💰 पगारदारांनो! तुमची कंपनी EPF चे पैसे कापून EPFO मध्ये जमा करते का? वेळीच ऑनलाईन खात्री करा, अन्यथा खूप नुकसान होईल
━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━
💁🏻♂️ कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी नोकरदारांच्या खात्यातून दरमहा पैसे कापले जातात. निवृत्ती निधीसाठी ही सहसा आपली पहिली पायरी असते. तुमची कंपनी दर महिन्याला तुमच्या पगारातून ठराविक रक्कम कापून पीएफचे पैसे जमा करते आणि त्यावर तुम्हाला वार्षिक व्याज मिळते.
🧐 *कंपनीने पैसे जमा केले आहेत की नाही हे असे तपासा?*
यासाठी तुम्हाला तुमच्या ईपीएफ खात्याचे पासबुक तपासावे लागेल. तुमच्या पासबुकमध्ये किती पैसे जमा झाले याचा तपशील असेल. तुम्ही ईपीएफओ पोर्टलवर जाऊन हे तपासू शकता, यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स…
👩🏻💻 *ईपीएफओ पोर्टलवर पासबुक कसे तपासावे*
1️⃣ *स्टेप 1*
सर्वप्रथम ईपीएफओ पोर्टलवर जा https://www.epfindia.gov.in/site_en/index.php . यासाठी तुम्हाला तुमचा यूएएन (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) ॲक्टिव्हेट करावा लागेल.
2️⃣ *स्टेप 2*
जेव्हा साइट ओपन होईल, तेव्हा 'अवर सर्व्हिसेस' टॅबवर जा आणि नंतर ड्रॉप-डाउन मेनू 'कर्मचार् यांसाठी' निवडा.
3️⃣ *स्टेप 3*
सर्व्हिस कॉलमच्या तळाशी असलेल्या 'मेंबर पासबुक'वर क्लिक करा.
4️⃣ *स्टेप 4*
पुढच्या पेजवर तुम्हाला तुमचा यूएएन आणि पासवर्ड टाकावा लागेल. कॅप्चा टाकून लॉग इन करा.
5️⃣ *स्टेप 5*
लॉग इन केल्यानंतर मेंबर आयडी टाका. यानंतर तुमचा ईपीएफ बॅलन्स दिसेल. यामध्ये तुमच्याकडे अकाउंट बॅलन्ससह सर्व डिपॉझिट, एस्टॅब्लिशमेंट आयडी, मेंबर आयडी, ऑफिसचे नाव, एम्प्लॉयी शेअर आणि एम्प्लॉयरच्या शेअरची माहिती देखील असते.
🪪 तुमचे पॅन कार्ड डीएक्टिवेट झाले तर नाही ना? लगेच असे तपासा.
🔗 जर तुम्ही देखील अजून पॅन आणि आधार लिंक केलेले नसेल तर कदाचित तुमचे पॅनकार्ड हे निष्क्रिय केले गेले असू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक पॅन कार्डधारकांचे पॅन निष्क्रिय करण्यात आले आहेत.
🧐 *तुम्ही पॅन-आधार लिंकिंग स्थिती कसे तपासू शकता जाणून घ्या..*
_✉️ एसएमएसद्वारे पॅन-आधार लिंकिंग स्थिती कशी तपासायची_
🤳🏼 UIDPAN < 12 अंकी आधार क्रमांक> < 10 अंकी पॅन अकाऊंट क्रमांक> 👈🏻 असा SMS टाईप करुन तुम्हाला तो 567678 किंवा 56161 पर पाठवावा लागेल.
🔗 जर तुमचे लिंकिंग पूर्ण झाले असेल तर तुम्हाला हा मेसेज स्क्रीनवर लिहिलेला दिसेल – *“आधार आधीपासूनच आयटीडी डेटाबेसमध्ये पॅन (नंबर) शी संबंधित आहे. आमची सेवा वापरल्याबद्दल धन्यवाद.”* लिंक नसेल तर – *“आधार… ITD डेटाबेसमधील पॅन (नंबर) शी संबंधित नाही.”*
👩🏻💻 *ऑनलाइन वेब पोर्टलद्वारे कसे चेक करायचे*
● सर्वात आधी UIDAI च्या वेबसाईट https://uidai.gov.in/ वर जा.
● आधार सेवा” मेनूमधून “आधार लिंकिंग स्थिती” निवडा.
● तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि स्टेटस बटणावर क्लिक करा.
● येथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर टाकावा लागेल आणि कॅप्चा कोड देखील टाकावा लागेल.
