👉🏻 डिमॅट अकाउंटला नॉमिनी जोडा :
भारतात शेअर बाजारात इन्वेस्ट करणाऱ्या लोकांना डिमॅट अकाउंट ओपन करावे लागते. जर तुम्हीही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर तुमचे डिमॅट अकाउंट असेलच. दरम्यान नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या आधीच तुम्हाला तुमच्या डिमॅट अकाउंटसंदर्भात एक महत्त्वाचे काम करायचे आहे.
तुम्हाला तुमच्या डिमॅट अकाउंटला नॉमिनी ऍड करायचे आहेत, जर तुम्ही 31 डिसेंबर 2023 पर्यंत तुमच्या डिमॅट अकाउंट आम्ही ऍड केले नाही तर तुमचे डिमॅट अकाउंट फ्रीज होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला हे काम येत्या सात दिवसात पूर्ण करणे आवश्यक आहे.
अन्यथा तुम्हाला शेअर बाजारात पैसा लावता येणार नाही. तुम्ही जर हे काम पूर्ण केले नाही तर तुम्हाला शेअर बाजारात स्टॉकची खरेदी आणि विक्री करता येणार नाही.
👉🏻 म्युच्युअल फंड साठी नॉमिनी जोडा : अनेक जण शेअर बाजारासह म्युच्युअल फंड मध्ये देखील गुंतवणूक करतात. ज्या लोकांना थेट शेअर बाजारात गुंतवणूक करणे जोखीमीचे वाटते असे लोक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात.
जर तुम्ही ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला 31 डिसेंबर पूर्वी नॉमिनी लावणे अनिवार्य आहे. जर तुम्ही हे काम पूर्ण केले नाही तर तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये पैसा जमा करणे आणि काढणे अशक्य होणार आहे.
👉🏻 आयकर रिटर्न फाईल करा :
नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच आयकर दात्यांसाठी देखील एक महत्वाचे अपडेट समोर आले आहे. जर तुम्ही टॅक्सपेयर असाल आणि अजून आयकर रिटर्न फाईल केलेले नसेल तर तुम्हाला 31 डिसेंबर पर्यंत हे काम करावे लागणार.
खरेतर सुरुवातीला यासाठी 31 जुलै 2023 पर्यंत मुदत होती. मात्र नंतर 31 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजेच आता येत्या सात दिवसात ही मुदत संपणार आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर हे काम पूर्ण करायचे आहे.
👉🏻 बँक लॉकर एग्रीमेंट : बँक ग्राहकांना देखील एक विशेष काम 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण करायचे आहे. जर तुम्ही बँक लॉकर घेतलेले असेल तर तुम्हाला 31 डिसेंबर पर्यंत नवीन लॉकर एग्रीमेंट करावे लागणार आहे. जर तुम्ही हे काम पूर्ण केले नाही तर तुम्हाला तुमचे बँक लॉकर खाली करावे लागू शकते.
👉🏻 एक वर्षात ट्रांजेक्शन झालेले नसेल तर UPI आयडी होणार बंद :
जर तुम्ही फोन पे गुगल पे पेटीएम यांसारख्या डिजिटल पेमेंट एप्लीकेशन चा वापर करत असाल तर तुम्हाला देखील नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी एक महत्त्वाचे काम करावे लागणार आहे. जर तुमच्या डिजिटल पेमेंट एप्लीकेशनच्या यूपीआय आयडीवरुन गेल्या एका वर्षात कोणतेच ट्रांजेक्शन झालेले नसेल तर अशा युपीआय आयडी बंद केल्या जाणार आहेत.
त्यामुळे जर तुम्हीही गेल्या एका वर्षाच्या काळात कोणतेच ट्रांजेक्शन केलेले नसेल तर तुमची देखील आयडी बंद होऊ शकते. यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या डिजिटल पेमेंट एप्लीकेशनची युपीआय आयडी सुरू ठेवण्यासाठी ट्रांजेक्शन करावे लागणार आहे.
दुसरा अतिरिक्त माहिती लेख👇👇👇👇
🤳🏻 *मोबाईलवरून घरीच बनवा ड्रायव्हिंग लायसन्स! वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस..*
🪪 नवीन ड्रायव्हिंग लायसन्स किंवा त्यावरील पत्ता बदलणे व इतर कागदपत्रांसाठी देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. हा फॉर्म सोप्या पद्धतीने जर तुम्हाला भरायचा असेल तर तुम्ही आधार इ केवायसीचा वापर करू शकतात. मोबाईल वरून घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स साठी कसा अर्ज करावा जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया...
🤳🏻 *ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अशा पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज*
1- त्याकरता सर्वात प्रथम तुम्हाला https://parivahan.gov.in/parivahan//en/content/mparivahan# साइटवर जावे लागेल व या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेस या कॉलम मध्ये *ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड सर्व्हिसेस* हा पर्याय निवडणे गरजेचे आहे.
2- त्यानंतर असलेल्या ड्रॉप डाऊन मेनू मध्ये *अप्लाय फॉर लर्नर लायसन्स* वर क्लिक करावे लागेल व या ठिकाणी तुम्ही eKYC आधारचा वापर केला तर टेस्ट साठी आरटीओ ऑफिसला तुम्हाला जावे लागणार नाही. तुम्ही घरी बसून लर्नर लायसन्ससाठी टेस्ट देऊ शकतात. जर तुम्ही या ठिकाणी नॉन आधार इ-केवायसी हा पर्याय निवडला तर आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला टेस्ट द्यावी लागेल.
