जमीन तुकडेबंदी कायद्यात सुधारणा; विहीर, रस्ता आणि घरकुल योजनेसाठी जमीन खरेदीची मुभा

 


👍🏻राज्य सरकारने जमीन तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा करून त्यामध्ये थोडी शिथिलता आणली आहे. त्यामुळे विहिरीसाठी, शेतजमिनीकडे जाण्यासाठी रस्त्याकरीता व केंद्रीय व राज्य ग्रामीण घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना जमीन खरेदी करता येणार असून याच्या परवानगीचे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याबाबत राज्य सरकारने अधिसूचना काढून राजपत्र (GR) प्रसिद्ध केले. यामुळे संबंधित लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

📝 *या सुधारित कायद्यानुसार:* 


🕳️ *विहीर:* 

* ५०० चौरस मीटरपर्यंत जमीन खरेदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी मिळू शकेल.

* भूजल सर्वेक्षण व विकास अभिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक.

* विक्री दस्तानंतर सातबारा उतारावर “विहिर वापराकरीता मर्यादित” अशी नोंद.


🛣️ *शेतरस्ता:* 

* प्रस्तावित शेतरस्त्याचा कच्चा नकाशा, जमिनीचे भू-सहनिर्देशक, जवळचा विद्यमान रस्ता यांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावी लागेल.

* जिल्हाधिकारी संबंधित तहसीलदारांकडून स्थानिक अहवाल घेऊन मंजुरी देऊ शकतात.


🏠 *ग्रामीण घरकुल योजना:* 

* प्रत्येक लाभार्थ्यांसाठी १००० चौरस फुटापर्यंत जमीन खरेदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळेल.


📌 *महत्वाचे मुद्दे:*

* जमिनीची परवानगी एक वर्षासाठी राहणार असून अर्जदाराने विनंती केल्यास दोन वर्षासाठी मुदतवाढ मिळू शकेल.

* जमिनीचा योग्य वापर न झाल्यास परवानगी रद्द होईल.

* या सुधारित कायद्यामुळे शेतकरी आणि घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


☎️ *अधिक माहितीसाठी:* 

आपल्या जिल्ह्यातील तहसील कार्यालय

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी


🪖 नोकरी : सीमा सुरक्षा दलात (BSF) विविध पदांसाठी जम्बो भरती जाहीर*


💁🏻‍♂️ सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. बीएसएफने विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या पदांसाठी 16 मार्चपासून प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 15 एप्रिल पर्यंत अर्ज करता येणार आहे.


👥 *एकूण पदसंख्या:* 82 पदे


🧾 *रिक्त पदांचा तपशील :* 

▪️ *गट अ* 

* असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक (ASI): ०८ पदे

* असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (ASI): 11 पदे

* कॉन्स्टेबल (स्टोअरमन): 03 पदे

* बीएसएफ अभियांत्रिकी सेटअपमध्ये भरती

▪️ *गट ब:* 

* SI (काम): 13 पदे

* SI/JE (निवडणूक): 09 पदे

▪️ *गट क:* 

* HC (प्लंबर): 01 पदे

* HC (सुतार): 01 पदे

* कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर): 13 पदे

* कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक): 14 पदे

* कॉन्स्टेबल (लाइनमन): ०९ पदे


📚 *शैक्षणिक पात्रता:* शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात वाचा...


👤 *वयोमर्यादा :* 18 ते 30 वर्षे दरम्यान


🤑 *पगार* 

* एअर विंग – रु. 29200 ते रु. 92300 आणि रु. 21700 ते रु. 69100

* अभियांत्रिकी – रु. 35400 ते रु. 112400 आणि रु. 25500 ते रु. 81100


👩🏻‍💻 *अर्ज करण्याची पद्धत :* ऑनलाईन

अधिकृत संकेतस्थळ : https://www.bsf.gov.in/ 


🎯 नोकरी : UPSC अंतर्गत 1930 पदांची मोठी भरती जाहिरात प्रकाशित-


💁🏻‍♀️ संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत *“नर्सिंग ऑफिसर”* पदांच्या एकूण 1930 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख *27 मार्च 2024* आहे


🤷🏻‍♀️ *पदाचे नाव –* नर्सिंग ऑफिसर

👥 *पदसंख्या –* 1930 जागा


📚 *शैक्षणिक पात्रता –* शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.


🖨️ *अर्ज पद्धती –* ऑनलाईन

🌐 *अधिकृत वेबसाईट –* https://upsconline.nic.in/


प्रपंचातील थोडीतरी चिकाटी भगवंतासाठी धरावी.


लग्न करणे याला आपण सामान्यत: प्रपंच समजतो. लग्न ही फार पवित्र संस्था आहे. तिच्यामध्ये दोन जीवांचा उद्धार आहे. ज्याप्रमाणे गुरू आणि शिष्य यांचा संबंध असतो, म्हणजे दोघांचे मत एकच असते, त्याप्रमाणे पती आणि पत्नी यांचा संबंध असावा. पत्नी आपले सर्वस्व पतीला देते, यामध्येच खरे पवित्रपण आहे. लग्नाचा पवित्रपणा ज्या वेळी नाहीसा होईल त्यावेळी आपल्या धर्माचा पायाच उखडला असे समजावे. आपली अशी समजूत असते की, लग्न केले तेव्हा सुख हे लागणारच. जे जे परमेश्वराने निर्माण केले ते माझ्या सुखासाठीच केले असे आपण म्हणतो. वास्तविक एकच वस्तू ठेवली आणि ती सर्वांनी घ्यावी म्हटले तर सर्वच एकट्याच्या हाती कशी येईल ? बायको म्हणते, “मी माहेरी सोळा वर्षे तपश्चर्या केली आणि आता यांच्या पदरात पडले, तेव्हा यांनी मला आता सुख द्यावे” पोरांना वाटते, “आमची इतकी पुण्याई म्हणून यांना इतका पगार झाला, तेव्हा यांनी नाही का आमचे लाड पुरवू ?” खरोखर, सुखाकरिताच प्रत्येकाची धडपड चाललेली असते; परंतु खरे सुख कशात आहे हे कळूनसुद्धा, आपण डोळ्यांवर कातडे ओढून घ्यावे, त्याप्रमाणे तिकडे दुर्लक्ष करीत असतो. प्रपंचात सुख मिळावे म्हणून, आपण जी चिकाटी धरतो, तिच्या एकचतुर्थांश चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली तरी आपले काम भागेल. आनंदाच्या प्राप्तीसाठी आपण जे साधन आज करतो आहोत ते चुकीचे आहे. तात्पुरत्या सुखासाठी आपण आज धडपडत आहोत, त्यापासून दु:खच पदरात पडते. म्हणून तसे न करता, चिरकाल टिकणाऱ्या सुखासाठी आपण काही तरी साधन करावे.


जगामध्ये प्रत्येक गोष्टीला बंधन आहे. प्रत्येकाचे नियम ठरलेले आहेत. त्या नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे अनवस्था आणणे होय. त्याप्रमाणे कुटुंबामध्ये प्रत्येक माणसाचे कर्तव्य ठरलेले आहे. असे कर्तव्याचे वळण जिथे असते त्या घराला ‘वळण आहे’ असे म्हणतात. ज्या घरामध्ये वळण असते ते घर सुखी होईल. समजा, आपण एक घर बांधले, त्यामध्ये दरवाजे केले, भिंतीला खिडक्या केल्या, वर आढ्याला झरोके केले. आता त्यांपैकी झरोक्यांनी विचार केला की, ‘आम्ही का म्हणून लहान असावे ? आम्ही दरवाज्यांइतकेच मोठे होणार !’ असे म्हणून ते दरवाज्यांइतके मोठे झाले; खिडक्यांनीही तोच विचार केला, आणि त्या सगळ्या दरवाज्यांइतक्या मोठ्या बनल्या; असे झाल्यावर त्या घराचे काय होईल ? हे जसे योग्य नव्हे. तसे, ज्या घरामध्ये प्रत्येकजण आपलेच मत खरे म्हणतो, आणि जेथे वडील माणसांविषयी आदर नसतो, त्या घराचा विचका व्हायला वेळ लागत नाही.


आपल्या घरातील वातावरण शुद्ध, शांत आणि पवित्र असावे.



जमीन तुकडेबंदी कायद्यात सुधारणा; विहीर, रस्ता आणि घरकुल योजनेसाठी जमीन खरेदीची मुभा जमीन तुकडेबंदी कायद्यात सुधारणा; विहीर, रस्ता आणि घरकुल योजनेसाठी जमीन खरेदीची मुभा Reviewed by Best Seller on 3/17/2024 04:23:00 pm Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

🚶‍♂️💃🚶‍♂️

Blogger द्वारा संचालित.