मृद व जलसंधारण विभागात भरती - Jalsandharan Vibhag Bharti सविस्तर पहा.


सर्वात शेवटी आपणास जाहिरात download करण्यासाठी 
🌐🌐🌐 👈👈👈 ह्या चिन्हावर क्लिक करून सविस्तर जाहिरात Google drive वरून डानलोड करावे ही विनंती.
🙏🙏🙏

 महाराष्ट्र शासन

आयुक्त मृद व जलसंधारण (म.रा)

छत्रपती संभाजीनगर

मृद व जलसंधारण विभागाच्या अधीपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेमधील जलसंधारण अधीकारी (स्थापत्य) गट ब (अराजपत्रीत) या संवर्गातील रिक्त पदे भरती जाहिरात -२०२३


महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्र. आस्थाप-२०१८/प्र.क्र.१८/जल-२ दि.१९/१२/२०२२ तसेच 

शासन शुध्दीपत्रक दि. १४/०७/२०२३ व दि.२०/०१/२०२३ कडील शासन पत्र संदर्भ क्र. आस्थाप-२०१८/प्र.क्र.१८/जल-२ 

दि. १९/१२/२०२२ अन्वये सामान्य प्रशासन विभागाने मृद व जलसंधारण विभागाच्या अधीपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेमधील जलसंधारण अधीकारी (स्थापत्य) गट ब (अराजपत्रीत) या संवर्गातील ६७० रिक्त पदांच्या भरती करिता मान्यता दिलेल्या प्रवर्ग निहाय आरक्षणा नुसार दर्शविण्यात आलेली पदसंख्ये नुसार सरळसेवेने रिक्त पदे भरती करिता प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमुद केलेप्रमाणे शैक्षणीक अर्हता व इतर अटींची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारां कडून मृद व जलसंधारण विभागाच्या 

https://swcd.maharashtra.gov.in

या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दि.२१/१२/२०२३ते दि.१०/०१/२०२४ 

या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.

मृद व जलसंधारण विभागात भरती

सदर पदांवरील भरती करिता ऑनलाईन परिक्षा महाराष्ट्रातील निश्चीत केलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नेमून दिलेल्या केद्रावर घेण्यात येईल. ऑनलाईन परिक्षेची तारीख विभागाच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल. सदर संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रिये संबंधी आवश्यक अद्यावत माहिती प्राप्त करुन घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहिल.

ऑनलाईन परीक्षेची तारिख विभागाच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसीध्द करण्यात येईल. सदर जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या मृद जलसंधारण विभागाच्या 

https://swed.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

परिक्षेचा दिनांक, वेळ व परिक्षाकेंद्र प्रवेशपत्रामध्ये नमुद केले जाईल, संभाव्य बदला बाबत मृद व

जलसंधारण विभागाच्या संकेतस्थळावर माहिती प्रसारीत केली जाईल.

भरती प्रक्रिये संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल/ सुचना इत्यादी विभागाच्या https://swcd.maharashtra.gov.in संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील. 

उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसुन या संकेतस्थळावर संपर्क साधण्याची दक्षता उमेवारांनी घ्यावयाची आहे.

जागा विवरण

👇👇👇


२. पदसंख्या व आरक्षणा संदर्भात सर्वसाधारण तरतुदी

१. जाहिरातीत नमुद केलेल्या पदसंख्येत व प्रवर्ग निहाय आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

२. पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास या बाबतची घोषणा / सुचना वेळोवेळी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या घोषणा / सुचनांच्या आधारे प्रस्तुत स्पर्धा परिक्षेमधुन भरावयाच्या पदांकरिता भरती प्रक्रीया राबविण्यात येईल.

३. परिक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे पदांच्या एकुण प्रवर्गनिहाय पदसंख्ये मध्ये बदल करण्याचे अधीकार नियुक्ती प्राधीकारी व त्यांचेनियंत्रण अधीकारी यांचे कडे राखुन ठेवण्यात आले आहेत.

४. पदभरती प्रक्रिये संदर्भात वाद, तक्रारी, पदांच्या एकुण व संवर्गनिहाय संख्येमध्ये बदल करणे बाबत आयुक्त, मृद व जलसंधारण (म.रा), वाल्मी परिसर छत्रपती संभाजीनगर यांना शासन व मृद व जलसंधारण विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या मान्यतेच्या अधीन राहुन अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार राहतील.

५. महिला, खेळाडु, दिव्यांग तसेच अनाथासाठींचे समांतर आरक्षण शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशा नुसार राहिल.

६. महिलांसाठी आरक्षीत पदांकरता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्र राज्याचे अधिवासी (असल्याबाबत तसेच नॉन क्रिमीलेअर (Non Creamy Layer) मध्ये मोडत असल्या बाबत (अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती वगळून) स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे.)

७. एखादी जात /जमात राज्य शासना कडुन आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषीत केली असल्यासच तसेच सक्षम प्राधीकाऱ्याने प्रदान केलेले जात प्रमाणपत्र उमेदवाराकडे अर्ज करतांनाच उपलब्ध असेल तर

संबंधीत जात / जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील.

८. समांतर आरक्षाणा बाबत शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही-१०१२/ प्र.क्र.१६/ १२/१६-अ, दिनांक १३ ऑगस्ट २०१४ तसेच शासन शुध्दीपत्रक सामान्य प्रशासन विभाग संकिर्ण-१११८/प्र.क्र.३९/१६-अ दिनांक १९ डिसेंबर २०१८ आणी तद्नंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशा नुसार कार्यवाही करण्यात येईल.

९. आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (ईडब्लुएस) उमेदवारां करिता शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक राआधो-४०१९/प्र.क्र.३१/१६-अ दि.१२ फेब्रुवारी २०१९ व दि.३१ मे २०२१ अन्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.

मृद व जलसंधारण विभागात भरती

१०. अद्यावत नॉन क्रिमीलेअर (Non Creamy Layer) प्रमाणपत्र/आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणुन सक्षम प्राधीकाऱ्याने वितरीत केलेले व अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

११. सेवाप्रवेशाच्या प्रयोजनसाठी शासनाने मागास म्हणुन मान्यता दिलेल्या समाजाच्या वयोमर्यादेमध्ये सवलत घेतलेल्या उमेदवारांचा अराखीव (खुला) पदावरील निवडीकरिता विचार करण्या बाबत शासनाच्या धोरणांनुसार कार्यवाही करण्यात येईल.

१२. अराखीव (खुला) उमेदवारां करिता विहीत केलेल्या वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक निकष संदर्भातील अटींची पुर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांचा (मागासवर्गीय उमेदवारांसह) अराखीव (खुला) सर्वसाधारण पदांवरील शिफारशी करिता विचार होत असल्याने, सर्व आरक्षीत प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षीत / उपलब्ध नसले तरी अर्जामध्ये त्यांच्या मुळ प्रवर्गा संदर्भातील माहिती अचुकपणे नमुद करणे बंधनकारक आहे.