● तुमच्या पॅन-आधार लिंकिंगची स्थिती तपासण्यासाठी “Get Linking Status” वर क्लिक करा.👇👇👇👇
💻 तुम्हाला स्क्रीनवर दिसेल की तुमचा आधार पॅनशी लिंक झाला आहे की नाही.
💢 *पॅन पुन्हा सक्रिय कसे करावे?*
💰 _पॅन कार्ड पुन्हा सक्रिय करण्यासाठी, तुम्हाला दंड भरावा लागेल._
● सर्व प्रथम आयकर विभागाच्या कर ई-फायलिंग पोर्टलवर जा.
● डॅशबोर्डवरील प्रोफाइल विभागात लिंक आधार पर्यायावर क्लिक करा.
● तुमचा पॅन आणि आधार तपशील येथे प्रविष्ट करा.
● Continue to Pay through e-Pay Tax वर क्लिक करा.
● ओटीपीसाठी तुमचा पॅन आणि मोबाइल नंबर टाका.
● ओटीपी पडताळणीनंतर, ई-पे टॅक्स पृष्ठ तुमच्या समोर उघडेल, येथे पुढे जा बटणावर क्लिक करा.
● AY 2024-25 निवडा आणि इतर पावत्या (500) प्रकार म्हणून पेमेंट निवडा आणि सुरू ठेवा.
● पेमेंट केल्यानंतर तुम्ही पॅन आणि आधार लिंक करू शकता.
🧕🏻 विधवा महिलांना महाराष्ट्र सरकारच्या विधवा पेन्शन योजनेअंतर्गत दरमहा मिळेल आर्थिक मदत.
💁🏻♂️ राज्यातील आर्थिक दुर्बल विधवा महिलांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील विधवा महिलांना दरमहा ६०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
🧾 *महाराष्ट्र विधवा योजनेची पात्रता?*
◆ अर्जदार विधवा महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
◆ योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेचे वय ६५ वर्षांपेक्षा कमी असावे.
◆ अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. २१,००० पेक्षा जास्त नसावे.
◆ अर्जदाराचे बँक खाते असले पाहिजे आणि बँक खाते आधार कार्डाशी संलग्न असणे गर्जेचे आहे.
◆ दारिद्र्य रेषेखालील सर्व विधवा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
📃 *विधवा पेन्शन योजना चे लाभ खालीलप्रमाणे..*👇🏻
● या योजनेंतर्गत दरमहा राज्यातील विधवा महिलांना ६०० रुपये पेन्शन रक्कम देण्यात येतील.
● जर एखाद्या कुटुंबात लाभार्थी महिलेला एकापेक्षा जास्त मुले असतील, तर त्या कुटुंबातील महिलेला दरमहा ९००/- रुपये पेन्शन म्हणून दिले जातील.
● जर त्या महिलेला फक्त मुली असतील तर, तिची मुलगी २५ वर्षांची किंवा तिचे लग्न झाल्यापासूनही हा फायदा कायम राहील.
● विधवा महिलेला सरकारने दिलेली रक्कम थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
📑 *विधवा पेन्शन योजना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?*
◆ पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
◆ अर्जदार महिलेचे आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र
◆ उत्पन्न प्रमाणपत्र
◆ बँक खाते पासबुक
◆ पासपोर्ट आकाराचा फोटो
◆ मोबाइल नंबर
◆ वय प्रमाणपत्र
◆ जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती जमातीची असल्यास )
👩🏻💻 *महाराष्ट्र विधवा निवृत्तीवेतन योजनासाठी अर्ज कसा व कुठे करावा?*
▪️अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम ऑफीशियल वेबसाईटवर जावे
▪️वेबसाइटवर गेल्यानंतर मुख्यपृष्ठ आपल्यासमोर उघडेल, या मुख्य पृष्ठावर आपल्याला महाराष्ट्र विधवा निवृत्तीवेतन योजनेच्या अर्ज पीडीएफ दिली गेलेली आहे.
▪️तुम्हाला अर्जामध्ये विचारलेल्या सर्व माहिती भरावी लागेल.
▪️सर्व माहिती भरुन झाल्यानंतर तुमची सर्व कागदपत्रे आणि तो भरलेला अर्ज जोडून तुम्हाला ती जमा करावी लागेल.
▪️यानंतर तुम्हाला तो जोडलेला अर्ज आणि कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालय / तहसीलदार / तलाठी कार्यालय याठिकाणी जाऊन जमा करावा लागेल.
Official Website
👇👇👇👇
कोई टिप्पणी नहीं: