताना दिसतील. परस्पर संबंध अधिक दृढ होतील. काही महत्त्वाच्या विषयांवर वरिष्ठ सदस्यांचा तुम्हाला सल्ला घ्यावा लागेल. बँकिंग क्षेत्रात काम करणारे लोक आपले पैसे चांगल्या योजनांमध्ये गुंतवू शकतात. काही वैयक्तिक बाबींमध्ये तुम्हाला बाहेरील लोकांपासून सावध राहावे लागेल.

आज भाग्य ७७ टक्के तुमच्या सोबत असेल. मुंग्यांना पीठ खाऊ घाला.


🦂 *वृश्चिक –* 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूपच फलदायक ठरणार आहे. तुमचे एखादे महत्त्वाचे काम पूर्ण झाल्याने तुम्ही आनंदी व्हाल आणि कुटुंबात एक छोटीशी पार्टीही आयोजित कराल. नोकरीच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल. कोणतेही काम सगळ्यात आधी करण्याच्या तुमच्या सवयीमुळे आज तुम्हाला चांगला फायदा मिळेल. परंतु जर तुम्ही एखाद्या मित्राकडून गुंतवणूक संबंधित योजनेबद्दल ऐकले असेल, तर तुम्हाला त्यात पैसे गुंतवणे टाळावे लागेल, नाहीतर तुमचे पैसे अडकू शकतात.

आज भाग्य ८५ टक्के तुमच्या सोबत असेल. श्री शिव चालिसाचे पठण करा.


🏹 *धनू –* 

आज धनू राशीच्या मंडळींना परदेशात राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. देण्याघेण्याच्या व्यवहाराशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला खूप सावधगिरी बाळगावी लागेल. लोकांशी व्यवहार करताना सतर्क राहावे लागेल. नाहीतर ते तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुम्हाला स्वभावात नम्रता ठेवावी लागेल, तरच तुम्ही लोकांकडून सहजतेने कामे करून घेऊ शकाल. जर तुम्ही एखाद्याला व्यवसायात भागीदार बनवण्याचा विचार करत असाल, तर त्याची संपूर्ण माहिती काढून घ्या. आज जवळच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते.

आज भाग्य ९५ टक्के तुमच्या सोबत असेल. प्रत्यक्ष देवता भगवान सूर्य नारायणाला अर्घ्य अर्पण करा.


🦐 *मकर -* 

आजच्या दिवशी मकर राशीच्या लोकांना काही गुंतागुंतीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागणार आहे. वरिष्ठांच्या सल्ल्याचे पालन केल्याने तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांची इच्छा देखील आज पूर्ण होऊ शकते. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायासाठी केलेल्या योजनांमधून तुम्हाला चांगला नफा मिळेल. मुलाच्या करिअरची काही चिंता असेल तर ती दूर होईल. तुमची काही रखडलेली कामे पूर्ण करण्याच्या प्रयत्नात तुम्ही व्यग्र असाल. तुम्ही स्वत:साठी एखादे ध्येय निश्चित केल्यास ते तुमच्यासाठी इष्ट राहील.

आज भाग्य ६९ टक्के तुमच्या सोबत असेल. भगवान विष्णूच्या मंदिरात चण्याची डाळ आणि गूळ एका पिवळ्या कापडात गुंडाळून अर्पण करा.


🍯 *कुंभ -* 

कुंभ राशीच्या पद आणि प्रतिष्ठेत आजच्या दिवशी वाढ होईल. कोणत्याही सरकारी कामात तुम्हाला अत्यंत हुशारीने काम करावे लागेल. तुमच्या जबाबदाऱ्या सहजतेने पार पाडून तुम्ही वरिष्ठ सदस्यांकडून शाबासकी मिळवू शकता. तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलाव्या लागतील आणि जास्त तळलेले पदार्थ खाणे टाळावे लागेल अन्यथा तुम्हाला तब्येतीच्या कुरबुरींना सामोरे जावे लागेल. पोटाशी संबंधित समस्या उद्भवून त्याचा त्रास होऊ शकतो. ज्यामुळे तुमचे मन अस्वस्थ राहील. काही जवळच्या लोकांचे सहकार्य मिळेल. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा तुमचा प्रयत्न असेल.

आज भाग्य ८८ टक्के तुमच्या सोबत असेल. गरिबांना वस्त्र आणि अन्न दान करा.


🦈 *मीन -* 

मीन राशीच्या लोकांना आज काही नवीन संपर्कातून चांगले लाभ मिळतील आणि नशीब देखील पूर्ण साथ देईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या चांगल्या विचारसरणीचा फायदा होईल. मित्रांसोबत लांबच्या प्रवासाला जाण्याची योजना देखील बनवू शकता. आज तुम्हाला जुन्या चुकांमधून धडा घ्यावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला जाणार आहे. तुमचा तुमच्या कामावर पूर्ण विश्वास असेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी अपेक्षित लाभ मिळाल्याने तुमच्या आनंदाला पारावार राहणार नाही.

आज भाग्य ९२ टक्के तुमच्या सोबत असेल. भगवान श्रीकृष्णाला लोणी साखरेचा नैवेद्य अर्पण करा.


👮🏻‍♂️ पोलीस भरती : कारागृह विभागात 1800 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज कसा करावा येथे जाणून घ्या !*


💁🏻‍♂️ राज्याच्या कारागृह प्रशासनात सुमारे 1,800 नवीन पोलीस शिपाई पदांना मंजुरी मिळाली आहे. त्याअनुषंगाने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख *15 एप्रिल २०२४* आहे. 


📃 विभागानुसार जाहिरात*


छ. संभाजीनगर - https://tinyurl.com/yk65edc2

📍 *नागपूर -* https://shorturl.at/aisDI

📍 *पुणे -* https://shorturl.at/bjyW2

📍 *मुंबई -* https://shorturl.at/aFZ45


👤 *वयोमर्यादा –* 

* खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे

* मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे


🫰🏻 *अर्ज शुल्क –* 

* खुला प्रवर्ग: रु. 450 /-

* मागास प्रवर्ग: रु. 350 /-


💸 *ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख* - 15-04-2024 (24.00 वा).


🤳🏻 *ऑनलाईन अर्ज कसा भरावा ?* 

* सर्वप्रथम - policerecruitment2024.mahait.org या पोर्टलवर जा, 

* सूचना या टॅबवर क्लिक करा. 

* सूचना काळजीपूर्वक वाचा. 

* त्यानंतर नोंदणी वर क्लिक करा, 

* आवश्यक तपशील भरा आणि ‘नोंदणी करा’ वर क्लिक करा. 

* तुमच्या ई-मेल आयडी वर एक पडताळणी दुवा पाठवला जाईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही मुख्य पृष्ठावर पोहोचाल. 

* आता ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा आणि परीक्षेसाठी अर्ज करा.




जन्म नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल, पहा नवीन बदल ही माहिती देणे बंधनकारक जन्म नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल, पहा नवीन बदल ही माहिती देणे बंधनकारक Reviewed by Best Seller on 4/07/2024 01:23:00 pm Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

🚶‍♂️💃🚶‍♂️

Blogger द्वारा संचालित.