१३. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोक प्रतिनिधीत्व कायदा १९५० च्या कलम २० अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल.

१४. शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्र. मकसी-१००७/प्र.क्र.३६/का. ३६ दि.१० जुलै २००८ नुसार महाराष्ट्र / कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावातील मराठी भाषीक उमेदवार संबंधीत मराठी भाषीक उमेदवारांनी ते महाराष्ट्र शासनाने दावा केलेल्या ८६५ गावातीलच रहिवासी असल्या बाबतचा त्यांचा वास्तव्याचा सक्षम प्राधीकाऱ्याचा विहित नमुन्यातील दाखला सादर करणे अनिवार्य राहील. सदर उमेदवारांनी ८६५ गावांतील १५ वर्षाचे वास्तव्य असलेला रहिवाशी असल्याचा सक्षम प्राधीका-याचा विहीत नमुन्यातील दाखला सादर करणे अनिवार्य राहिल. सदर उमेदवारांना सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्गापैकी कोणत्याही प्रवर्गाचा लाभ अनुज्ञेय ठरत नाही.

१५. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा (सामाजिक अथवा समांतर) अथवा सोयी सवलतींचा दावा करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधीत कायदा / नियम / आदेशानुसारविहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरुन अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांका पुर्वीचे अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र उपलब्ध असणे आवश्यक आहे.

१६. सामाजिक व समांतर आरक्षणा संदर्भात विविध न्यायालयामध्ये दाखल न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाच्या अधीन राहुन पदभरतीची कार्यवाही करण्यात येईल.

३. खेळाडु आरक्षण

१. शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, क्रमांक राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२ दिनांक ०१ जुलै २०१६ तसेच शासन शुध्दीपत्रक शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, क्रमांक राक्रीधो- २००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२ दिनांक १८ ऑगस्ट २०१६ व शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, क्रमांक संकीर्ण १७१६/प्र.क्र.१८/क्रीयुसे-२ दिनांक ३० जुन २०२२ तद्नंतर शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशा नुसार प्राविण्य प्राप्त खेळाडु आरक्षणा संदर्भात तसेच वयोमयदितील सवलती संदर्भात कार्यवाही करण्यात येईल.

मृद व जलसंधारण विभागात भरती

२. प्राविण्य प्राप्त खेळाडु व्यक्तींसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत क्रीडा विषयक विहित अर्हता धारण करीत असल्या बाबत सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणीत केलेले पात्र खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचे किंवा तत्पुर्वीचे असणे बंधनकारक आहे.

३. खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य दर्जाचे असल्याबाबत तसेच तो खेळाडू उमेदवार खेळाडुसाठी आरक्षित पदवरील निवडी करीता पात्र ठरतो याविषयाच्या पडताळणी करीता त्यांचे प्राविण्य प्रमाणपत्र संबंधीत विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या दिनांकापुर्वीच सादर केलेले असणे बंधनकारक आहे. अन्यथा प्राविण्य प्राप्त खेळाडुसाठी आरक्षणा करीता पात्र समजण्यात येणार नाही.

४. कागदपत्रे पडताळणीवेळी खेळाडु उमेदवारांनी विहित अर्हता धारण करीत असल्या बाबत सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणीत केलेले प्राविण्य प्रमाणपत्र तसेच त्यांचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य असल्या बाबत तसेच खेळाडु कोणत्या संवर्गातील आरक्षित पदावरील निवडी करीता पात्र ठरतो, या विषयीचा सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्राविण्य प्रमाणपत्र पडताळणी बाबतचा अहवाल सादर केला तरच उमेदवाराचा संबंधीत संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षीत पदावर नियुक्ती करता विचार करण्यात येईल.

४. दिव्यांग आरक्षण

१. दिव्यांग व्यक्ती हक्क अधीनियम २०१६ च्या आधारे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक

दिव्यांग २०१८/प्र.क्र.११४/१६-अ दि.२९ मे २०१९ तसेच या संदर्भात शासना कडुन वेळोवेळी जारी

करण्यात आलेल्या आदेशा नुसार दिव्यांग व्यक्तीच्या आरक्षणा संदर्भात कार्यवाही करण्यात येईल.

२. प्रस्तुत परीक्षे मधुन भरण्यात येणाऱ्या संवर्ग / पदांच्या बाबतीत शासन मृद व जलसंधारण विभागाचे शासन निर्णय क्र. दि. २६/०२/२०२१ अन्वये पदे सुनिश्चीत करण्यात आली आहेत.

३. दिव्यांग व्यक्तीसाठी असलेली पदे भरावयाच्या एकुण पदसंख्ये पैकी असतील.

४. दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित पदांवर निवड करतांना उमेदवार कोणत्या सामाजीक प्रवर्गातील आहे याचा विचार न करता दिव्यांग गुणवत्ता क्रमांनुसार त्यांची निवड करण्यात येईल.

५. संबंधीत दिव्यांगत्वाच्या प्रकाराचे किमान ४० % दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र धारक उमेदवार / व्यक्ती आरक्षण तसेच नियमानुसार अनुज्ञेय सोयी / सवलतीसाठी पात्र असतील.

६. दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या वयोमर्यादेचा अथवा इतर कोणत्याही प्रकारचा फायदा घेऊ इच्छीणाऱ्या उमेदवारांनी शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक अप्रकी-२०१८/प्र.क्र.४६/आरोग्य-६ दि.१४ सप्टेबर २०१८ मधील आदेशा नुसार केंद्र शासनाच्या www.swavlambancard.gov.in अथवा SADM या संगणकीय प्रणालीव्दारे वितरीत करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.

मृद व जलसंधारण विभागात भरती

५. माहिलांसाठी आरक्षण :-

१. माहिला व बालकल्याण विभाग शासन निर्णय, क्रमांक महिआ-२०२३/ प्र.क्र.१२३/का-२, दिनांक ०४/०५/२०२३ अन्वये खुल्या प्रवर्गातील महिलां करिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरिता खुल्या प्रवगातील महिलांनी तसेच सर्व मागासवर्ग प्रवर्गातील महिलांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट मा. मंत्रीमंडळाच्या मान्यतेने सदर शासन निर्णयान्वये रद्द करण्यात आलेली आहे.

२. मागासवर्गीय प्रवर्गातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), (क) व (ड) आणि विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीसाठी दावा करु इच्छिणाऱ्या महिलांना त्या त्या मागास प्रवर्गासाठी शासनाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे सक्षम अधिकाऱ्यांचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (Non Crimilayer Certificate) सादर करणे

आवश्यक आहे.

६. अनाथ आरक्षण

१. अनाथ व्यक्तीचे आरक्षण शासन निर्णय महिला व बाल विकास विभाग क्रमांक: अनाथ-२०१८/प्र.क्र.

१२२/का-०३ दिनांक ०६/०४/२०२३ व शासन शुध्दीपत्रक दि.१०/०५/२०२३ तसेच या संदर्भात

शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशा नुसार राहिल. २. अनाथांसाठी आरक्षीत पदावर गुणवत्ते नुसार निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गाचा आहे त्या प्रवर्गातुन करण्यात येईल.

३. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे अर्ज सादर करतांना महिला व बालविकास विभागा कडुन निर्गमित करण्यात आलेले अनाथ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अनाथ आरक्षणाचा लाभ घेऊन शासन सेवेत रुजु होणाऱ्या उमेदवाराला अनाथ प्रमाणपत्र पडताळणीच्या अधीन राहुन तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात येईल.

७. पात्रता

१. भारतीय नागरिकत्व

२. वयोमर्यादा गणण्याचा दिनांक हा प्रस्तुत जाहिरात प्रसिध्दीचा दिनांकास असेल.

३. जाहिरातीत नमूद केलेल्या जलसंधारण अधीकारी गट ब (अराजपत्रीत) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १९ वर्ष असावे व खुल्या प्रवर्गासाठी कमाल ३८ वर्षापेक्षा (मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षापेक्षा) जास्त नसावे.

४. दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत ४५ वर्षा पर्यंत

५. पात्र खेळाडूंच्या बाबतीत ४३ वर्षा पर्यंत

६. अनाथ उमेदवारांच्या बाबतीत ४३ वर्षा पर्यंत

तथापी, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय स.न. वि. २०२३/प्र.क्र. /१४ / कार्य-९२/दिनांक ०३/०३/२०२३ अन्वये दि.३१/१२/२०२३ पूर्वी प्रसिध्द होणाऱ्या भरती जाहिराती करिता कमाल वयोमर्यादेच्या २ वर्ष शिथीलता दिलेली असल्याने वर नमुद सर्व प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्ष इतकी शिथीलता असेल.

मृद व जलसंधारण विभागात भरती

८. शैक्षणीक अर्हता

अ.क्र.

पदाचे नाव

जलसंधारण (अराजपत्रीत) अधीकारी गट 

शैक्षणीक अर्हता

ब उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्षे कालावधीची स्थापत्य अभियात्रीकी मधील पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा पदवी (Degree in Civil Engineering) किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषीत केलेली अर्हता (शासन मृद व जलसंधारण विभाग राजपत्र जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-ब (राजपत्रीत) सेवाप्रवेश नियम दिनांक २१ सप्टेंबर, २०२१)

९. समकक्षता :

१. शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक आरजीडी-१५११/प्र.क्र.८९/२०११/१३ दिनांक २३/०८/२०११ मधील आदेशानुसार विद्यापीठ अनुदान आयोग मान्यता प्राप्त विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वायत्त संस्था इत्यादीच्या विविध पदविका, पदवी व पदव्युत्तर पदव्यांना केंद्र शासनाच्या मानव संसाधन विभाग, ( शिक्षण विभाग) मंत्रालया कडुन केंद्र शासनाच्या सेवेतील नियुक्तीसाठी वेळोवेळी

प्रदान केलेली समकक्षता मृद व जलसंधारण विभागाच्या सेवेतील नियुक्तीसाठी ग्राह्य धरण्यात येईल. २. अभियांत्रिक शाखाची समकक्षते बाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडील शासन निर्णय क्र.संकीर्ण- २०१३/ (४५/१३) भाग-१/ता. शी-२ दिनांक १८/१०/२०१६ तसेच वेळोवेळी संबंधीत अर्हतेस समकक्ष घोषीत करणे बाबत शासन निर्णय / शासन धोरणांनुसार असणे आवश्यक आहे.

१०. अर्हता पात्रता गणण्याचा दिनांक

प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहीत केलेल्या अंतिम दिनाकांस संबधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे

११. परीक्षेचे स्वरुप, निवडीची कार्यपध्दती व अनुषंगिक सुचना:-

१. जाहिरातीमध्ये नमुद अर्हता / पात्रते विषयक अटी किमान अर्हता धारण केली म्हणुन उमेदवार

शिफारशीसाठी पात्र असणार नाही.

२. सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया सेवा प्रवेश नियम शासन मृद व जलसंधारण विभाग राजपत्र जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-ब, (राजपत्रीत) सेवाप्रवेश नियम दिनांक २१ सप्टेंबर, २०२१) अथवा तद्नंतर शासना कडुन वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणा तसेच तरतुदी नुसार राबविण्यात येईल.

३. सर्व पदांसाठी मराठी / इंग्रजी माध्यमातुन संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील निश्चीत केलेल्या मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येईल.

४. संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based Online Examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्ते नुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या उत्तरपत्रीकेचे मुल्यांकन करतांना (नकारात्मक गुणपध्दत) अवलंबण्यात येईल. प्रत्येक चुकीच्या उत्तरा करिता २५ टक्के किंवा 14 एवढे गुण एकुण गुणांमधुन वजा / कमी करण्यात येतील.

५. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचे कडील शासन निर्णय क्रमांक प्रनिमं १२२२/ प्र.क्र.५४/का.१३ - अ दिनांक ४ मे २०२२ अन्वये मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही.

६. तात्पुरत्या निवड यादीमध्ये समावेश होणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीकरीता पाचारण करणेत येईल त्याबाबतची यादी व वेळापत्रक https://swed.maharashtra.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल.

७. कागदपत्रे पडताळणीसाठी सर्व मुळ कागदपत्रेव त्याच्या प्रत्येकी दोन स्वसाक्षांकित प्रतिसह उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मृद व जलसंधारण विभागात भरती

८. कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी 

https://swcd.maharashtra.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल.

९. परिक्षेचा निकाल (निवडसुची) तयार करताना परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा प्राधान्यक्रम हा महाराष्ट्र शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्रानिम १२२२/प्र.क्र.५४ का. १३-दि. ४ मे २०२२ मध्ये नमुद निकाषाच्या आधारे क्रमवार लावला जाईल.

१०. समान गुण आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य :-

शासन निर्णय क्र. प्रानिमं-१२२२/प्र.क्र.५४/का.१३-अ दिनांक ०४/०५/२०२२ मधील तरतुदींनुसार, लेखी परिक्षेमध्ये समान गुण मिळालेल्या उमेदवारांचा गुणवत्ता यादीत समावेश करताना, त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यांस प्रथम प्राधान्यक्रम देण्याच्या शासनाच्या धोरणानुसार अशा उमेदवारांकडे संबंधीत जिल्हास्तरीय समितीने त्यास कुटुंबातील मृत शेतकऱ्याचा पाल्य म्हणून पात्र ठरविल्याबाबतच्या पत्राचा क्रमांक व दिनांक असणे आवश्यक राहील. सदरहू मूळ पत्र उमेदवाराने कागदपत्र पडताळणीचे वेळी पडताळणी समितीस उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील.