3- त्यानंतर तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन हा पर्याय निवडावा लागेल व आधार नंबर द्यावा लागेल. त्यानंतर आधारशी लिंक असलेल्या तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी हा नंबर व्हेरिफाय करावा लागेल. त्यानंतर आधार इ केवायसीच्या माध्यमातून सगळी माहिती आपोआप भरली जाईल.
4- जर तुम्ही नॉन आधार इ-केवायसी पर्यायाची निवड केली असल्यास यामध्ये फोन नंबर आणि ओटीपी देऊन लॉगिन करावे लागेल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एप्लीकट डज नॉट होल्ड ड्रायव्हिंग/ लर्नर लायसन्स हा पर्याय निवडून तुम्ही तुमच्या जवळील आरटीओची निवड या माध्यमातून करावी लागते. त्यानंतर इतर आवश्यक माहिती व पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करा व स्लिप घेऊन लर्नर लायसन्स टेस्ट करीता स्लॉट बुक करा.
5- ऑनलाइन टेस्ट करिता लॉग इन डिटेल्स एसएमएसद्वारे तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर वर मिळतील. ऑफलाइन टेस्ट करता तुम्हाला आरटीओ ऑफिस मध्ये जाऊन टेस्ट द्यावी लागते. या पद्धतीने लर्नर लायसन्स अप्रूव्ह झाल्यानंतर लायसन्सला प्रिंट लर्नर लायसन्स पर्यायावर जाऊन ते डाऊनलोड करू शकतात.
❓ *ड्रायव्हिंग लायसन्स हरवले तर काय करावे?*
जर ड्रायव्हिंग लायसन्स हरवले तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यासंबंधी तक्रार दाखल करणे गरजेचे आहे. तक्रार नोंदवल्यानंतर त्या तक्रार ची एक प्रत तुमच्याजवळ सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. त्यानंतर नोटरी कार्यालयामध्ये जावे आणि एक प्रतिज्ञापत्र तयार करून घ्यावे. यामध्ये तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स हरवले आहे अशा पद्धतीने उल्लेख केला जाणे महत्त्वाचे असते.
तिसरा लेख👇👇👇👇👇
━━━━━━━━━━━━━
💸 तुमचे सॅलरी अकाउंट आहे?
मग SBI च्या 'या' स्किमविषयी वाचाच..
━━━━━━━━━━━━━
🫵🏻 तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सॅलरी अकाउंट आहे का? असेल तर तुम्हाला बँकेकडून विशेष सुविधा मिळतात. SBI सॅलरीड अकाउंट होल्डर्ससाठी एक कस्टमाइज्ड पर्सनल लोन प्रोडक्ट ऑफर करते.
💰 यामध्ये लग्न, सुट्ट्या, इमरजेंसी, प्लान्ड खर्चासाठी पात्रतेनुसार झटपट वैयक्तिक कर्ज मंजूर केले जाते. ग्राहकांना कोणत्याही गॅरंटीशिवाय कमीत कमी कागदपत्रांसह सवलतीच्या व्याजदरात कर्ज मिळते.
❓ *कसे मिळते लोन?*
एसबीआयच्या वेबसाइटनुसार, बँकेच्या या कस्टमाइज्ड पर्सनल लोनसाठी, ग्राहकाचे कोणत्याही बँकेत सॅलरीड अकाउंट असणे आवश्यक आहे. त्यांची मिनिमम नेट मंथली सॅलरी रु.15,000 पेक्षा कमी नसावी. बँकेचे म्हणणे आहे की, कर्जासाठी अर्ज करणारी व्यक्ती केंद्रीय, राज्य किंवा निम-सरकारी, केंद्र किंवा राज्य PSU, कॉर्पोरेट किंवा राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्थांमधील कर्मचारी असावी. यामध्ये EMI/NMI प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा कमी असेल. SBI च्या मते सॅलरीड कस्टमर्ससाठी डिझाइन केलेल्या या पर्सनल लोन उत्पादनांसाठी कोणतीही सुरक्षा किंवा हमी आवश्यक नाही.
💵 *कर्जाची रक्कम किती?*
SBI च्या एक्सप्रेस क्रेडिट पर्सनल लोन योजनेअंतर्गत, किमान 25,000 रुपये आणि जास्तीत जास्त 20 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. यामध्ये, जास्तीत जास्त कर्ज ग्राहकाच्या निव्वळ मासिक उत्पन्नाच्या 24 पट किंवा 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही. दुसरीकडे, ओव्हरड्राफ्ट कर्जाची रक्कम कमीत कमी 5 लाख आणि जास्तीत जास्त 20 लाख/24 पट NMI असू शकते. यामध्ये, दुसरे कर्ज तुम्ही पहिल्या कर्जाची परतफेड केल्यावरच मिळेल. तसेच, जे पहिल्या कर्जामध्ये नियमित EMI पेमेंट करतात तेच दुसऱ्या कर्जासाठी पात्र असतील.
💹 *SBI कर्ज योजना व्याज दर
SBI सॅलरीड कस्टमर्ससाठी Xpress क्रेडिट पर्सनल लोन स्कीमअंतर्गत व्याजदर 10.90%-12.40% प्रतिवर्ष पासून सुरू होतील. यामध्ये ग्राहकाला कोणतेही हिडेन चार्ज भरावे लागणार नाही, असे बँकेचे म्हणणे आहे. प्रोसेसिंग फीस देखील खूप कमी असेल. SBI च्या या खास पर्सनल लोनचे रिपेमेंट टेन्योर मिनिमम 6 महिने आणि मॅक्सिमम 6 वर्षे असेल.
सदर माहिती मी स्वतः ऑनलाईन माध्यम च्या मदतीने मिळवली आहे
एकदा आपण आवश्य खात्री करावी धन्यवाद...
कोई टिप्पणी नहीं: