नोकरी || 12 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची मोठी संधी || 3700+ जागांवर भरती सुरू

 


१२ वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत महाभरती सुरु असून या भरतीद्वारे विविध पदे भरली जाणार आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 

 अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे. 


👥 *एकूण रिक्त जागा :* 3712


🧾 *रिक्त पदाचे नाव*

1. कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)

2. डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)

3. डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’


📚 शैक्षणिक पात्रता:

 12वी उत्तीर्ण.


👤 वयोमर्यादा :

 01 ऑगस्ट 2024 रोजी 

* जनरल : 18 ते 27 वर्षे 

* SC/ST: 05 वर्षे सूट, 

* OBC: 03 वर्षे सूट


🫰🏻 परीक्षा फी :

* जनरल/ओबीसी/₹100/- 

* SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही


🤑 पगार :

* कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) – 19,900/- ते 63,200/-

* डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) – 25,500/- ते 81,100/-

* डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ – 25,500/- ते 81,100/-


नोकरी ठिकाण:* संपूर्ण भारत.


ऑनलाइन अर्ज करा :  

👇👇👇

🌐 


जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी इथे

👇👇👇👇👇

ℹ️


🐄 गाय-म्हशी खरेदीसाठी मिळणार दीड लाख रुपये; या सरकारी योजनेचा कसा घ्याल लाभ? जाणून घ्या.


👨🏻‍🌾 तुम्ही शेतकरी असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासनाकडून पशू किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली असून या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मासे, कोंबड्या, मेंढ्या, शेळी, गाय, म्हशी पालनासाठी पशू किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत कर्ज दिले जाते. 


🌱 शेती व्यवसायात वाढत्या उत्पादनाबरोबर शेतकऱ्यांचा खर्चही वाढला आहे. निसर्गाचा लहरीपणा व बाजारपेठेतील दरात होणारे चढ-उतार शेतकऱ्यांसाठी नुकसानीचे ठरत आहेत. शेतीत योग्य गुंतवणूक आणि पिकेल ते विकेल’ या धोरणाचा अवलंब गरजेचा झाला आहे. त्यासाठी केंद्राने किसान क्रेडिट कार्डची योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे.


🪪 *किसान क्रेडिट कार्डचे फायदे* 

* किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना कमी व्याजदरात ३ लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.

* हे कर्ज केवळ ४ टक्के वार्षिक व्याजदराने दिले जाते. 

* किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुमचे वय किमान १८ वर्षे तर कमाल ७५ वर्षापर्यंतचे शेतकरी या क्रेडिट कार्डचा लाभ घेऊ शकतात.


🤔 *काय आहे किसान क्रेडिट कार्ड योजना?* 

शेतीमध्ये नुकसान झाल्यानंतर शेतकरी अनेकदा त्याच्या आजूबाजूच्या लोकांकडून खूप जास्त व्याजदराने कर्ज घेतात. नंतर आयुष्यभर त्या कर्जाच्या ओझ्याखाली दबून राहतात. या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड सुरू केले आहे. ही योजना १९९८ मध्ये सुरू झाली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरात कर्ज मिळण्याची तरतूद आहे.


💳 *कसे काढाल किसान क्रेडिट कार्ड?* 

✌🏻किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही सरकारी बँकेत अर्ज करू शकता. किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील. यानंतर किसान क्रेडिट कार्ड मिळेल.

👩🏻‍💻 याशिवाय बँकांच्या अधिकृत वेबसाइटद्वारे केसीसीसाठी अर्ज करू शकतात, मात्र किसान क्रेडिट कार्डसाठी शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेअंतर्गत बँक खाते असणे आवश्यक आहे.


राशीभविष्य : ३० एप्रिल मंगळवार..!


🐏 *मेष -* 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. दिवसभर मनोरंजनाची संधी मिळेल. तुमच्या मनात नवीन कल्पना येऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला नवीन मार्ग दिसू शकतो. तुम्हाला एखाद्या कौटुंबिक समस्येबद्दल काही त्रास होऊ शकतो, परंतु त्याबद्दल काळजी करण्याऐवजी, तुम्ही त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी इतरांशी बोलू शकता. नोकरदार लोक त्यांचे काम समर्पणाने करतील आणि तुम्हाला याचा खूप फायदा होईल. आज तुम्हाला पैशाच्या बाबतीतही फायदा होऊ शकतो. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे खर्च करू शकाल. तुम्ही कमावलेले पैसे तुम्ही खर्च केल्याने तुम्हाला समाधान वाटेल. 


🦬 *वृषभ -* 

आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप चांगला जाईल. तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल आणि तुमच्या कष्टाचे चीज होईल. आज तुमचे विचार अगदी स्पष्ट असतील आणि तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. आज तुमच्या आयुष्यात काही नवीन शक्यता निर्माण होऊ शकतात ज्या तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांच्या दिशेने पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतील. आज यशासोबतच तुम्हाला भरपूर पैसेही मिळू शकतात. तुमचा खर्च लक्षात घेऊन तुम्ही प्रगतीसाठी बचत करण्याचा विचार कराल. तुम्ही समाधानाने सर्व गोष्टी करू शकता एवढी पुरेशी संसाधने तुमच्याकडे असल्याने तुम्ही तुम्हाला हवे ते आनंदाने करू शकता. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप यशस्वी असेल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन उंची गाठाल. आजपासून तुमच्या मनात भविष्याबाबत नवीन आशा आणि शक्यता निर्माण होतील. 


👩‍❤️‍👨 *मिथुन -* 

आज मिथुन राशीच्या लोकांना दिवसभर अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल जे खूप थकवणारे असू शकते. तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करून काळजीपूर्वक मार्गक्रमणा करावी लागेल. तुम्हाला तुमच्या कामात अधिक वेळ द्यावा लागेल आणि मेहनत करावी लागेल जेणेकरून तुम्ही तुमची उद्दिष्टे साध्य करू शकाल. आज तुम्हाला व्यवसायातही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पैसे कमवण्यासाठी तुम्हाला तुमच्या व्यवसायात जास्त वेळ द्यावा लागेल आणि काळजीपूर्वक काम करावे लागेल. आज तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी अधिक हुशारीने बोलावे लागेल आणि त्यांचा सल्ला काळजीपूर्वक ऐकावा लागेल. 


🦀 *कर्क –* 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. आज नवीन कामांमध्ये तुमचा उत्साह वाढेल आणि तुम्हाला त्यात यश मिळेल. तुम्हाला तुमच्या कामात पूर्ण जोश आणि उत्साहाने व्यग्र रहावे लागेल आणि त्यात तुम्हाला यशही मिळेल. आज तुमच्या व्यवसायात पैसे कमावण्याचे अनेक मार्ग उघडतील. तुम्ही तुमच्या व्यवसायात अधिक उत्साहाने आणि आशेने काम कराल. आज तुम्हाला शेअर बाजारात चांगला नफा मिळू शकतो आणि तुम्ही तुमच्या गुंतवणुकीमुळे खूप आनंदी व्हाल. आजचा दिवस तुमच्यासाठी प्रेमाने भरलेला असेल. जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर आज तुम्हाला त्यांना भेटण्याची आणि तुमच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळू शकते. आजचा दिवस तुमच्यासाठी रोमान्सने भरलेला असेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक डिनर डेटवर जाऊ शकता. 


🦁 *सिंह -* 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कठीण जाणार आहे. आज तुम्हाला तुमच्या कामात विलंब होईल आणि तुमचे काम पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात. तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन एकमेकांसाठी पूरक असणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या कामात संयम आणि उत्साहाची आवश्यकता असू शकते. आज तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांचा कल लक्षात ठेवावा लागेल. तुम्हाला तुमच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल आणि तुमच्या खाण्याच्या सवयी आणि व्यायामाकडेही लक्ष द्यावे लागेल. आज तुम्हाला पैशाच्या बाबतीत सावध राहावे लागेल आणि खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायात सावध राहून हुशारीने गुंतवणूक करावी लागेल. आज तुम्हाला तुमचे नातेसंबंध नीट हाताळावे लागतील आणि तुमच्या प्रियजनांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. 


👧🏻 *कन्या -* 

आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी खूप चांगला जाईल. आज तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद आणि यश मिळेल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल आणि तुमची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळेल. हा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल कारण तुम्हाला तुमच्या क्षेत्रात नाव कमावण्याची संधी मिळेल. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुमच्यासाठी चांगल्या संधी येतील आणि तुम्हाला पैसे मिळवण्याची चांगली संधी मिळेल. आज तुमच्या आरोग्याची काळजी घेणेही तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल. तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी पुरेसा वेळ द्या. 


⚖️ *तूळ -* 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानांनी भरलेला असू शकतो. तुमच्या कामात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. आज तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला तुमचे विचार आणि भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. आज तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबियांशी वाद घालणे टाळावे. नोकरदार लोकांना आज आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि कार्यालयीन राजकारणापासून दूर राहावे लागेल. आज तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत जास्त वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत आनंदाचा उपभोग घ्याल. तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीची काळजी घ्यावी लागेल आणि तुमचे पैसे हुशारीने खर्च करावे लागतील. आज तुम्ही तुमच्या व्यवसायात नवीन गुंतवणूक करणे टाळावे. 


🦂 *वृश्चिक -* 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कठीण असू शकतो. आज तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला एखादा आजार जडू शकतो. आज तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल. तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल नाहीतर नंतर आर्थिक चणचण निर्माण होईल. तुम्ही तुमचे काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा नाहीतर इतरांकडून तुमच्या विषयी गैरसमज होऊ शकतो. तुम्हाला तुमचे खर्चाच्या अंदाजपत्रकाचे नियोजन करावे लागेल, नाहीतर नंतर आर्थिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. 


🏹 *धनू –* 

आजचा दिवस धनू राशीच्या लोकांसाठी खूप चांगला असेल, जो तुमच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवसांपैकी एक बनेल. तुमच्या काही अपूर्ण इच्छा आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमचे मन आनंदाने भरून जाईल आणि त्याचा तुमच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होईल. आज तुम्ही तुमच्या कामात खूप व्यग्र असाल आणि तुमच्या प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित कराल. आज विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या विषयात यश मिळेल आणि त्यांची अभ्यासात प्रगती होईल. संध्याकाळी तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यात सहभागी होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचा आदर वाढेल. आज तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनातील रहस्ये समजून घेण्याची संधी मिळेल आणि तुम्ही तुमचे नाते स्पष्टपणे समजून घेऊ शकाल.  


🦐 *मकर -* 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम राहील. आजचा दिवस तुम्हाला जीवनात नवीन सुरुवात करण्याची मोठी संधी देईल. आज तुम्हाला तुमच्या यशाने नव्या उंचीला गवसणी घालण्याची संधी मिळेल. आज तुमचे मन उत्साहाने भरलेले असेल ज्याचा तुमच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होईल. आज तुम्ही एखाद्या प्रकल्पात खूप व्यग्र असाल आणि यामुळे तुमच्या कामाची गती वाढेल. आज विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या विषयात चांगली फळे मिळतील आणि त्यांच्या अभ्यासातही यश मिळेल. संध्याकाळी तुम्ही एखाद्या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊ शकता ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. आज तुम्ही तुमच्या प्रेम जीवनातील रहस्ये समजून घेण्याचा प्रयत्न कराल. 


🍯 *कुंभ -* 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप कठीण जाणार आहे. तुम्हाला तुमच्या कामात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला संयमाने आणि काळजीपूर्वक काम करावे लागेल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आव्हानात्मक असू शकतो. तुम्हाला तुमच्या भविष्याची काळजी करण्याची गरज नाही, तर आज तुम्हाला मेहनत करण्याची आणि दृढनिश्चय ठेवण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला तुमच्या कामात संयम ठेवावा लागेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायात सतर्क राहावे लागेल आणि वेळेवर निर्णय घ्यावे लागतील. आरोग्य विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही आजचा दिवस आव्हानात्मक असू शकतो. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि तुम्ही तुमच्या क्षेत्रात नाव कमवण्यात यशस्वी व्हाल. 


🦈 *मीन -* 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस निराशाजनक असू शकतो. आजच्या दिवशी तुम्हाला काही अपयशांना सामोरे जाण्याची गरज लागेल. सुरुवातीला तुम्हाला काही असामान्य आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, जे समजण्यास थोडा वेळ लागू शकतो. परंतु आज तुम्हाला संयमाने जगावे लागेल आणि येणाऱ्या समस्यांसाठी तयार राहावे लागेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायात किंवा कामात नुकसान देखील होऊ शकते. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून काही आव्हाने घेऊन येऊ शकतो.



नोकरी || 12 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची मोठी संधी || 3700+ जागांवर भरती सुरू नोकरी  || 12 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची मोठी संधी || 3700+ जागांवर भरती सुरू Reviewed by Best Seller on 4/30/2024 06:40:00 pm Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

🚶‍♂️💃🚶‍♂️

Blogger द्वारा संचालित.