(Computer Based Online Examination)


काठीण्यता यांचे समाणीकरण करण्याचे (Normalisation) पध्दतीने गुणांक निश्चीत करुन निकाल जाहीर करण्यात येईल. सदर समाणीकरण (Normalisation) सर्व परिक्षार्थी यांना बंधनकारक राहिल. याची सर्व परिक्षार्थीनी नोंद घ्यावी. सदर समाणीकरण (Normalisation) सुत्र माहितीसाठी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

अभ्यासक्रमः- अभ्यासक्रम स्वतंत्रपणे विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

१२. शुल्क :

१. अमागास :- रु.१०००/-

२. मागासवर्गीय / आ.दु.घ./अनाथ / दिव्यांग :- रु./-९००

३. उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतीरीक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरीक्त असतील.

४. परीक्षा शुल्क ना-परतावा (Non Refundable) आहे.

१३. निवडसुचीची कालमर्यादाः -

निवड समितीने तयार केलेली निवडसूची १ वर्षासाठी किंवा निवडसुची तयार करतांना ज्या दिनांका पर्यंत रिक्त पदे विचारात घेण्यात आली आहेत, त्या दिनांका पर्यंत या पैकी जे नंतर घडेल त्या दिनांका पर्यंत विधीग्राह्य राहील. त्यानंतर ही निवडसुची व्यपगत होईल.

निवड समितीने तयार केलेल्या निवडसुची मधुन ज्येष्ठते नुसार उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस केल्यांनतर शिफारस केलेला उमेदवार सदर पदावर विहीत मुदतीत रुजु न झाल्यास किंवा संबंधीत पदाच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदीं नुसार किंवा जात प्रमाणपत्र / अन्य आवश्यक प्रमाणपत्रांची अनुपलब्धता / अवैधता किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव नियुक्तीसाठी पात्र ठरत नसल्याचे आढळुन आल्यास अथवा शिफारस केलेला उमेदवार रुजु झाल्यानंतर नजीकच्या कालावधीत त्याने राजीनामा दिल्यामुळे किंवा त्याचा मृत्यु झाल्याने पदरिक्त झाल्यास, अशी पदे त्या त्या प्रवर्गाच्या निवडसुचीतील अतिरीक्त उमेदवारां मधुन जेष्ठतेनुसार उतरत्या क्रमाने भरण्यात येईल, मात्र अशी कार्यवाही निवडसुचीच्या कालमर्यादेत करण्यात येईल.

१४. अर्ज करण्याची पध्दत :

१. प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारण्यात येईल.

२. पात्र उमेदवाराला वेब आधारीत (Web Based) ऑनलाईन अर्ज https://swed. maharashtra. gov.

in या संकेत स्थळावर विहीत कालावधीत सादर करणे आवश्यक राहील.

३. विहित पध्दतीने ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्या शिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.

४. अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदती परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. ५. अर्ज भरण्याची व परीक्षाशुल्क भरण्याची अंतिम तारिख संगणकामार्फत निश्चित केली असल्याने पेमेंटगेटवे दिलेल्या तारखेला व वेळेला बंद होणार आहे. त्यामुळे परिक्षार्थी उमेदवारांनी मुदतीतच अर्ज व परिक्षा शुल्क भरणे बंधकारक राहिल.

मृद व जलसंधारण विभागात भरती

६. परीक्षा शुल्काचा भरणा प्रणालीव्दवारे उपलब्ध करुन दिलेल्या पेमेंट गेटवेच्या माध्यामातुन क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड अथवा नेटबंकिगव्दारे परीक्षा शुल्क अदा करता येईल.
७. परिक्षा शुल्काचा भरणा करताना बँक खात्यातुन परिक्षा शुल्काची रक्कमेची वजावट झाल्यानंतर परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वीपणे झाला (Payment Successful) असल्याचा संदेश ऑनलाईन अर्जप्रणालीच्या पृष्टावर प्रदर्शित झाल्याशिवाय व परीक्षा शुल्काची पावती तयार झाल्याशिवाय संकेतस्थळावरील संबंधित पृष्टावरून आणी/अथवा खात्यातुन लॉग आऊट होऊ नये. ८. परिक्षा शुल्काच भरणा यशस्वी न झाल्यास पुन्हा भरण्याची कार्यवाही प्रस्तुत जाहिरातीच्या
अनुषंगाने विहीत दिनांक / विहीत वेळेपूर्वीच करणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणास्तव व्यवहार अयशस्वी ठरल्यास यासंदर्भातील तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. विहीत मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकणाऱ्या उमेदवारांचा संबंधित भरप्रक्रियेकरीता विचार केला जाणार नाही.
९. उमेदवारास ऑनलाईन अर्ज करताना कोणतीही शंका असल्यास त्याबाबत ९५१३४३७७८३ या हेल्पडेक्स लिंक (Helpdesk link) वर संपर्क साधता येईल.

टिप : नोंदणीमधील तपशील जसे की वापरकर्ता नाव (USERNAME), ई-मेल आयडी, पसंतीचे स्थान, जन्मतारीख, उमेदवाराचे छायाचित्र (Photograph) आणि स्वाक्षरी इत्यादी आवेदन पत्र सादर केल्यानंतर बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.

१५. सर्वसाधारण सुचनाः -

१. जातीच्या दाव्याच्या पुष्ठ्यर्थ महाराष्ट्र अनुसुचीत जाती अनुसुचीत जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम २००० मधील तरतुदी नुसार सक्षम प्राधीकारी यांचे कडुन प्रदान करण्यात आलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

२. विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास वर्गाचा (या प्रवर्गातील महिला खेळाडु माजी सैनिक, दिव्यांग, अंशकालीन कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त या समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या) उमेदवारांनी उन्नत व प्रगत गटामध्ये मोडत आहेत किंवा नाही या बाबत अर्जामध्ये स्पष्टपणे नमुद करणे आवश्यक आहे.

३. शासन निर्णय क्र. संकीर्ण/२००७/ पडताळणी/नवी/२६, दि.२१/११/२००७ अन्वये निवड झालेल्या उमेदवारां विरुध्द कोणताही गुन्हा नोंदविलेला नाही अथवा सिध्द झालेला नाही असे चारित्र्य प्रमाणपत्र संबंधीत पोलीस ठाण्याकडुन प्राप्त झाल्यानंतर त्याची / तिची सदर पदावर नेमणुक केली जाईल.

४. महाराष्ट्र शासना कडुन आदेश क्र.एस.आर.व्ही-प्र.क्र.१७/२०० स.आर.व्ही-प्र.क्र.१७/२०००/२०१२ दि. ०१/०७/२००५ नुसार लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील.

५.उमेदवारांस मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यास मराठी लिहीता, वाचता, बोलणे येणे आवश्यक आहे. 

६.नियुक्तीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराने विहीत केलेली इतर बंधपत्र / प्रतिज्ञापत्र / वचनपत्र / करारपत्र इत्यादी विशीष्ट स्वरुपात भरुन दिल्याशीवाय मृद व जलसंधारण विभागात रूजू करून घेतले जाणार नाही.

७. शासकिय / निमशासकिय कर्मचा-यांनी त्यांचे अर्ज त्यांच्या संबंधीतनियुक्ती प्राधिकरणाच्या परवानगीने भरावयाचा आहे. अशी परवानगी प्राप्त केल्याची प्रत कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे.
८. उपरोक्त पदाकरिता शासकिय व निमशासकिय उमेदवाराने सरळ सेवा भरती प्रक्रियेत अर्ज सादर केल्यापासून निवड प्रक्रिया संपेपर्यंतच्या काळात घडणारे बदल, उदा. निलंबन, दंड, फौजदारी खटला, शीस्तभंग विषयक अथवा तत्सम कारवाई इ. वेळोवेळी कळविणे आवश्यक आहे. अर्ज सादर केल्यानंतर घडून आलेले बदल न कळविल्यास अशा उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
९. निवड झाल्यास उमेदवारास ५०० रूपयांच्या मुद्रांक पत्रावर नोटरी समोर आवेदन पत्रात नमुद अचुकते बाबत आणी सत्यतेबाबत प्रतिज्ञापत्रात नियुक्तीपुर्वी सादर करावे लागेल.
१६. विहीत प्रमाणपत्र / कागदपत्रे अपलोड करणे


उमेदवाराने प्रोफाईल केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने त्याची पात्रता अजमावल्यानंतर (After Checking eligibility) उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे / प्रमाणपत्रे (लागु असलेली) अपलोड करावी. प्रोफाईलमधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अपलोड करावयाची संबंधीत कागदपत्रे प्रणालीव्दारे अर्ज सादर करतांना प्रदर्शीत होतील.

१७. परीक्षा केंद्र व परीक्षेबाबतच्या सर्वसाधारण सूचना:-

मृद व जलसंधारण विभागात भरती

१. अर्ज सादर करतांनाच जिल्हा (परीक्षा) केंद्राची निवड करणे आवश्यक आहे. जिल्हा (परीक्षा) केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थीतीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही. एकदा निवडलेल्या जिल्हा केंद्रामध्ये अथवा टाटा कन्सलटंसी सर्विसेस लिमिटेड ने निश्चीत केलेल्या परीक्षा उपकेंद्रामध्ये बदल करण्याची विनंती कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही. वरिल प्रमाणे जिल्हा केंद्र निवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने अर्जामध्ये दिलेल्या कायमस्वरुपी रहिवासी पत्याच्या आधारे संबंधीत महसुली मुख्यालयाच्या जिल्हाकेंद्रावर किंवा नजिकच्या जिल्हाकेंद्रावर प्रवेश देण्यात येईल. या बाबत शासनाचे त्या-त्या वेळचे धोरण व निर्णय अंतिम मानण्यात येईल.

२. उमेदवारांना नेमून दिलेले परीक्षा केंद्र व त्याचा पत्ता प्रवेश पत्रात नमूद करण्यात येईल. संबंधित परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल.

३. उमेदवाराने एकदा केलेली परीक्षा केंद्राची निवड अंतिम असेल. परीक्षेचे केंद्र/स्थळ / तारीख/वेळ/ सत्र बदलण्याची कोणतीही विनंती कोणत्याही परिस्थिती मध्ये (वैद्यकीय किंवा इतर कारणांसाठी) स्वीकारली जाणार नाही. उमेदवाराने त्याची प्रवासाची व्यवस्था त्यानुसार आधीच ठरवावी.

४. कोणतेही परीक्षा केंद्र रद्द करणे आणि / किंवा परीक्षा केंद्र वाढविणे याचे अधिकार विभाग स्वतःकडे राखून ठेवीत आहे.
५. उमेदवाराला त्याने तिने निवडलेल्या केंद्रा व्यतिरिक्त इतर कोणतेही केंद्र वाटप करण्याचा अधिकार विभाग स्वतः कडे राखून ठेवीत आहे.

६. उमेदवाराने परीक्षा केंद्रावर स्वतःच्या जोखमीवर आणि स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यास कोणताही प्रवास खर्च वा भत्ता दिला जाणार नाही किंवा उमेदवारास कोणत्याही स्वरूपाच्या इजा किंवा नुकसानीसाठी विभाग जबाबदार राहणार नाही.

७. उमेदवारांनी एखाद्या विशिष्ट परीक्षा केंद्राची पुरेशा संख्येने निवड केलेली नसल्यास किंवा एखाद्या केंद्राची निवड त्या केंद्राच्या उपलब्ध क्षमतेपेक्षा जास्त उमेदवारांनी केलेली असल्यास उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेसाठी इतर कोणतेही संलग्न केंद्र वाटप करण्याचा अधिकार विभागास राहील.

८. उमेदवाराने भरणा केलेले परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीमध्ये (अनेकदा अर्ज करणे, अर्ज चुकणे, काही कारणास्तव परीक्षेस बसू न शकणे, इत्यादी अशा कारणांसाठी) परत केले जाणार नाही.

९. ऑनलाईन अर्जात भरलेल्या माहितीस उमेदवार स्वतः जबाबदार राहील त्यास विभाग कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही.

१०. उमेदवारांना परीक्षेला उपस्थित असताना परीक्षेच्या प्रवेशपत्रासह ओळखपत्राच्या पुराव्याची छायांकित प्रत सादर करावे लागेल, त्याशिवाय त्यांना परीक्षेस बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. परीक्षार्थी उमेदवारांनी लक्षात ठेवावे की प्रवेशपत्रावर दिसणारे नाव (नोंदणी प्रक्रिये दरम्यान दिलेले) ओळखपत्रावर दिसत असलेल्या नावाशी तंतोतंत जुळले पाहिजे. विवाहानंतर नाव/आडनाव/मध्यम नाव बदललेल्या महिला उमेदवारांनी याची विशेष नोंद घ्यावी. प्रवेश पत्र आणि ओळखपत्रामध्ये दर्शविलेले नाव यामध्ये साम्य न आढळल्यास उमेदवाराला परीक्षेला बसू दिले जाणार नाही. ज्या उमेदवारांनी त्यांचे नाव बदलले आहे त्यांच्या बाबतीत, त्यांनी नाव बदलाबाबतचा पुरावा सादर केला तरच परीक्षेस बसण्याची परवानगी दिली जाईल.

मृद व जलसंधारण विभागात भरती

११. परीक्षा स्थगित व रद्द करणे, परीक्षेचे स्वरूप, परीक्षेची तारीख व ठिकाणात बदल करणे, पदसंख्या वाढ किंवा घट करण्याचे अधिकार विभागास राहतील व विभागाचा निर्णय अंतिम असेल, त्याबाबत कोणताही दावा सांगता येणार नाही. तसेच भरती प्रक्रिये संदर्भात वा तक्रारी बाबत निर्णय घेण्याचा अधिकार विभागास राहील व विभागाचा निर्णय अंतिम असेल. याबाबत कोणत्याही पत्र व्यवहाराची दखल घेतली जाणार नाही.

१२. ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास व भरतीच्या कोणत्याही टप्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. याबाबत उमेदवारास तक्रार करता येणार नाही. ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही. जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी व पात्रता तपासूनच उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावा. १३. उमेदवारांची परीक्षा ही त्यांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार कोणतीही कागदपत्रे पूर्व

तपासणी / छाननी न करता घेतली जाणार असल्यामुळे या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडी बाबतचे कोणतेही हक्क राहणार नाहीत. कागदपत्रांच्या पूर्ण छाननी नंतरच उमेदवाराची पात्रता निश्चित करण्यात येईल. उमेदवाराना ऑनलाईन परीक्षेतील मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच त्यांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार अंतरिम यादी प्रसिद्ध करून उमेदवारांच्या कागदपत्रांची सखोल छाननी केली जाईल. सदर प्रक्रियेत उमेदवार अपात्र आढळल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारांना भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र करण्याचे सर्व अधिकार आयुक्त, मृद व जलसंधारण (म.रा) राखून ठेवीत आहेत.

१४. परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रात किंवा परीक्षा केंद्र परिसरात मोबाईल, गणकयंत्र (Calculator), आय पॅड वा तत्सम इलेक्ट्रॉनिक यंत्रे किंवा इतर संपर्काची साधने वापरण्यास सक्त मनाई आहे. १५. उमेदवारास परीक्षा / कागदपत्र पडताळणी इत्यादी करीता स्वखर्चाने यावे लागेल.

१६. ऑनलाईन परीक्षा स्थळामध्ये वाढ/ बदल करण्याचे अधिकार विभागाकडे राहतील. परिक्षेचे ठिकाण, वेळ, दिनांक उक्त संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
१७. परीक्षेचे प्रवेशपत्र उक्त संकेतस्थळावरुन स्वतः डाऊनलोड करुन घेण्याची जबाबदारी सर्वस्वी उमेदवाराची असेल. प्रवेशपत्र इतर कोणत्याही पद्धतीने पाठविले जाणार नाही.

१८. उमेदवाराने स्वतःचे नाव, त्याचे / तिचे किंवा वडील /पती इ. चे नाव जसे प्रमाणपत्रे/ गुणपत्रिका / ओळखपत्र पुराव्यामध्ये नमूद आहे त्याप्रमाणेच अर्जामध्ये नमूद करण्यात यावे. उमेदवाराच्या ओळखपत्र / पुराव्यामधील नाव व अर्जामध्ये नमूद केलेले नाव यामध्ये कोणताही बदल आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरू शकते.

१९. परीक्षेच्या वेळी उमेदवाराने स्वतःचे प्रवेश प्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे, त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.

२०. प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात आल्यानंतर उमेदवाराला त्याच्या अर्जात नमुद नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाव्दारे कळविण्यात येईल. याबाबतची घोषणा विभागाच्या संकेतस्थळावर परीक्षेपूर्वी एक आठवडा अगोदर प्रसिध्द करण्यात येईल.

२१. परीक्षेच्या दिनांकापुर्वी तिनदिवस अगोदर प्रवेश प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास अर्ज सादर केल्याच्या आवश्यक पुराव्यासह संकेतस्थळावर दिलेल्या टाटा कन्सलटंसी सर्वोसेस लिमीटेडच्या (Help Desk) मदत कक्षाकडे संपर्क साधावा.

२२. परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणुक ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा फक्त स्मार्टकार्ड प्रकाराचे वाहन चालवण्याचा परवाना यापैकी कोणतेही एक मुळ ओळखपत्र तसेच मुळ ओळखपत्राची छायांकीत प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.

२३. आधारकार्ड ऐवजी भारतीय विशीष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या संकेतस्थळा वरुन डाऊनलोड केलेले ई-आधार सादर करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत ई-आधार वर उमेदवारांचे नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्म दिनांक या तपशीलासह आधार निर्मीतीचा दिनांक (Date of Aadhar Generation) व आधार डाऊनलोड केल्याचा दिनांक असल्यासच तसेच सुस्पष्ट फोटोसह रंगीत प्रिंटमध्ये आधार डाऊनलोड केले असल्यासच ई- आधार वैध मानन्यात येईल.

१८. दिव्यांग उमेदवार लेखनिक व अनुग्रह कालावधीबाबत :-

१. लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या उमेदवारांना परीक्षेच्यावेळी लेखनिक व इतर सोयी सवलती उपलब्ध करुन देण्यासंदर्भात शासननिर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्रमांक दिव्यांग २०१९/प्र.क्र.२००/दि कर दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ अन्वये जारी करण्यात आलेल्या लक्षणीय (Banchmarkदिव्यांग व्यक्तीच्याबाबत लेखी परीक्षा घेण्याबाबतची मार्गदशिका - २०२१ तसेच तदनंतर शासनाचे वेळोवेळीनिर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.

२. प्रत्यक्ष परीक्षेच्यावेळी उत्तरे लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या पात्रदिव्यांग उमेदवारांना लेखनिकाची

मदतीची आवश्यकता असल्यास संबंधित उमेदवारानं ऑनलईन पध्दतीने अर्ज सादर करताना

मृद व जलसंधारण विभागात भरती

त्याबाबत नमुद करणे गरजेचे आहे तसेच आवश्यक कागदपत्रे करणे आवश्यक आहे. संलग्न (Uplod) करावयाच्या कागदपत्राचा तपशील संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या दिव्यांग उमेदवारांकरिता मार्गदर्शक सुचना यामध्ये देण्यात आला आहे.

३. लेखनिकाची व्यवस्था उमेदवारास स्वतः स्वखर्चाने करावी लागणार आहे.

४. उमेदवार स्वतः लेखनिकाची व्यवस्था करणार असल्याने लेखनिकाची शैक्षणीक अर्हता ज्यापदासाठी परिक्षादिली जाणार आहे त्या शैक्षणीक अर्हतेपेक्षा एक टप्याने कमी असावी.

५. अर्जामध्ये मागणी केली नसल्यास तसेच आवश्यक कागदपत्रे संलग्न (Upload) न केल्यास ऐनवेळी लेखनिकाची मदत घेता येणार नाही.

६. परिक्षे करिता लेखनिकाची मदतीची परवानगीदिलेल्या पात्र उमेदवारांची यादी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.

७. प्रत्यक्ष परिक्षेच्यावेळी लेखनिकाची मदत घेण्यास इच्छुक असलेल्यादिव्यांग उमेदवारांनी प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर करण्या पुर्वी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्यादिव्यांग उमेदवारा करिता मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे.जे उमेदवार लेखनिकाचा वापर करतात त्यांना परीक्षेच्या प्रत्येक तासासाठी २० मिनिटे अतिरिक्त वेळ भरपाई म्हणून देण्यात येईल. परीक्षेदरम्यान लेखनिकाने स्वतःहून प्रश्नांची उत्तर देऊ नयेत. असे कोणतेही वर्तन आढळल्यास अर्जदाराची उमेदवारी रद्द केली जाईल.

८. उमेदवारांना दिलेला भरपाईचा वेळ संगणक प्रणालीवर आधारित असल्याने ज्या उमेदवारांनी अर्ज करताना लेखनिकाची सेवा घेणार असल्याचे नमूद केलेले आहे अशा नोंदणीकृत उमेदवारांनाच अतिरिक्त वेळ देण्यात येईल. भरपाईच्या वेळेसाठी नोंदणीकृत नसलेल्या अन्य उमेदवारांना ऐनवेळी अशा सवलतींना परवानगी दिली जाणार नाही.

९. परीक्षेदरम्यान कोणत्याही टप्यावर लेखनिक स्वतंत्रपणे प्रश्नांची उत्तरे देत असल्याचे आढळल्यास, परीक्षा सत्र समाप्त केले जाईल आणि उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल. परीक्षा संपन्न झाल्यानंतरही जर परीक्षे दरम्यान लेखनिकाच्या सेवांचा स्वतंत्रपणे प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी वापर केल्याचे परीक्षा प्रशासनास आढळून आल्यास अशा उमेदवारांची उमेदवारी देखील रद्द केली जाईल.

१०. अस्थिव्यंग आणि मेंदूचा पक्षाघात असलेल्या उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना:- अस्थिव्यंग आणि मेंदूचा पक्षाघात (किमान ४०% दिव्यांगत्व) असलेल्या उमेदवारांनो आवेदन पत्रामध्ये तसे नमूद

केलेले असल्यास त्यांना प्रति तास २० मिनिटे अतिरिक्त वेळ दिला जाईल.

११. सदरची मार्गदर्शक तत्त्वे केंद्र / महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या सूचनांनुसार / निर्णयानुसार असून त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने बदल केल्यास ते बदल लागू राहतील.

१९. अयोग्य वर्तन/अयोग्य माध्यमांचा वापर केल्याबद्दल दोषी आढळलेल्या उमेदवारां विरुद्ध कारवाई :- उमेदवारांना सूचित केले जाते की त्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना कोणतेही खोटे, छेडछाड केलेले किंवा बनावट तपशील सादर करू नयेत आणि कोणतीही महत्त्वाची माहिती लपवू नये. परीक्षेच्या वेळी किंवा त्यानंतरच्या निवड प्रक्रियेत, उमेदवार खालील बाबतीत दोषी असल्यास किंवा आढळून आल्यास असा उमेदवार त्याविरुद्ध फौजदारी खटला भरणे या सोबतच ज्या परीक्षेसाठी तो उमेदवार आहे त्या परीक्षेसाठी अपात्र ठरविणे, विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी कायमस्वरूपी किंवा विशिष्ट कालावधीसाठी अपात्र ठरविणे किंवा त्याच्या सेवा समाप्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

मृद व जलसंधारण विभागात भरती

१. अयोग्य मार्गाचा अवलंब करणे,

२. तोतयागिरी करणे किंवा कोणत्याही व्यक्तीद्वारे तोतयागिरी करून घेणे,

३. परीक्षा हॉलमध्ये गैरवर्तन करणे किंवा चाचणीची सामग्री किंवा त्यातील इतर कोणतीही माहिती कोणत्याही स्वरुपात तोंडी किंवा लेखी, इलेक्ट्रॉनिक किंवा यांत्रिकरित्या कोणत्याही उद्देशाने उघड करणे, प्रकाशित करणे, पुनरुत्पादन करणे, प्रसारित करणे, संग्रहित करणे किंवा प्रसारित करणेसाठी सुलभ करणे,

४. त्याच्या/तिच्या उमेदवारीच्या संदर्भात कोणत्याही अनियमित किंवा अयोग्य मार्गाचा अवलंब करणे, किंवा

५. अयोग्य मार्गाने त्याच्या / तिच्या उमेदवारीसाठी समर्थन मिळवणे, किंवा परीक्षा/मुलाखत हॉलमध्ये मोबाईल फोन किंवा संवादाची तत्सम इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाळगणे.

२०. उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :

१. परीक्षा केंद्राचा पत्ता प्रवेश पत्रावर नमूद करण्यात येईल. परीक्षेचे केंद्र / स्थळ/ दिनांक / वेळ बदलाची कोणतीही विनंती विचारात घेतली जाणार नाही.

२. परीक्षा प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या वेळेनंतर परीक्षा केंद्रावर उपस्थित होणा-या उमेदवारांना परीक्षेला बसू देण्याची परवानगी दिली जाणार नाही. परीक्षेचा कालावधी जरी १२० मिनिटाचा असेल तरी सुध्दा उमेदवाराना परीक्षा केंद्रावरील विहीत प्रक्रिया (उमेदवाराना महत्वाच्या सूचना देणे. उमेदवाराची व कागदपत्राची पडताळणी करणे, आवश्यक कागदपत्र जमा करणे लॉग इन करणे) पार पाडण्यासाठी उमेदवारांनी परीक्षा सुरु होण्यापूर्वी किमान 1 तास परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.
३. उमेदवाराने अर्जामध्ये नमूद केलेली माहिती कोणत्याही टप्प्यावर चुकीची, अपूर्ण अथवा खोटी आढळून आल्यास उमेदवाराची संबंधित पदासाठीची उमेदवारी रद्द करण्यात येईल व संबंधित उमेदवार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. चुकीच्या माहितीच्या आधारे नियुक्ती झाल्यास कोणतीही पूर्व सूचना / नोटीस अथवा कारण न देता उमेदवार तात्काळ सेवेतून काढून टाकण्यास पात्र राहील. त्यामुळे होणा-या सर्व परिणामास उमेदवार स्वतः जबाबदार राहील.

टिप-उपरोक्त परीक्षेला उपस्थित रहातांना उमेदवाराने स्वतःची ओळख पटविण्यासाठीची उपरोक्त नमूदपैकी आवश्यक ते मूळ कागदपत्रे, त्या कागदपत्रांच्या छायाकींत प्रती, परीक्षेच्या प्रवेशपत्रासह सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवाराचे परीक्षेच्या प्रवेशपत्रा वरील आणि सादर केलेल्या ओळखपत्रावरील नांव आवेदनपत्रात नोंदणी केल्यानुसार तंतोतंत जुळणे आवश्यक राहील. ज्या महिला उमेदवारांच्या पहिल्या मधल्या, शेवटच्या नावांत विवाहानंतर बदल झाला असल्यास त्यांनी याबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. सदर महिला उमेदवारांनी नावात बदल झाल्याचे अधिसुचीत केलेले राजपत्र किंवा विवाह निबंधक कार्यालयाचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र यापैकी एक पुरावा सादर करणे आवश्यक आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र व सादर करण्यात आलेले फोटो ओळखपत्र यामधील नावात कोणतीही तफावत आढळल्यास उमेदवारास परीक्षेला उपस्थित राहू दिले जाणार नाही. सर्व उमेदवारांनी खालील कागदपत्रासह ऑनलाईन परीक्षेला उपस्थित रहाणे आवश्यक आहे. खालीलपैकी कोणतेही कागदपत्र नसल्यास उमेदवारास परीक्षेला उपस्थित राहू दिले जाणार नाही.

१. परीक्षेसाठी वैध प्रवेशपत्र.

२. मूळ फोटो ओळखपत्र.

३. फोटो ओळखपत्राची छायाप्रत.

२१. इतर अटी :-

१.

परीक्षेच्या व्यवस्थापनामध्ये काही समस्या येण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही ज्यामुळे ऑनलाईन चाचणी वितरणावर तसेच निकालावर परिणाम होऊ शकतो. अशावेळी या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. तथापि यामध्ये उमेदवारांची हालचाल, व परीक्षेला विलंब होणे यासारख्या बाबी गृहीत धरण्यात आलेल्या आहेत. परीक्षेचे फेर आयोजन हे विभागाच्या / परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थेच्या पूर्ण निर्णयावर अवलंबून राहील. परीक्षेच्या फेर आयोजनासाठी उमेदवारांचा कोणताही दावा राहणार नाही. चाचणी वितरणाची विलंबित प्रक्रिया न स्वीकारणारे, हालचालीस नकार देणारे किंवा अशा प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक नसलेले उमेदवार सरसकटपणे निवड प्रक्रियेतून बाद ठरविले जातील.

मृद व जलसंधारण विभागात भरती

परीक्षेशी संबंधित सर्व बाबींमध्ये विभागाचा निर्णय अंतिम असेल आणि तो उमेदवारावर बंधनकारक असेल.या संदर्भात विभागाद्वारे कोणताही पत्रव्यवहार किंवा वैयक्तिक चौकशी केली जाणार नाही. प्रस्तुत जाहीरातीमध्ये नमुद अटी व शर्ती, नियमा व्यतीरीक्त शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश व निर्णय लागू राहतील. तसेच शासन निर्णयामध्ये नमुद निर्णय अंतिम असेल. सदर पदभरती नियम / निकषांमध्ये पदभरती पुर्ण होईपर्यंत वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या शासन निर्णय / शासन शुध्दीपत्रक / शासन अधीसुचना नुसार बदल होऊ शकतो.

३. विभाग उमेदवारांच्या वैयक्तिक प्रतिसादांचे (उत्तरे) विश्लेषण इतर उमेदवारांच्या प्रतीसादांशी अचूक आणि चुकीच्या उत्तरांच्या समानतेचे नमुने शोधण्यासाठी करेल. यासंदर्भात विभागाद्वारे अवलंबलेल्या विश्लेषणात्मक प्रक्रियेत, उमेदवारांनी उत्तरे एकमेकांसोबत वाटप (Share) केलेली आहेत आणि त्यांना मिळालेले गुण खरे / वैध नाहीत असा निष्कर्ष निघाल्यास विभाग अशा उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवते तसेच अशा उमेदवारांचे निकाल रोखले जातील.

४. निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने चुकीची माहिती दिल्याचे किंवा उमेदवारांकडून निवड प्रक्रियेचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास उमेदवार निवड प्रक्रियेतून अपात्र ठरेल आणि त्याला / तिला यापुढे कोणत्याही निवड प्रक्रियेमध्ये भाग घेण्यास प्रतिबंध करण्यात येईल.

२२. उमेदवाराची गुणवत्तेनुसार निवड करण्यासाठी संबंधीत नियुक्ती प्राधिकारी यांचेकडे सादर करावयाच्या आवश्यक

कागदपत्रांचा तपशील :

१. परीक्षेसाठी केलेल्या ऑनलाईन आवेदन पत्राची छायांकित प्रत.

२. परीक्षेचे प्रवेशपत्राची छायांकीत प्रत

३. शैक्षणिक अर्हतेबाबतची कागदपत्रे

४. संगणक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र

५. परीक्षा शुल्क भरणा केलेल्या पावतीची प्रत.

६. अर्जात नमूद केलेप्रमाणे जात प्रमाणपत्र/जात वैधत प्रमाणपत्र / नॉन क्रिमीलेअर/ इतर आवश्यक प्रमाणपत्र.

७. महाराष्ट्र राज्याचा अधीवास प्रमाणपत्र

८. पात्रदिव्यांग व्यक्ती / खेळाडु / अनाथ इत्यादी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.

२३. सेवाप्रवेशोत्तर शर्ती :-

१. ज्या पदांकरिता प्रचलित नियमानुसार विभागीय / व्यावसायिक परीक्षा विहीत केली असेल अथवा

आवश्यक असेल तेथे त्यासंबधी केलेल्या नियमानुसार विभागीय / व्यावसायिक परीक्षा. २. हिंदी आणि मराठी भाषा परीक्षे संबधी केलेल्या नियमा नुसार जर ती व्यक्ती अगोदर परीक्षा उत्तीर्ण झाली नसेल किंवा तिला उत्तीर्ण होण्यातून सूट मिळाली नसेल तर ती परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

३. संगणकाच्या ज्ञानासंदर्भात शासन निर्णय, 
सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण- २०००/प्र.क्र.६१/२००१/३९ दिनांक १९ मार्च, २००३ तसेच 
शासन निर्णय माहीती तंत्रज्ञान विभाग (सा.प्र.वि.) विभाग क्रमांक मातंस-२०१२/प्र.क्र.२७७/३९ दिनांक ४ फेब्रुवारी, २०१३ नुसार संगणक

अर्हता प्राप्त करणे आवश्यक.

४. नियुक्ती होणाऱ्या उमेदवारास शासन निर्णय दिनांक २१/१०/२००५ नुसार लागू करण्यात आलेली नवीन परीभाषीक अंशदायी निवृत्ती वेतन योजना (New defined contributery pension scheme) लागू राहील त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण) नियम १९८४ आणी सर्वसधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू राहणार नाही. तथापी सदर नियमात भविष्यात काही बदल झाल्यास त्याप्रमाणे योजना लागू राहील.

स्वाक्षरी XXX/-

प्रकाश खपले (भा प्र से)

अध्यक्ष राज्यनिवड समिती तथा

आयुक्त, मृद व जलसंधारण (म.रा)

छत्रपती संभाजीनगर

आयुक्त, मृद व जलसंधारण यांचे कार्यालय

वाल्मी परिसर, छत्रपती संभाजीनगर, पिन नं. ४३१००१


जाहिरात लिंक
👇👇👇

मृद व जलसंधारण विभागात भरती - Jalsandharan Vibhag Bharti सविस्तर पहा.  मृद व जलसंधारण विभागात भरती - Jalsandharan Vibhag Bharti सविस्तर पहा. Reviewed by Best Seller on 12/26/2023 12:17:00 pm Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

🚶‍♂️💃🚶‍♂️

Blogger द्वारा संचालित.