खालील सर्व माहिती ही online प्रणाली च्या माध्यमातून संग्रहित केलीआहे
🙏🙏🙏🙏
━━━━━━━━━━━━━
सर्व प्रोसेस जाणून घ्या!
━━━━━━━━━━━━━
जर तुमचा फोन चोरी झाला किंवा हरवला तर अशावेळी तुमचे बँक खाते असुरक्षित असते. अशावेळी सगळ्यात आधी तुमचा युपीआय आयडी ब्लॉक करणेच शहाणपणाचे ठरते. मात्र, युपीआय आयडी ब्लॉक कसा करावा, हे जाणून घेऊया.
📵 *फोनपे युपीआय आयडी असा करा ब्लॉक*
● सगळ्यात पहिले 02268727374 किंवा 08068727374 नंबरवर कॉल करा
● ज्या मोबाइल नंबरहून यूपीआय आयडी लिंक आहे त्याविरोधात तक्रार दाखल करा.
● ओटीपी आल्यानंतर तुमचा सिम कार्ड व फोन हरवला गेला असल्याचा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल
● त्यानंतर तुम्हाला कस्टमर केअरसोबत कनेक्ट केले जाईल. त्यानंतर तुम्हाला काही माहिती विचारली जाईल ती दिल्यानंतर युपीआय आयडी ब्लॉक करु शकतात.
📵 *PayTM UPI आयडी असा करा ब्लॉक*
● सगळ्यात आधी पेटीएम बँक हेल्पलाइन नंबर 01204456456 वर कॉल करा.
● त्यानंतर Lost Phone या पर्यायावर क्लिक करा
● त्यानंतर एक वेगळा नंबर टाकून त्यानंतर हरवलेला फोन नंबर टाका
● त्यानंतर लॉगआऊट फ्रॉम ऑल डिव्हाइस हे ऑप्शन सिलेक्ट करा.
● या नंतर पेटीएम वेबसाइटवर जाऊन 24×7 हेल्प ऑप्शन सिलेक्ट करा
● अशा पद्धतीने तुम्ही Report a Fraud किंवा Message Us ऑप्शन सिलेक्ट करु शकतात
● त्यानंतर तुम्हाला पोलिस रिपोर्ट सह काही डिटेल्स द्यावे लागणार आहेत. त्यानंतर सर्व पडताळणी झाल्यानंतर पेटीएम अकाउंट तात्पुरते बंद केले जाईल.
📵 *गुगल पे युपीआय आयडी असा करा ब्लॉक*
● सगळ्यात पहिले 18004190157 हा नंबर डायल करा
● त्यानंतर कस्टमर केअरला पेटीएम अकाउंट ब्लॉक करण्याची माहिती द्या.
● अँड्रोइड युजर्सना गुगल फाइंड माय फोन हा कोणत्या पीसी किंवा फोनवर लॉगिन करावे लागेल. त्यानंतर गुगल पे चा संपूर्ण डेटा रिमोटली डिलीट करावा लागेल. त्यानंतर तुमचे गुगल पे अकाउंट तात्पुरते ब्लॉक होऊन जाईल.
● जर तुम्ही आयओएस युजर्स असाल तर find my app किंवा अन्य ॲपलच्या अधिकृत टूलमधून संपूर्ण डेटा डिलीट करुन गुगल पे अकाउंट ब्लॉक करु शकतात.
माहिती किचकट वाटेल पण कामाची आहे
दुसरी बातमी 👇👇👇
💊 औषध घेतल्यावर त्वरित वेदना कशा थांबतात? जाणून घ्या*
🤔 तुम्ही कधी विचार केला आहे का की, पेन किलरमध्ये असे काय असते, ज्यामुळे काही वेळातच तुमच्या वेदना संपतात?
🤕 जेव्हा आपल्याला दुखापत होते, तेव्हा आपल्या शरीरातील सिग्नल थेट मेंदूला जातो, जो आपल्याला संदेश देतो की आपल्याला वेदना होत आहे, ज्यामुळे आपल्याला वेदना जाणवते. वेदना होणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे कारण ते आपल्याला दुखापत झाली आहे किंवा आपल्याला काही धोका आहे हे सांगते.
🤔 *पेन किलर हे दुखणे कसे संपवतात?* : पॅरासिटामॉल किंवा ब्रुफेन सारखी औषधे ही वेदना एका खास प्रकारे कमी करतात. जेव्हा आपल्याला दुखापत होते तेव्हा आपल्या शरीरात अशी अनेक रसायने तयार होतात ज्यामुळे आपल्याला वेदना होतात. अशा परिस्थितीत, शरीर जखमी ठिकाणी अधिक रक्त पोहोचवू लागते.
🩸 रक्तामध्ये पांढऱ्या रक्त पेशी देखील असतात ज्याचा उपयोग जखम बरी करण्यासाठी केला जातो. या पांढऱ्या रक्तपेशींसोबतच अनेक प्रमुख रसायनेही दुखापतीच्या ठिकाणी पोहोचतात. या प्रमुख रसायनांपैकी एकाचे नाव प्रोस्टॅग्लॅंडिंग आहे. यामुळे वेदना आणि जळजळ होते.
▪️ जेव्हा तुम्ही ही औषधे खाता तेव्हा ती हळूहळू तुमच्या रक्तात मिसळतात आणि दुखापतीच्या ठिकाणी तसेच मेंदूला जातात.
▪️ दोन्ही ठिकाणी, ते वेदना कमी करण्यासाठी हे रसायन तयार होण्यापासून रोखतात, जेणेकरून मेंदू आपल्याला वेदना होत असल्याचे संकेत देत नाही.
🤗 यामुळे या पेन किलर खाल्ल्यानंतर काही वेळातच आपल्या वेदना थांबतात आणि आपल्याला आराम मिळतो.
⚛️ *राशीभविष्य : ६ जानेवारी शनिवार..!*
मेष राशीसाठी आज धनलाभाचा योग आहे आणि तुमची आवश्यक ती सर्व कामे मार्गी लागतील, त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. एखादी विशेष डिल फायनल होऊ शकते. आज विशेष सन्मान मिळण्याची शक्यता आहे, तसेच तुमच्या भौतिक विकासाचे आज चांगले योग आहेत. आज एखाद्या मंगल उत्सवात सहभागी होण्याची संधी आहे. तुम्ही आज सामाजिक कार्यावर पैसे खर्च कराल, त्यामुळे तुमची कीर्ति वाढेल.
🦬 *वृषभ*
वृषभ राशीच्या लोकांसाठी आज आर्थिक लाभाचा दिवस आहे, तसेच आज तुमचे लक्ष नवीन योजनांवर असेल. आज प्रवासाची योजना बनू शकते. कायदेशीर वादात आज यश मिळेल तसेच जागा बदलण्याचे नियोजनही तुम्ही करू शकाल. दिवसाच्या उत्तरार्धात तुमच्या पराक्रमात वृद्धी होईल. आज कुटुंबात प्रसन्न वातावरण राहील. आज आवश्यक कामाचे नियोजन पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल. जोडीदाराची मदत होईल.
👩❤️👨 *मिथुन*
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस रचनात्मक जाईल. एखादे कल्पक काम पूर्ण करण्यात तुम्हाला यश मिळेल. आज तुम्ही पूर्ण वेळ यात घालवू शकतो. तुम्हाला सर्वाधिक प्रिय असलेले काम पूर्ण करण्याची संधी तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुम्ही आज रिलॅक्सही राहाला. आज नवीन योजना तुमच्या डोक्यात येतील आणि त्या पूर्णही होतील. आज वरिष्ठांचे सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न करा.
🦀 *कर्क*
कर्क राशीचा आजचा दिवस सृजनात्मक जाईल. तुम्ही जेही काम मनापासून कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. अपूर्ण कामे होतील आणि महत्त्वाच्या चर्चाही होतील. ऑफिसमधील वातावरण तुमच्या मनासारखे राहील, तसेच जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज रात्री एखाद्या लग्नसमारंभात जाण्याची संधी मिळेल.
🦁 *सिंह*
सिंह राशींच्या लोकांचा आजचा दिवस फार व्यस्त जाईल. आज तुम्हाला कामावर फार लक्ष द्यावे लागणार आहे. आज अभ्यासाठी वेळ काढणे फार फायद्याचे ठरेल. आज काही वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे कोणतेही काम करताना विचारपूर्वक करा.
👧🏻 *कन्या*
कन्या राशीच्या लोकांना आज आर्थिक विषयात सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल आणि तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील. कार्यालयात संवादात संयम आणि सावधगिरी बाळगा. आज कोणाशी संघर्ष न होणे चांगले आहे. आज एखाद्या शुभ मंगलकार्याची चर्चा होऊ शकते. रात्रीच्या वेळी स्थिती पहिल्यापेक्षा चांगली असेल.
⚖️ *तूळ*
तूळ राशीच्या लोकांना आजचा दिवस भाग्यशाली ठरेल आणि आज तुमची सगळी कामे यशस्वी होतील. आज सगळ्याचा विवादांवर मार्ग निघेल. आजचा दिवस लाभकारक आहे. कामाशी संबंधित सर्व व्यवहार आज सहजरीत्या मार्गी लागतील. नवीन प्रोजेक्टवरही काम सुरू कराल. जमीन, स्थावर मालमत्ता या संदर्भातील वाद सुटतील. कुटुंबातील किंवा आजूबाजूचे लोक आज अडचण निर्माण करतील.
🦂 *वृश्चिक*
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस आर्थिक विषयासाठी चांगला आहे, आणि तुम्हाला आज दिवसभर लाभाच्या संधी मिळतील आणि तुम्ही कार्यशील राहाला. कुटुंबात सुख, शांती आणि स्थैर्याचा आनंद घ्याल. व्यापारात आणि नोकरीच्या ठिकाणी काही नाविन्य आणू शकला तर पुढे जाऊन त्याचा लाभ होईल. कामात नावीन्य येईल आणि सर्वांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल.
🏹 *धनू*
धनू राशीच्या लोकांनी आज दिवसभर सावध आणि सतर्क राहिले पाहिजे. व्यवसायात तुम्ही जर थोडा धोका पत्करला तर तुम्हाला फायदा होईल आणि तुमची मोठी कामे मार्गी लागतील. रोजच्या कामातून वेळ काढून एखादे नवीन काम हाती घेऊ शकता, पण यासाठी तुम्हाला धैर्याने काम करावे लागेल. आज जवळच्या व्यक्तीसाठी पैशाचे नियोजन करावे लागू शकते. नवीन संधी तुमच्या आजूबाजूलाच असेल आणि त्याला ओळखण्याची गरज आहे.
🦐 *मकर*
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. भागीदारीतील व्यवसायातून फार फायदा होईल. रोजची घरगुती कामे हातावेगळी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला मुलगी किंवा मुलाबद्दल आज एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. आज प्रामाणिकपणा आणि नियम यावर विशेष लक्ष द्या. एकाच वेळी भरपूर कामे हाती येतील, त्यामुळे तुम्ही कामात व्यस्त राहाल.
🍯 *कुंभ*
कुंभ राशीच्या लोकांनी आज प्रत्येक प्रकरणात अत्यंत सतर्क राहिले पाहिजे. आज तुम्हाला प्रकृतीबद्दलही सावध राहिले पाहिजे. हवामानात बदल होत असल्याने प्रकृतीच्या तक्रारी राहतील. आज खाण्यपिण्यात निष्काळजी राहू नका. व्यापारात दिवस सुखद असेल. घाईगडबडीत एखादी चूक होऊ शकते, त्यामुळे प्रत्येक काम विचारपूर्वक करा.
🦈 *मीन*
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. व्यापारात धोका पत्करल्याने तुम्हाला फायदो होईल. तुमचा मृदू स्वभाव आणि धैर्य यामुळे अडचणींत सुधारणार करू शकाल. आतापर्यंत जीवनात कमी असलेली एखादी गोष्ट बुद्धीच्या जोरावर मिळवू शकाल. संकटात सापडलेल्या एखाद्या व्यक्तीची मदत करणे तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे.
कोई टिप्पणी नहीं: